Friday, September 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

फुरसुंगीत मटका अड्ड्यावर काळेपडळ पोलिसांचा छापा; दोघे ताब्यात, ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 17 September 2026, 17:42

फुरसुंगी, ता. 17 : फुरसुंगी बाजार परिसरात सुरू असलेल्या कथित मटका जुगारावर काळेपडळ पोलिसांच्या तपास पथकाने छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले. या कारवाईत दोन मोबाईल फोन, रोख रक्कम आणि युनिकॉर्न मोटारसायकल असा एकूण 65 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी (ता. 16) दुपारी सव्वादोनच्या सुमारास करण्यात आली.

गोविंद अनंतराव वेदपाठक (वय 39, रा. सासवड, ता. पुरंदर) आणि राजू बाबुलाल यादव (वय 23, रा. फुरसुंगी) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी अजित सुभाष पवार (रा. फुरसुंगी) याच्यासह तिघांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमातील कलम 12 (अ) तसेच भारतीय न्याय संहिता कलम 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फुरसुंगी परिसरात मटका जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीषा निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने पंचांसह फुरसुंगी बाजार परिसरात पाहणी केली. त्यावेळी एका इसमाकडून मटका जुगाराचे आकडे मोबाईलमध्ये टाईप करून घेतले जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

पोलिसांनी तत्काळ छापा टाकून गोविंद वेदपाठक आणि राजू यादव यांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान वेदपाठक याने अजित पवार यांच्या सांगण्यावरून ‘कल्याण बाजार’ नावाचा मटका घेत असल्याचे सांगितल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. तर राजू यादव हा मटका खेळण्यासाठी आल्याचे सांगितल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

 

पोलिसांनी दोघांची झडती घेतली असता त्यांच्याकडून दोन मोबाईल फोन आणि 300 रुपये रोख रक्कम मिळून आली. वेदपाठक याच्या मोबाईलमधील व्हॉट्सॲप संभाषण तपासले असता अजित पवार यांच्या मोबाईल क्रमांकावर जुगाराचे आकडे, रक्कम आणि पावत्या पाठविल्याचे आढळल्याचे पोलिसांनी सांगितले.

या कारवाईत सुमारे 15 हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन, 300 रुपये रोख आणि 50 हजार रुपये किमतीची युनिकॉर्न मोटारसायकल असा एकूण 65 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्ती पंचनामा करून कारवाईची व्हिडिओग्राफी ई-साक्ष ॲपमध्ये करण्यात आल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलिस करीत आहेत.

 

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

शाहरुख, अजय देवगण अन् टायगर श्रॉफ अडचणीत! ‘विमल इलायची’च्या जाहिरातीप्रकरणी तुकाराम मुंढेंचा दणका; म्हणाले ‘ते सुपरस्टार असतील पण…..

Friday, 18 September 2026, 22:22

दोन लाखांचा वाद अन् शिरूरमध्ये रक्तरंजित थरार! पिस्तुलातून गोळी झाडून ३४ वर्षीय हरीश गंगावणे याचा खून; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 18 September 2026, 21:55

लोणी काळभोर पोलिसांकडून तडीपार गुन्हेगार पियुष भिसेला लोखंडी हत्यारासह अटक

Friday, 18 September 2026, 21:23

सतत मानसिक-शारीरिक छळ; हुंड्याची मागणी अन् अपमानास्पद वागणुकीला कंटाळून पुण्यात विवाहितेने उचललं टोकाचं पाऊल

Friday, 18 September 2026, 21:16

उरुळी कांचन येथे कॅनॉलच्या पाण्यात आढळला अनोळखी तरुणाचा मृतदेह; परिसरात खळबळ

Friday, 18 September 2026, 20:34

पुण्यात केअरटेकर महिलेचा काळाबाजार! वृद्ध आई आणि मुलाला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवून तब्बल १ कोटी ९५ लाखांची लूट

Friday, 18 September 2026, 20:30
Next Post

लोणी कंद येथे चिकनच्या मसाल्याच्या पुडीवरून वाद; दोन साथीदारांसह दुकानदाराला मारहाण करून साहित्याची तोडफोड

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp