Saturday, November 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उरुळी कांचन-भवरापूर रस्त्यावर ट्रॉली पार्क करून तरुणाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी भवरापूर येथील ट्रॅक्टरचालकावर गुन्हा दाखल

Shreya Varkeby Shreya Varke
Saturday, 14 November 2026, 11:45

उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन-भवरापूर रस्त्यावर अंधारात कोणतेही रिफ्लेक्टर न लावता धोकादायक पद्धतीने उभ्या केलेल्या उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला दुचाकीची पाठीमागून जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात दुचाकीस्वार दीपक बाळू कांचन (वय 40, रा. शिंदवणे, काळेशिवार, कांचनवस्ती, ता. हवेली) यांचा मृत्यू झाला. गुरुवारी (ता. 12) सायंकाळी पाऊणे आठ वाजण्याच्या सुमारास भवरापूर गावच्या हद्दीत, कोरेगाव मूळ फाट्याजवळ ही घटना घडली.

याप्रकरणी मृताचे चुलत भाऊ पंकज हनुमंत कांचन (वय 23, रा. शिंदवणे) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ट्रॅक्टर ट्रॉली चालक ऋषिकेश शंकर सातव (रा. भवरापूर, ता. हवेली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक कांचन हे लोणी काळभोर येथील एमआयटी संस्थेच्या स्विमिंग पूलच्या देखभालीचे काम करीत होते. 12 नोव्हेंबर रोजी सायंकाळी ते दुचाकीवरून (एमएच 42 बीक्यू 2629) जात असताना भवरापूरच्या दिशेने जाणारी उसाने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली रस्त्यावर धोकादायक पद्धतीने उभी होती. ट्रॉलीच्या मागील बाजूस कोणतेही रिफ्लेक्टर लावण्यात आले नव्हते. अंधारात ट्रॉलीचा अंदाज न आल्याने दीपक यांच्या दुचाकीची पाठीमागून जोरदार धडक बसली.

धडकेमुळे दीपक रस्त्यावर पडले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि ते बेशुद्ध अवस्थेत होते. घटनेची माहिती मिळताच त्यांचे चुलत भाऊ पंकज कांचन आणि नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दीपक यांना खासगी रुग्णवाहिकेतून उरुळी कांचन येथील सिद्धिविनायक रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले. अपघातानंतर ट्रॅक्टर ट्रॉली चालक ट्रॉली घटनास्थळी सोडून निघून गेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. चौकशीदरम्यान ट्रॉली ऋषिकेश सातव याची असल्याचे समोर आले.

दरम्यान, रात्रीच्या वेळी रस्त्यावर उसाने भरलेल्या ट्रॉली उभ्या करताना रिफ्लेक्टर किंवा इतर सुरक्षा उपाय न केल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका निर्माण होत असल्याचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी उरुळी कांचन पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस हवालदार चौधर पुढील तपास करीत आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! बावनकुळेंनी केली महत्त्वाची घोषणा; शेतकऱ्यांना दिलासा!

Saturday, 14 November 2026, 22:00

स्वच्छतेत पुण्याची घसरण! टॉप 10 मधूनही बाहेर; आठव्या स्थानावरून थेट 12 व्या क्रमांकावर, महापालिकेच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह!

Saturday, 14 November 2026, 20:56

माधुरी दीक्षित झाल्या ‘मॅडम’! पण अशोकमामांचा आजही ‘गं’वरच जोर; 42 वर्षांपूर्वीच्या आठवणींनी रंगली जुनी मैत्री!

Saturday, 14 November 2026, 20:32

पुणेकरांसाठी खुशखबर! उद्यापासून ‘भारत टॅक्सी’ सेवा सुरू; 50 हजारांहून अधिक कॅब चालकांची नोंदणी.

Saturday, 14 November 2026, 20:21

पुण्यात 28 लाखांचा ऐवज लुटून कुरिअर कर्मचारी फरार! पंचवीस दिवस 10 हजार किमी पाठलाग; अखेर चौघांना बेडया..

Saturday, 14 November 2026, 19:37

पाकिस्तानला धूळ चारत भारताचा ऐतिहासिक विजय!19 वर्षांखालील आशिया चषकावर नवव्यांदा भारताची मोहोर

Saturday, 14 November 2026, 19:14
Next Post

वडकीत अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई! वाहनासह 5.50 लाखांचा प्रतिबंधित गुटखा-पानमसाला जप्त

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp