Wednesday, November 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भिगवणमध्ये बिबट्याच्या हल्ल्यानंतर वनविभाग अलर्ट; बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा अन् बसवले कॅमेरे

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 25 November 2026, 11:37

सागर जगदाळे

भिगवण: भिगवण परिसरात ऊसतोड मजुरावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडल्यानंतर वनविभागाने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. बिबट्याला पकडण्यासाठी जाधव वस्ती परिसरात पिंजरा लावण्यात आला असून, बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी ट्रॅपिंग कॅमेरे (Camera Traps) बसवण्यात आले आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिक आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.

शंकर कैलास मोरे (रा. शनी देवगाव, ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) असे जखमी ऊसतोड मजुराचे नाव आहे. रविवारी (दि. २२ नोव्हेंबर) सायंकाळी पाच ते साडेपाच वाजण्याच्या सुमारास भिगवणजवळील जाधव वस्ती येथील आशिष गुणवरे यांच्या उसाच्या शेतात ही घटना घडली.मिळालेल्या माहितीनुसार, मोरे हे उसाच्या शेतात ऊसतोडणीचे काम करत असताना अचानक बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. यावेळी त्यांच्या हातात ऊसतोडणीचा कोयता असल्याने त्यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, बिबट्याने उसाच्या शेतातून झडप घालत त्यांच्या पायाला नखांनी जखमी केल्याचे निदर्शनास आले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

घटनेचे गांभीर्य ओळखून वनपरिक्षेत्र अधिकारी भाग्यश्री ठाकूर, वनरक्षक संध्या कांबळे, वनसेवक अनिल कांळगे तसेच बारामती रेस्क्यू टीमने जाधव वस्ती आणि परिसरातील शेतांची पाहणी केली. बिबट्याचा वावर नेमका कुठे आहे, याचा शोध घेण्यासाठी परिसरात पिंजरा लावण्यात आला आहे. तसेच बिबट्याच्या हालचाली टिपण्यासाठी अत्याधुनिक ट्रॅपिंग कॅमेरे (Camera Traps) बसवण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून बिबट्याची ये-जा, हालचाली आणि वावर असलेल्या ठिकाणांची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.

दरम्यान, ऊसतोडणीचा हंगाम सुरू असल्याने शेतांमध्ये मजुरांची मोठी वर्दळ असते. अशा परिस्थितीत बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनेमुळे ऊसतोड कामगारांसह शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. शेतात जाताना एकट्याने जाणे टाळावे, लहान मुलांना शेत परिसरात एकटे सोडू नये, रात्रीच्या वेळी विशेष खबरदारी घ्यावी तसेच बिबट्या दिसल्यास त्याच्या जवळ जाण्याचा किंवा त्याला पकडण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन वनविभागाने केले आहे.
बिबट्याच्या हालचालींवर वनविभागाचे लक्ष असून नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे, असेही वनविभागाकडून सांगण्यात आले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

भिगवणमध्ये बिबट्याच्या हल्ल्यानंतर वनविभाग अलर्ट; बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा अन् बसवले कॅमेरे

Wednesday, 25 November 2026, 11:37

पुण्यात ‘भाऊ फ्लेक्स काढा’ मोहिमेचा दणका! ‘विद्रुपीकरण पुरस्कार’ यादीत श्रीनाथ भिमाले, पृथ्वीराज सुतार यांचा समावेश

Wednesday, 25 November 2026, 11:24

न्हावरेत बिबट्या भक्ष्याच्या शोधात कोंबड्यांच्या खुराड्यात शिरला अन् स्वतःच अडकला; वनविभागाने घेतले ताब्यात

Wednesday, 25 November 2026, 11:04

गोविंदबागेत AI चा चमत्कार! एकरी 120 टन ऊस उत्पादन; कमी पावसातही उसाचे बंपर उत्पादन; शरद पवारांकडून पाहणी

Wednesday, 25 November 2026, 10:45

Pune News: पुण्यात रॅपिडो बाईक टॅक्सी ॲप बंद होणार? परवान्याशिवाय सेवा सुरू ठेवल्याने कंपनीविरोधात गुन्हा दाखल

Wednesday, 25 November 2026, 9:40

पुणेकरांसाठी खुशखबर! बालेवाडीतील 2 मेट्रो स्थानके आजपासून सुरू

Wednesday, 25 November 2026, 9:32
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp