प्रतिनिधी

आदित्य बोराटे
Indapur News: इंदापूर ता. 2 : आज ठिकठिकाणी मतदानाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील इंदापूरमध्ये मतदानावेळीस तणावाची परिस्थिती निर्माण झाली. प्राथमिक शाळा क्रमांक 2, नगरपरिषदेजवळील मतदान केंद्रावर दोन गटातील कार्यकर्त्यांमध्ये अचानक वादळ उठले. पाहता पाहता वाद चिघळला आणि दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकांत भिडले. काही क्षणांसाठी मतदान केंद्राबाहेरील वातावरण तणावपूर्ण बनले आणि मतदान केंद्रावर आलेल्या मतदारात संभ्रम पसरला. Local Body Election
घटनास्थळी असणाऱ्या पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत दोन्ही गटांतील सदस्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. वाढता गोंधळ टाळण्यासाठी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत वाद तात्काळ मिटवला. या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेमुळे काही वेळासाठी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांनी वेळेवर केलेल्या कारवाईमुळे मतदान प्रक्रिया पुन्हा सुरळीत सुरू करण्यात आली.
मतदानाच्या वेळीस अशी घटना घडल्यामुळे इंदापूरमधील निवडणूक प्रक्रियेतील सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे. स्थानिक स्वराज संस्था निवडणूक शांततेत पार पाडावी याकरिता सर्वत्र पोलिसांचा कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे.






