बारामती: बारामती तालुक्यात झालेल्या (Baramati ZP Election Result) जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या (Baramati Panchayat Samiti Election Result) नेतृत्वाखाली उभे केलेल्या उमेदवारांना मतदारांनी मोठा कौल देत राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या सर्व 6 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी विजय मिळवत तालुक्यात पुन्हा एकदा आपली मजबूत पकड सिद्ध केली. पंचायत (Ajit Pawar Death) समितीच्या निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेसने बहुतेक जागांवर विजय मिळवला असून एकूण 10 पैकी 8 जागांवर पक्षाचे उमेदवार विजयी झाले, तर 2 जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले. (Baramati News)

अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर झालेल्या या पहिल्याच स्थानिक निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. प्रचाराचा कालावधी कमी असतानाही आणि भावनिक वातावरण असतानाही मतदारांनी मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पाठिंबा दिला. स्थानिक पातळीवर गेल्या अनेक वर्षांत झालेली विकासकामे, सिंचन, रस्ते आणि औद्योगिक प्रकल्प यामुळे बारामतीमध्ये अजित पवार यांचे प्रभावी नेतृत्व कायम असल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

निकालानंतर कोणताही जल्लोष न करता विजयी उमेदवारांनी बारामतीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली आणि दिवंगत अजित पवार यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून त्यांना श्रद्धांजली वाहिली. भावनिक वातावरणात पार पडलेल्या या भेटीत अनेक कार्यकर्तेही उपस्थित होते.

या निकालाचे राजकीय महत्त्व मोठे मानले जात आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत मोठ्या प्रमाणावर विकासनिधीचे नियोजन आणि अंमलबजावणी केली जाते. त्यामुळे या संस्थांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे स्पष्ट वर्चस्व राहिल्याने आगामी काळात बारामती तालुक्यातील विकासकामांची गती कायम राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.







