पुणे: पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतन अग्रवाल याच्या हत्येच्या घटनेने संपूर्ण देशाला मोठा धक्का बसला आहे. ज्या कुटुंबात लग्नाची लगबग सुरू होती, तिथे आता दुःखाचे वातावरण आहे. फेब्रुवारी महिन्यात केतन आणि सिया गोयल यांचा साखरपुडा झाला होता आणि नोव्हेंबरमध्ये त्यांचा विवाह होणार होता. या लग्नाच्या तयारीसाठी जयपूरमध्ये १४ कोटी रुपयांचा महाल आणि २ खासगी विमानेबुक करण्यात आली होती. मात्र, सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी कारस्थान रचून केतनला लोहगडावरून खाली ढकलून त्याची हत्या केली.

सध्या या अमानवी कृत्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात असून, आरोपी सिया आणि चेतनला फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे. दरम्यान, या प्रकरणात एक अत्यंत वादग्रस्त घटना समोर आली आहे. प्रियांका देशमुख या महिलेने ट्विटरद्वारे सिया गोयलला पाठिंबा देत तिच्या जामिनाची मागणी केली आहे. स्वतःला ‘सामाजिक-राजकीय भाष्यकार’ म्हणवणाऱ्या या महिलेने अत्यंत चुकीची आणि प्रक्षोभक विधाने केली आहेत.


पाहा पोस्ट:
Priyanka Deshmukh is celebrating Ketan Agarwal’s murder.@anarkaliofara
No wonder I just said #FEMINISMISCANCER
Join me in reporting her account.@PuneCityPolice pic.twitter.com/t8Y3rxRPcT
— Barkha Trehan 🇮🇳 / बरखा त्रेहन (@barkhatrehan16) June 24, 2026
तिचा दावा असा आहे की, सियाला तिच्या कुटुंबीयांनी जबरदस्तीने लग्नासाठी भाग पाडले होते आणि तिला फक्त उच्च शिक्षण पूर्ण करायचे होते. केतनचा मृत्यू अपघात असल्याचे सांगत तिने तपास यंत्रणांवर खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप केला आहे. इतकेच नाही, तर “केतन अग्रवालसोबत असेच व्हायला हवे होते” आणि “अरेंज मॅरेजचा शेवट असाच झाला पाहिजे,” अशा विकृत आणि हिंसक टिप्पणी तिने केली आहे. तसेच, सियाच्या वडिलांनीही रोषाचा सामना केला पाहिजे, असे तिने सांगितले आहे.
या महिलेच्या बेजबाबदार विधानांमुळे सोशल मीडियावर नागरिकांनी तीव्र निषेध नोंदवला आहे. अनेकांनी तिच्या मानसिकतेवर टीका करून तिला ‘विकृत’ म्हटले आहे. सध्या या खळबळजनक हत्येचा तपास पोलीस करत असून, आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.







