Sunday, October 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

ना फोन, ना ठावठिकाणा! थेऊरमधून ३० वर्षीय रिक्षाचालक अचानक बेपत्ता; लोणी काळभोर पोलिसांकडून शोध सुरू

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 10 October 2026, 11:57

लोणी काळभोर, ता. 10 : थेऊर (ता. हवेली) येथील दळवीवस्ती परिसरातून 30 वर्षीय तरुण बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. सनि विलास जाधव असे या तरुणाचे नाव असून, तो 5 ऑक्टोबर रोजी सायंकाळी घरातून कोणालाही काही न सांगता बाहेर पडला. त्यानंतर तो घरी परतला नसल्याने कुटुंबीयांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, तो मिळून न आल्याने त्याच्या वडिलांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात धाव घेत अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाची तक्रार दिली आहे.

पोलिसांकडे दिलेल्या माहितीनुसार, सनि जाधव हा रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. सुमारे महिनाभरापूर्वी त्याचा पत्नीशी घरगुती कारणावरून वाद झाला होता. त्यानंतर त्याची पत्नी माहेरी मुंबई येथे गेली होती. सुमारे 15 दिवसांनंतर सनि हा थेऊर येथील दळवीवस्ती परिसरात राहणारे त्याचे मामा संतोष कवले यांच्याकडे राहण्यासाठी गेला होता.

5 ऑक्टोबर रोजी सायंकाळी चारच्या सुमारास जेवण झाल्यानंतर सनि कोणालाही काही न सांगता घरातून निघून गेला. बराच वेळ होऊनही तो परत न आल्याने त्याच्या मामाने कुटुंबीयांना फोन करून याबाबत माहिती दिली. त्यानंतर नातेवाईकांनी परिसरात तसेच परिचितांकडे त्याचा शोध घेतला; मात्र त्याचा ठावठिकाणा लागला नाही.

अखेर मुलाचे अपहरण झाल्याची शक्यता व्यक्त करत वडील विलास जाधव यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांकडून पुढील तपास व शोधाची कार्यवाही करण्यात येत आहे. मात्र, तरुणाचे नेमके काय झाले, तो कुठे गेला आणि त्याच्या बेपत्ता होण्यामागे काय कारण आहे, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. सनि जाधव यांच्याबाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास लोणी काळभोर पोलिसांशी किंवा त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

 
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पैशांच्या पेट्या उघडताच त्यात निघाल्या दगड, विटा अन् रद्दी पेपर; पुण्यात शिक्षण संस्थाचालकाची ‘फिल्मी स्टाईल’ फसवणूक

Sunday, 11 October 2026, 14:34

केएसबी चौकातील उड्डाणपुलावर ट्रॅक्टर-दुचाकीचा भीषण अपघात; 8 वर्षांच्या चिमुरडीचा जागीच मृत्यू!

Sunday, 11 October 2026, 13:52

पुण्यात गुंडगिरीचा थरार! पोलिसांत तक्रार द्यायला निघालेल्या तरुणाला रस्त्यात गाठलं, कोयत्याने सपासप वार…

Sunday, 11 October 2026, 13:33

थाटामाटात लग्न, तिसऱ्याच दिवशी नववधूचा भयंकर डाव!अख्ख्या सासरच्या कुटुंबालाच विष पाजलं?

Sunday, 11 October 2026, 12:29

नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात मोठा बदल! 22 अन् 24 कॅरेटचे आजचे भाव जाणून घ्या …..

Sunday, 11 October 2026, 12:12

धावत्या ॲम्ब्युलन्समध्ये नेमकं काय घडलं? रुग्ण थेट रस्त्यावर फेकला गेला; पिंपरी-चिंचवडमधील रुग्णवाहिका चालकाचा बेजबाबदारपणा

Sunday, 11 October 2026, 11:36
Next Post

जामिनावर बाहेर येताच पुण्यात रील स्टारची 'दबंग'गिरी! महागड्या गाड्यांवर जीवघेणा स्टंट,घोड्यांचाही वापर; हुल्लडबाजीमुळे नागरिक हैराण...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp