Tuesday, June 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Khed Shivapur News: खेडशिवापूर परिसरात जुगार अड्ड्यावर राजगड पोलिसांची धडक कारवाई; २७ हजारांची रोकड जप्त

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 27 December 2025, 8:52
Khed Shivapur News: Rajgad police raid gambling den in Khed Shivapur area; Rs 27,000 cash seized

विशाल शिंदे

भोर : राजगड पोलीस स्टेशनच्या हद्दीत वाढत चाललेल्या (Khed Shivapur News) अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी पोलिसांकडून कारवाया सुरू असल्या तरी (Pune Crime) प्रत्यक्षात हायवे लगत व ग्रामीण भागात अजूनही दोन नंबरचे धंदे बिनधास्त सुरू असल्याचे चित्र समोर येत आहे. याच पार्श्वभूमीवर खेडशिवापूर परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर राजगड पोलिसांनी धडक कारवाई करत दोन जणांना रंगेहाथ पकडले असून त्यांच्याकडून २७ हजार रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. (Latest Marathi News)

ही कारवाई दि. २६ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी सुमारे सहा वाजता खेडशिवापूर (ता. हवेली, जि. पुणे) येथील कोंढणपूर फाटा परिसरात, मुक्तांगण हॉटेलच्या पाठीमागील मोकळ्या जागेत असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे छापा टाकण्यात आला असता जुगार खेळवला जात असल्याचे स्पष्ट झाले.

 

या कारवाईत बसवराज तुकाराम भुसारे (रा. पिंपरी-चिंचवड) हा राजु किसन कोंडे (रा. खेडशिवापूर) याच्या सांगण्यावरून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी जुगार खेळवत असल्याचे निष्पन्न झाले. आरोपींकडे विशिष्ट आकडे असलेले चार्ट असून, त्याच्या आधारे आकडे देत जुगार खेळवला जात असल्याचे तपासात उघड झाले. छाप्यात २७ हजार रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संबंधितांवर महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार कारवाई करण्यात आली असून पुढील तपास राजगड पोलीस स्टेशन करत आहे.

मात्र या एका कारवाईपुरतेच समाधान मानून चालणार नाही, अशी तीव्र प्रतिक्रिया आता स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे. राजगड पोलीस स्टेशनच्या हद्दीत हायवेच्या लगत तसेच काही ग्रामीण भागांमध्ये जुगार, अवैध व्यवसाय व इतर दोन नंबरचे धंदे मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. विशेषतः हायवे परिसरात मोकळ्या जागा, हॉटेलच्या पाठीमागे व तात्पुरत्या शेडमध्ये असे धंदे खुलेआम सुरू असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनत आहे.

“एक-दोन कारवायांपुरते मर्यादित न राहता राजगड पोलीस स्टेशनने या अवैध धंद्यांवर कायमस्वरूपी आणि कठोर आळा घालावा. हायवे पट्ट्यात सुरू असलेल्या सर्व दोन नंबरच्या धंद्यांचे विशेष सर्वेक्षण करून त्यांचा समूळ नायनाट करावा,” अशी ठाम मागणी नागरिकांकडून होत आहे.

या गंभीर परिस्थितीची पोलीस अधीक्षक कार्यालयाने तातडीने दखल घ्यावी आणि राजगड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अवैध धंद्यांबाबत ठोस, व्यापक व परिणामकारक कारवाईचे आदेश द्यावेत, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. अन्यथा भविष्यात सामाजिक गुन्हेगारी वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही, अशी चिंता व्यक्त होत आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुणे ते शिर्डी नवी रेल्वे लवकरच होणार सुरु; बस-खाजगी वाहनांच्या कटकटीतून प्रवाशांची सुटका

Tuesday, 16 June 2026, 13:29

नीट फेरपरीक्षेसाठी केंद्र सरकार ‘ॲक्शन मोड’ मध्ये; पेपरफुटी रोखण्यासाठी टेलिग्रामवर बंदी

Tuesday, 16 June 2026, 13:16

राजगड पोलिसांचा ‘मिशन क्लीन’, अवैध धंद्यांविरोधात पीआय संतोष जाधव आक्रमक

Tuesday, 16 June 2026, 12:35

भोर-राजगडमधील ताडी विक्रीची सखोल चौकशी करा! अल्पवयीनाकडून झालेल्या खूनप्रकरणानंतर ताडी विक्री केंद्रांवर संयुक्त कारवाईची नागरिकांची मागणी

Tuesday, 16 June 2026, 12:29

राजगड पोलिसांचा धडाकेबाज ‘सपाटा’; नवीन पोलीस निरीक्षकांच्या पदभार स्वीकारताच मटका अड्ड्यावर कारवाईचा दणका

Tuesday, 16 June 2026, 12:23

सह्याद्री हॉस्पिटलचे फुफ्फुसरोग तज्ज्ञ डॉ. नाना कुंजीर यांच्यावर रुग्णाच्या मुलाकडून हल्ला

Tuesday, 16 June 2026, 12:14
Next Post
Ajit Pawar: Discussions with Sharad Pawar fell through and Ajitdada was 'unreachable'; Dada suddenly disappeared without security, without a pilot car, leaving the convoy...

Ajit Pawar: शरद पवारांशी चर्चा फिसकटली अन् अजितदादा 'नॉट रिचेबल'; विना सुरक्षा, विना पायलट कार, ताफा सोडून दादा अचानक गायब...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.