Thursday, September 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

इंदापुरात मराठा समाजाचं रास्ता रोको! पुणे-सोलापूर महामार्गावर वाहनांच्या रांगा; प्रलंबित मागण्यांवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 3 September 2026, 13:23

आदित्य बोराटे 

इंदापूर: मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तसेच मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाची दखल घेऊन शासनाने तातडीने ठोस निर्णय घ्यावा, या मागणीसाठी सकल मराठा समाज, इंदापूर तालुक्याच्या वतीने गुरुवारी (दि. ३ सप्टेंबर) हिंगणगाव येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला असून, वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

हिंगणगाव येथे सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत रास्ता रोको आंदोलन केले. मराठा समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत शासनाने सकारात्मक आणि तातडीची भूमिका घ्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

आंदोलनानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी चैतन्य कदम आणि इंदापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विलास नाळे यांना सकल मराठा समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले. निवेदनाद्वारे मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाची शासनाने गांभीर्याने दखल घ्यावी, तसेच मराठा समाजाच्या मागण्यांवर ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.

 

प्रलंबित मागण्यांवर तातडीने निर्णयाची मागणी

मराठा समाजाला न्याय मिळण्यासाठी आवश्यक कुणबी नोंदी, जात प्रमाणपत्राशी संबंधित प्रक्रिया तसेच हैदराबाद, सातारा व कोल्हापूर गॅझेटियर आणि उपलब्ध ऐतिहासिक व महसुली नोंदींच्या आधारे पात्र मराठा बांधवांना न्याय देण्यासाठी शासनाने आवश्यक निर्णय तातडीने घ्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

तसेच केवळ आश्वासनांवर न थांबता मागण्यांची निश्चित कालमर्यादेत अंमलबजावणी करावी. मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाबाबत शासनाने तातडीने उच्चस्तरीय चर्चा करून कायदेशीर व समाधानकारक तोडगा काढावा, अशी भूमिकाही सकल मराठा समाजाने मांडली.

महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

रास्ता रोको आंदोलनामुळे पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांना वाहतूक सुरळीत होण्याची प्रतीक्षा करावी लागली. दरम्यान, पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवत वाहतूक सुरळीत करण्यासाठी आवश्यक नियोजन केले.

मराठा समाजाच्या मागण्यांबाबत शासनाने तातडीने ठोस निर्णय न घेतल्यास आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येईल, असा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला. आंदोलन शांततेत पार पडले.यावेळी पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात केला होता.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

केडगावमध्ये जवाहरलाल विद्यालयाच्या गेटसमोर तुफान राडा ; 12 वीच्या विद्यार्थ्यावर टोळक्याकडून हल्ला ; 10 जणांवर यवत पोलिसांत गुन्हा दाखल..

Thursday, 3 September 2026, 13:36

इंदापुरात मराठा समाजाचं रास्ता रोको! पुणे-सोलापूर महामार्गावर वाहनांच्या रांगा; प्रलंबित मागण्यांवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी

Thursday, 3 September 2026, 13:23

हिंजवडीसह 7 गावांचा पिंपरी-चिंचवड महापालिकेत समावेश होणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Thursday, 3 September 2026, 13:18

FDA अधिकारी असल्याचा बनाव; कोल्हापुरात खंडणीचा डाव उघड! हॉटेल आणि नाश्ता सेंटर चालकांकाढून पैसे उकळणारा भामटा पोलिसांच्या जाळ्यात

Thursday, 3 September 2026, 13:15

DJ ला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना पुण्यात बेदम मारहाण

Thursday, 3 September 2026, 12:45

पुण्यातून तरुणाच अपहरण; समृद्धी महामार्गावर 3 किमी थरारक पाठलाग, एका तरुणीसह 6 जण पोलिसांच्या ताब्यात

Thursday, 3 September 2026, 11:43
Next Post

केडगावमध्ये जवाहरलाल विद्यालयाच्या गेटसमोर तुफान राडा ; 12 वीच्या विद्यार्थ्यावर टोळक्याकडून हल्ला ; 10 जणांवर यवत पोलिसांत गुन्हा दाखल..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp