Saturday, November 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

थेऊर फाट्यावर कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या नऊ म्हशींची सुटका; आयशर टेम्पोसह चालक पोलिसांच्या ताब्यात

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 14 November 2026, 11:33

लोणी काळभोर, ता. 14 : अकलूज येथून पुण्यातील कोंढवा परिसरात कत्तलीसाठी म्हशी घेऊन जाणाऱ्या आयशर टेम्पोला गोसेवा संघाच्या कार्यकर्त्यांनी थेऊर फाटा येथे अडविले. या टेम्पोमध्ये दाटीवाटीने बांधलेल्या आणि चारा-पाण्याची व्यवस्था नसलेल्या नऊ म्हशी आढळून आल्या. या प्रकरणी टेम्पोचालकाला लोणी काळभोर पोलिसांनी ताब्यात घेतले असून, नऊ म्हशींची सुटका करण्यात आली आहे.

सोहेल मोहम्मद कुरेशी (वय 23, रा. मोरवडी, पिंपरी) व इरशाद जाकीर कुरेशी अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेट. याप्रकरणी कदमवाकवस्ती येथील देवयाणी दिलीप लोणे (वय ३०) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना ९ नोव्हेंबर रोजी दुपारी सुमारे साडे तीन वाजण्याच्या सुमारास पुणे-सोलापूर महामार्गावरील थेऊर फाटा येथे घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवयाणी लोणे या अखिल भारतीय कृषी गोसेवा संघ, समस्त हिंदू आघाडीच्या कार्यकर्त्या म्हणून काम करतात. 9 नोव्हेंबर रोजी त्या काष्टी (ता. श्रीगोंदा) येथे असताना त्यांना एका आयशर टेम्पोमधून जनावरे कत्तलीसाठी पुण्यातील कोंढवा येथे नेण्यात येत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी मित्र ईश्वर राजकुमार कट्टे यांच्यासह पाटस येथे येऊन संबंधित वाहनाचा शोध सुरू केला.

सोरतापवाडी परिसरात संशयित आयशर टेम्पो (क्र. एमएच 09 सीयू 4374) दिसल्यानंतर कार्यकर्त्यांनी त्याचा पाठलाग केला. थेऊर फाटा येथे टेम्पो अडवून चालकाकडे चौकशी केली असता, त्याने आपले नाव सोहेल कुरेशी असल्याचे सांगितले. जनावरे अकलूज येथून आणून कोंढवा येथे नेत असल्याची माहिती त्याने दिली.

यानंतर कार्यकर्त्यांनी 112 क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांना माहिती दिली. पोलिसांच्या मदतीने टेम्पो लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आणण्यात आला. वाहनाची तपासणी केली असता, त्यामध्ये नऊ काळ्या रंगाच्या म्हशी दोरीने घट्ट बांधलेल्या अवस्थेत आढळल्या. त्यांना चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

सदर म्हशी अकलूज बाजारातून इरशाद जाकीर कुरेशी याने खरेदी केल्याचे चालकाने सांगितले. त्यासंदर्भातील खरेदीच्या पावत्याही दाखविण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मात्र, जनावरांची दाटीवाटीने आणि कथित कत्तलीच्या उद्देशाने वाहतूक होत असल्याचा संशय व्यक्त करत देवयाणी लोणे यांनी संबंधितांविरोधात लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांवर प्राण्‍यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम, 1960 – 11(1)(a),11(1)(d),11(1)(e),11(1)(f) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

माधुरी दीक्षित झाल्या ‘मॅडम’! पण अशोकमामांचा आजही ‘गं’वरच जोर; 42 वर्षांपूर्वीच्या आठवणींनी रंगली जुनी मैत्री!

Saturday, 14 November 2026, 20:32

पुणेकरांसाठी खुशखबर! उद्यापासून ‘भारत टॅक्सी’ सेवा सुरू; 50 हजारांहून अधिक कॅब चालकांची नोंदणी.

Saturday, 14 November 2026, 20:21

पुण्यात 28 लाखांचा ऐवज लुटून कुरिअर कर्मचारी फरार! पंचवीस दिवस 10 हजार किमी पाठलाग; अखेर चौघांना बेडया..

Saturday, 14 November 2026, 19:37

पाकिस्तानला धूळ चारत भारताचा ऐतिहासिक विजय!19 वर्षांखालील आशिया चषकावर नवव्यांदा भारताची मोहोर

Saturday, 14 November 2026, 19:14

मारुती नवलेंच्या अडचणीत मोठी वाढ! सहकुटुंब डेक्कन पोलीस ठाण्यात हजेरी; ‘त्या’ प्रकरणात मोठी कारवाई होणार?

Saturday, 14 November 2026, 18:36

प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरणात मीनाक्षी शिंदेंच्या अडचणी वाढणार?दीड कोटींच्या अलिशान गाडीवर संशय, चौकशीची मागणी

Saturday, 14 November 2026, 17:37
Next Post

उरुळी कांचन-भवरापूर रस्त्यावर ट्रॉली पार्क करून तरुणाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी भवरापूर येथील ट्रॅक्टरचालकावर गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp