Wednesday, November 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor News : देवदर्शनाहून परतताना काळाचा घाला! वडिलांचा मृत्यू तर मुलगा, आई अन् मुलगी जखमी; ट्रकचालकावर गुन्हा दाखल

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 25 November 2026, 19:49

लोणी काळभोर, ता. 25 : अक्कलकोट, गाणगापूर आणि तुळजापूर येथे देवदर्शन करून घरी परतणाऱ्या होजगे कुटुंबाच्या कारचा पुणे-सोलापूर महामार्गावर उभ्या ट्रकला भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत शिवाजी सखाराम होजगे (वय 58) यांचा मृत्यू झाला, तर त्यांचा मुलगा राहुल होजगे गंभीर जखमी झाला. कारमधील रोहित होजगे आणि त्यांची आई सुनंदा होजगे यांनाही किरकोळ दुखापत झाली.

रियाज इस्माईल शेख (वय 43, रा. आंबेगाव बुद्रुक, पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे. या प्रकरणी रोहीत शिवाजी होजगे (वय 28, धंदा व्यवसाय, रा. सावंतवाडी महागाव, ता. मावळ) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, होजगे कुटुंब 21 नोव्हेंबर रोजी वॅगनर कारने देवदर्शनासाठी गेले होते. देवदर्शन आटोपून 22 नोव्हेंबर रोजी सायंकाळी अक्कलकोट येथून ते घरी परतत होते. 23 नोव्हेंबर रोजी पहाटे पावणे दोन वाजण्याच्या सुमारास लोणी काळभोर हद्दीतील राजेंद्र पेट्रोल पंपासमोर त्यांच्या कारची महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक बसली.

ट्रक कोणतेही पार्किंग लाईट किंवा सिग्नल न लावता अंधारात उभा होता. त्यामुळे चालक राहुल याला ट्रकचा अंदाज न आल्याने कार ट्रकच्या मागील बाजूस धडकली आणि डाव्या बाजूने अडकली. या बाजूला बसलेले शिवाजी होजगे यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. अपघातानंतर नागरिकांनी 112 क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांना बोलावले. जखमींना विश्वराज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी शिवाजी होजगे यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले. राहुल होजगे यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले.

या प्रकरणी ट्रकचालक रियाज शेख याच्याविरोधात मोटरवाहन अधिनियम, 1988 – 119,177 ; भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023 – 106,125(a),125(b),285,324(4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रक महामार्गावर निष्काळजीपणे उभा केल्यामुळे अपघात झाल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. लोणी काळभोर पोलीस पुढील तपास करीत आहेत.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Loni Kalbhor News : देवदर्शनाहून परतताना काळाचा घाला! वडिलांचा मृत्यू तर मुलगा, आई अन् मुलगी जखमी; ट्रकचालकावर गुन्हा दाखल

Wednesday, 25 November 2026, 19:49

लोणी काळभोर येथील पालखी मैदानाजवळ गांजा ओढताना दोघे पोलिसांच्या जाळ्यात!

Wednesday, 25 November 2026, 19:11

लोणी काळभोर येथील गावठी दारू विक्रीच्या अड्ड्यावर गुन्हे शाखेचा छापा; एकाला अटक

Wednesday, 25 November 2026, 19:03

महावितरणच्या कामाचा बळी? न्हावरे-इनामगाव रस्त्यावर निर्वी येथे तरुणाचा दुर्दैवी मृत्यू!

Wednesday, 25 November 2026, 18:58

गोकुळच्या अध्यक्ष निवडीचा वाद पुन्हा न्यायालयात; महायुतीच्या सर्व संचालकांना नोटीस बजावण्याचे आदेश!

Wednesday, 25 November 2026, 18:57

Big Breaking : ट्रिनिटी कॉलेज सुटल्यानंतर बसस्टॉपवर उभ्या विद्यार्थ्यांना साऊंड सिस्टिमच्या ट्रकने उडवले! तीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू; तीन जण गंभीर जखमी

Wednesday, 25 November 2026, 17:53
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp