Sunday, August 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Koregaon: कोरेगाव मूळ गटात राष्ट्रवादीच्या सुरेखा हरगुडे विजयी! कृषिराज चौधरींचा अवघ्या 4 मतांनी थरारक विजय, भाजपचे सुरज चौधरी यांची एकाकी झुंज

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 9 February 2026, 20:04
Koregaon: NCP's Surekha Hargude wins in Koregaon primary group! Krishiraj Chaudhary's thrilling victory by just 4 votes, BJP's Suraj Chaudhary's lonely fight

उरुळी कांचन, ता. 9 : जिल्हा परिषद गट व पंचायत (Koregaon) समिती गणाच्या 2026 च्या निवडणुकीचा निकाल सोमवारी (ता. 9) जाहीर जाहीर झाला. कोरेगाव मूळ केसनंद गटात राष्ट्रवादी काँग्रेसने आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. कोरेगाव मूळ जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादीच्या सुरेखा हरगुडे यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला, तर कोरेगाव मूळ पंचायत समिती गणातून कृषिराज उर्फ मनोज चौधरी यांनी अवघ्या चार मतांच्या फरकाने थरारक विजय खेचून आणला. दरम्यान, केसनंद पंचायत समिती गणातून भाजपचे कुशाल सातव विजय संपादन करत भाजपचे खाते उघडले.

कोरेगाव मूळ गट व गणात राष्ट्रवादीने प्रचंड मताधिक्याने बाजी मारत विरोधकांचा सपशेल पराभव केला. मतमोजणीच्या प्रत्येक फेरीत राष्ट्रवादीची आघाडी वाढत गेल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला. निकाल जाहीर होताच परिसरात जल्लोष साजरा करण्यात आला.

विशेष लक्ष वेधून घेतले ते कोरेगाव मूळ पंचायत समिती गणातील अटीतटीच्या लढतीने. राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार कृषिराज उर्फ मनोज चौधरी यांनी शेवटपर्यंत संयम राखत मतदारांचा विश्वास संपादन केला. त्यांनी भाजपचे उमेदवार सुरज भालचंद्र चौधरी यांचा अवघ्या चार मतांनी पराभव केला. कृषिराज चौधरी यांना एकूण 5,541 मते मिळाली, तर सुरज चौधरी यांना 5,537 मते मिळाली. टपाली मतांमध्ये कृषिराज चौधरी यांना दोन मते मिळाली, दुसरीकडे सुरज चौधरी यांना एकही मत मिळाले नाही.

या निवडणुकीत कोणतेही मोठे राजकीय पाठबळ नसतानाही सुरज चौधरी यांनी सामान्य मतदारांच्या जीवावर एकाकी झुंज देत प्रभावी लढत दिली. मात्र, शेवटच्या क्षणी राष्ट्रवादीच्या संघटनात्मक ताकदीपुढे त्यांना पराभव स्वीकारावा लागला. मनोज चौधरी यांच्या विजयात माजी पंचायत समिती सदस्य दत्तात्रय उर्फ बाळाअप्पा चौधरी यांची भूमिका महत्वाची ठरली.

 

दरम्यान, केसनंद गणातून भाजपचे कुशाल सातव यांनी अटीतटीच्या लढतीत विजय मिळवत भाजपचे खाते उघडले. तरीही एकूण निकाल पाहता कोरेगाव मूळ परिसरात राष्ट्रवादीची पकड अधिक भक्कम झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हा विजय केवळ आकड्यांचा नसून जनतेच्या विश्वासाचा असल्याचे मानले जात आहे. विकासाच्या मुद्द्यावर मतदारांनी राष्ट्रवादीला स्पष्ट कौल दिला असून, या निकालामुळे स्थानिक राजकारणात नवे समीकरण आकारास येणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

उमेदवार (कंसात मिळालेले मते)
1)कोरेगाव मूळ – केसनंद जिल्हा परिषद गट
राष्ट्रवादी : सुरेखा रमेश हरगुडे (18872)
भाजप : कविता विजय पायगुडे (9838)
नोटा : 261

2) केसनंद पंचायत समिती गण
राष्ट्रवादी : प्रमोद चंद्रकांत हरगुडे (6377)
भाजप : कुशाल गोरख सातव (10814)
मनसे : धर्मेंद्र महादेव गावडे (230)
नोटा :

3) कोरेगाव मूळ पंचायत समिती गण
राष्ट्रवादी : कृषिराज उर्फ मनोज दत्तात्रय चौधरी (5541)
भाजप : सूरज चौधरी (5537)
अपक्ष : प्रीतम चंद्रकांत शितोळे (235)
नोटा : (98)

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

शिवसेना अन् धनुष्यबाण कोणाचा? सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालानं बदलणार महाराष्ट्राचं राजकारण? असीम सरोदेंच्या दाव्याने खळबळ

Sunday, 30 August 2026, 17:06

डीजेच्या दणदणाटाविरोधात पुणेकरांचा एल्गार!गुडलक चौकात नागरिक एकवटले ,डीजे बंद करा अन्यथा….

Sunday, 30 August 2026, 16:45

लोणी काळभोरमध्ये शेताच्या बांधावर फुलला ‘ॲपल’चा गोडवा, सफरचंदाच्या बीपासून चक्क फळधारणा!

Sunday, 30 August 2026, 16:33

दिल्ली-पुणे रेल्वे प्रवासात ‘डीलिंग’ झाल्याची टीप! पोलिसांनी महिलेला घेरलं, हातातल्या बॅगची झडती, बॅग उघडताच पोलिसही चक्रावले….

Sunday, 30 August 2026, 16:33

बोरिवली नॅशनल पार्कमध्ये नियमांची पायमल्ली ! सर्वसामान्यांना बंदी, मग धार्मिक कार्यक्रमाला परवानगी कशी? नदीपात्रात नेमकं काय घडलं?

Sunday, 30 August 2026, 16:13

शंभर टक्के एफआरपी दिल्याशिवाय साखर कारखान्यांना गाळप परवाना नाही! २०२६-२७ हंगामासाठी आयुक्तालयाचा कडक पवित्रा

Sunday, 30 August 2026, 15:56
Next Post
Baramati ZP Election Result: 'Baramatikars kept Ajit's word; NCP wins resounding victory in 6 out of 6 seats!'

Baramati ZP Election Result: 'अजितदादांचा शब्द बारामतीकरांनी राखला; राष्ट्रवादीचा 6 पैकी 6 जागांवर दणदणीत विजय!'

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp