Sunday, June 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उरुळी कांचन घनकचरा निर्मूलनसाठी ‘जागा उपलब्ध करा, महिनाभरात मंजुरी व निधी देतो ; जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची ग्वाही..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Sunday, 14 June 2026, 18:26

उरुळी कांचन, (पुणे) : जिल्हा परिषदेच्या वतीने उरुळी कांचन व परीसरातील गावासाठी भव्य घनकचरा निर्मुलन प्रकल्पासाठी जागा उपलब्ध करून दिल्यास एक महिन्याच्या आत मंजुरी व निधी देण्याची व्यवस्था करण्यात येईल असे आश्वासन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी दिले.

सामाजिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या उरुळी कांचन (ता. हवेली) येथील ‘ड्रीम्स युवा सोशल फाउंडेशन’ संचलित ‘उरुळी कांचन ग्रामस्वच्छता अभियान ग्रुप’ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (ता. 14) जागतिक रक्तदान दिनानिमित्त बी. जी. शिर्के बाल विकास मंदिर, महात्मा गांधी प्राथमिक विद्यालय येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटक या नात्याने बोलताना वरील आश्वासन जगदाळे यांनी दिले.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी गजानन पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, हवेलीचे गटविकास शेखर शेलार, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती जितेंद्र बडेकर, पंचायत समितीचे सदस्य सुदर्शन चौधरी, कोमल कांबळे, सर्वोदय संघाचे उपाध्यक्ष के.डी. कांचन, बाजार समितीचे संचालक राजाराम कांचन, महादेव कांचन, देविदास भन्साळी, आदी परिसरातील मान्यवर उपस्थित होते.

 

उरुळी कांचन गावातील ड्रीम्स युवा सोशल फाउंडेशनच्या युवकांचे योगदान पाहता त्यांना सर्व प्रकारची मदत करण्याची व त्या माध्यमातून उरुळी कांचन व परिसरातील गावांसाठी आवश्यक असलेल्या भौतिक सुविधा देण्यासाठी प्राधान्य दिले जाईल. यासाठी जागा लवकरात लवकर उपलब्ध करा व निधी घ्या असे आश्वासन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी गजानन पाटील यांनी दिले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष व बहुचर्चित घनकचरा निर्मुलन प्रकल्पाचे केंद्रस्थान के.डी. कांचन म्हणाले, “उरुळी कांचनच्या ड्रीम्स युवा सोशल फाउंडेशनच्या मनातील घनकचरा निर्मुलन प्रकल्प प्रत्यक्षात येण्यासाठी लागणारी जागा देवस्थान समितीच्या वतीने सर्व नियमांचे पालन करून दिली जाईल.

‘प्लास्टिक बँक’ संकल्पनेचे उद्घाटन

मान्यवरांच्या उपस्थितीत परिसरातील महिला आणि विद्यार्थ्यांसाठी “माझे प्लास्टिक, माझी जबाबदारी” या संकल्पनेतून ‘प्लास्टिक बँक’ या संकल्पनेचे उद्घाटन करण्यात आले. महिला वर्गाला 1 किलो प्लास्टिकच्या बदल्यात 1 किलो साखर मोफत दिली जाणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण रक्षणाची आवड निर्माण व्हावी म्हणून शाळांमध्येही हा उपक्रम राबवला जात आहे. विद्यार्थ्यांनी घरात किंवा परिसरात जमा झालेली प्लास्टिक कॅरीबॅग, दुधाच्या पिशव्या, चॉकलेट-चिप्सचे रॅपर एका प्लास्टिक बाटलीत गच्च भरून आपल्या वर्गशिक्षकांकडे जमा करायचे आहेत. अशा 1 किलो प्लास्टिकच्या मोबदल्यात विद्यार्थ्यांना शालेय उपयुक्त वस्तू (वही, पेन, कंपास बॉक्स इ.) मोफत दिली जाणार आहे. प्रत्येक महिन्यातील 2 रा आणि 4 था रविवार रोजी डाळिंब रोड, ओरियन बिल्डींग, उरुळी कांचन येथील संकलन केंद्रावर हा कचरा स्वीकारला जाणार आहे.

दरम्यान, ड्रीम्स युवा सोशल फाउंडेशनच्या या ऐतिहासिक उपक्रमामुळे उरुळी कांचन आणि परिसर स्वच्छ होण्यास मोठी मदत होणार आहे. या रक्तदान शिबिरात तब्बल 806 रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. या रक्तदान शिबिरात ससून रक्तपेढी, तर्पण ब्लड बँक, स्पंदन ब्लड बँक आणि अक्षय ब्लड बँक यांनी सहभाग नोंदवून रक्तसंकलनाचे कार्य केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ड्रीम्स युवा सोशल फाउंडेशनचे ग्रामदूत, स्वयंसेवक आणि स्थानिक नागरिकांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन ऋषीकेश भालेराव, प्रास्तविक संतोष चौधरी तर आभार मंदार खरात यांनी मानले.

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

विवाह निमंत्रण की सायबर सापळा? लिंक उघडली आणि 5 लाख 30 हजार खात्यातून गायब; व्यावसायिकाच्या खात्यावर सायबर चोरट्यांचा डल्ला

Sunday, 14 June 2026, 20:24

ऊसाला पाणी देत असताना काळाचा घाला; वीज तारेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

Sunday, 14 June 2026, 20:01

माळशिरसमध्ये विहिरीत पिकअप कोसळून १४ भाविकांचा मृत्यू, दोघे गंभीर

Sunday, 14 June 2026, 19:05

पोक्सोची भीती दाखवून खंडणीचा खेळ! बडतर्फ महिला पोलिस अंमलदार सोनाली हिंगेचा अटकपूर्व जामीन कोर्टाने नाकारला

Sunday, 14 June 2026, 19:02

उरुळी कांचन ग्रामपंचायतीच्या 990 बालकांच्या आधार कार्डचा विषय 15 दिवसात मार्गी लावणार – मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील..

Sunday, 14 June 2026, 18:32

उरुळी कांचन घनकचरा निर्मूलनसाठी ‘जागा उपलब्ध करा, महिनाभरात मंजुरी व निधी देतो ; जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची ग्वाही..

Sunday, 14 June 2026, 18:26
Next Post

उरुळी कांचन ग्रामपंचायतीच्या 990 बालकांच्या आधार कार्डचा विषय 15 दिवसात मार्गी लावणार - मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.