Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मंगळसूत्र चोराला २४ तासांच्या आत ठोकल्या बेड्या; नारायणगाव पोलिसांच्या धडाकेबाज कामगिरीचे कौतुक

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 28 November 2023, 16:39

शुभम वाकचौरे

जांबूत : नारायणगावमधील पेठ आळी परिसरात पादचारी वृद्धेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र अनोळखी व्यक्तीने पाठीमागून खेचून लांबवल्याची घटना घडली होती. यामुळे नारायणगाव परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेबाबत नारायणगाव पोलीस स्टेशनला माहिती मिळताच पोलीस अलर्ट झाले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिसांनी २४ तासांच्या आत चोरट्याला मंगळसूत्रासह ताब्यात घेतले आहे. संबंधित चोरटा विधिसंघर्षीत बालक असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

नारायणगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस विनोद धूर्वे, पोलीस जगदीश पाटील, पोलीस केंगले, पोलीस हवालदार साबळे, पोलीस हवालदार कोकणे, पोलीस हवालदार पोपट मोहरे, पोलीस नाईक मंगेश लोखंडे, पोलीस हवालदार शैलेश वाघमारे, पोलीस हवालदार दत्ता ढेंबरे, पोलीस हवालदार गोविंद केंद्रे, पोलीस हवालदार गंगाधर कोतकर, पोलीस हवालदार सचिन सातपुते यांनी तीन पथके तयार करून घटनास्थळी भेट दिली.

 

परिसरामधील ५० ते ६० सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्याद्वारे चोरी करणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवली. आजूबाजूच्या परिसरात त्याचा शोध घेऊन, २४ तासांच्या आत चोरट्याला ताब्यात घेतले. गुन्ह्याचा तपास करत असताना नारायणगाव परिसरातील जबरी चोरी, घरफोडी व इतर चोऱ्या करणाऱ्या टोळीचा सुगावा लागल्याने नारायणगाव पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवली.

संशयित व्यक्ती तन्मय थोरात (वय १९ वर्षे), मोहित समाजपती (वय १८, दोघेही रा. नारायणगाव, ता. जुन्नर, जि. पुणे) यांना ताब्यात घेतले असता, त्यांनी व त्यांच्या इतर साथीदारांनी मिळून नारायणगाव परिसरात जबरी चोरी, घरफोडी व इतर चोऱ्या केल्याची कबुली दिल्याने, त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून २ मोटारसायकल व इतर चोरलेला एकूण ४,१६,००० रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. जबरी चोरीचे २ गुन्हे, घरफोडीचे २ गुन्हे तसेच चोरीचे २ गुन्हे असे एकूण ८ गुन्हे उघडकीस आणण्यात नारायणगाव पोलिसांना यश आले आहे.

आरोपींना अटक करून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, जुन्नर येथे हजर केले असता त्यांना न्यायालयाने ३ दिवस पोलीस कोठडी रिमांड मंजूर केली. पुढील तपास पोलीस विनोद धुर्वे करत आहेत. दरम्यान, या कामगिरीबद्दल नारायणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी तसेच नारायणगाव ग्रामस्थांनी पोलिसांचे कौतुक केले आहे.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी (जुन्नर) रवींद्र चौधर, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी ही कामगिरी केली.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

“केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा स्फोट! सिया गोयलचे स्नॅपचॅट चॅटिंग व्हायरल, तपासाला नवे वळण….

Saturday, 4 July 2026, 15:06

बसरापुरात तहसीलदार राजेंद्र नजन यांची SIR कामकाजावर करडी नजर; मतदारयादी पुनर्निरीक्षणाची पाहणी

Saturday, 4 July 2026, 14:50

शिक्रापूर एमआयडीसीत दादागिरी करणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांचा थेट अॅक्शन मोडवर

Saturday, 4 July 2026, 14:34

10 हजारांच्या लाचेने उघडलं कोट्यवधींचं बिंग! मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरात सापडलं 2.94 कोटींच घबाड

Saturday, 4 July 2026, 13:57

रावेतमध्ये 24 व्या मजल्यावरून मारली उडी; 29 वर्षीय महिला डॉक्टरने केली आत्महत्या

Saturday, 4 July 2026, 13:42

वीजचोरी पकडायला गेलेल्या महावितरणच्या पथकावर हल्ला; जेजुरी पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:35
Next Post

अनेक समस्या उराशी बाळगत, पारंपरिक व्यवसाय जपत, मेंढपाळांची रानोमाळ भटकंती सुरूच!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.