Wednesday, November 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor News: खुनाच्या प्रयत्नातील दोन आरोपी पुणे रेल्वे स्थानकावर अटकेत; पळून जाण्याचा प्रयत्न फसला!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 25 November 2026, 11:46

लोणी काळभोर, ता. 25 : मित्राच्या वाढदिवसाला केक खाली पडल्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचा राग मनात धरून चौघांनी मध्यरात्री घराचा दरवाजा तोडून एका कुटुंबावर जीवघेणा हल्ला केला. ही घटना लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील फुलेवस्ती परिसरात शनिवारी (ता. 21) रात्री दीड ते दोनच्या सुमारास घडली. या हल्ल्यात 19 वर्षीय तरुणाच्या चेहऱ्यावर कोयत्याने वार करण्यात आला, तर त्याच्या 70 वर्षीय आजोबांचा हात मोडला आणि आजीलाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. या खुनाच्या प्रयत्नातील फरार आरोपींपैकी दोघांना लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हे शाखेच्या युनिट सहाच्या मदतीने पुणे रेल्वे स्थानकावरून अटक केली असून, एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतले आहे.

रोहन अजिनाथ लोंढे (वय 27) आणि स्वप्निल भागवत बंगले (वय 25, दोघेही रा. लोणी काळभोर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या आदित्य रामदास मेमाणे (वय 19), त्याचे आजोबा सुरेश गुलाब मेमाणे (वय 70) आणि आजी शारदा सुरेश मेमाणे (वय 63) हे तिघे जखमी झाले असून, त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. याप्रकरणी आदित्य मेमाणे याने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युवराज महानवर याच्या वाढदिवसानिमित्त लोणी कॉर्नर स्मशानभूमीजवळ मित्र शुक्रवारी (ता. 20) रात्री मित्र जमले होते. यावेळी आदित्यच्या हातून केक खाली पडल्याने त्याचा रोहन लोंढे याच्याशी वाद झाला. मित्रांनी मध्यस्थी करून वाद मिटवला. मात्र, त्यानंतरही रोहनने आदित्यच्या आजीच्या मोबाइलवर फोन करून शिवीगाळ केल्याचा आरोप आहे.

शनिवारी मध्यरात्री रोहन आणि त्याचे तीन साथीदार आदित्यच्या घरात घुसले. घराचा दरवाजा लाथा मारून तोडत आरोपींनी आदित्यला शोधले. ‘आज तुला जिवंत सोडणार नाही, तुझा गेम करतो,’ अशी धमकी देत रोहनने कोयत्याने आदित्यच्या चेहऱ्यावर वार केला. यात त्याच्या उजव्या डोळ्याच्या वर गंभीर जखम झाली. इतर आरोपींनी तांब्याच्या हांड्या आणि दगडाने मारहाण केली. नातवाला वाचवण्यासाठी धावलेल्या आजोबांना ढकलून दगडी खलबत्त्याने मारहाण करण्यात आली. यात त्यांच्या उजव्या हाताचे हाड मोडले. आजीलाही छातीवर, पाठीवर आणि डोक्यावर लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. या घटनेनंतर आरोपी फरार झाले.

याप्रकरणी आदित्य मेमाणे याने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार रोहन लोंढे आणि त्याच्या तीन साथीदारांवर विरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात शस्‍त्र अधिनियम, 1959 – 25,4 ; महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 19951 – 135,37(1) ; भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023 – 109(1),115(2),118(2),3(5),333,351(3),352 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे तपास पथक आणि गुन्हे शाखेच्या युनिट सहाचे पथक करीत होते. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे लॉज, हॉटेल आणि परिसर पिंजून काढला. दिवस-रात्र आरोपींचा शोध सुरू असतानाच, ते पुणे रेल्वे स्थानकावरून पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्यामार्फत मिळाली. त्यानुसार पोलिसांनी रेल्वे स्थानकावर सापळा रचून मंगळवारी (ता. 25) रात्री उशिरा दोन्ही आरोपींसह एका अल्पवयीन मुलाला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.

ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सतीश गोडसे, सोमनाथ नाळे, अमित गोरे, पोलीस हवालदार अण्णा माने, निलेश कोल्हे, सागर जगदाळे, रामहरी वणवे, प्रवीण दडस, सचिन सोनवणे, सागर धायतोंडे, राहुल करडीले, अशोक गिरी, गणेश खरात, योगेश पाटील तसेच गुन्हे शाखा युनिट सहाचे सहायक पोलीस निरीक्षक कदम, पोलीस हवालदार प्रशांत कर्णवर, नानासाहेब मोरे आणि संतोष राठोड यांच्या पथकाने केली.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Loni Kalbhor News: खुनाच्या प्रयत्नातील दोन आरोपी पुणे रेल्वे स्थानकावर अटकेत; पळून जाण्याचा प्रयत्न फसला!

Wednesday, 25 November 2026, 11:46

भिगवणमध्ये बिबट्याच्या हल्ल्यानंतर वनविभाग अलर्ट; बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा अन् बसवले कॅमेरे

Wednesday, 25 November 2026, 11:37

पुण्यात ‘भाऊ फ्लेक्स काढा’ मोहिमेचा दणका! ‘विद्रुपीकरण पुरस्कार’ यादीत श्रीनाथ भिमाले, पृथ्वीराज सुतार यांचा समावेश

Wednesday, 25 November 2026, 11:24

न्हावरेत बिबट्या भक्ष्याच्या शोधात कोंबड्यांच्या खुराड्यात शिरला अन् स्वतःच अडकला; वनविभागाने घेतले ताब्यात

Wednesday, 25 November 2026, 11:04

गोविंदबागेत AI चा चमत्कार! एकरी 120 टन ऊस उत्पादन; कमी पावसातही उसाचे बंपर उत्पादन; शरद पवारांकडून पाहणी

Wednesday, 25 November 2026, 10:45

Pune News: पुण्यात रॅपिडो बाईक टॅक्सी ॲप बंद होणार? परवान्याशिवाय सेवा सुरू ठेवल्याने कंपनीविरोधात गुन्हा दाखल

Wednesday, 25 November 2026, 9:40
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp