पुणे: पुणे (Pune News) जिल्ह्यात मतदान प्रक्रिया सुरू असतानाच, एका केंद्रावरील खळबळजनक प्रकारामुळे निवडणुकीच्या नियमांचे गंभीर उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पुण्यातील भोर नगरपरिषद येथील मतदान केंद्रावर काही नागरिकांनी EVM मशीनला हळद-कुंक लावून पूजा करत आरती केल्याचे समोर आले आहे. ही कृती निवडणूक आयोगाच्या नियमांचे उल्लंघन करणारी आहे. या अनपेक्षित प्रकारामुळे भोरमधील मतदान केंद्रावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.

घटनेची माहिती मिळताच निवडणूक आयोगाने या प्रकाराची दखल घेतली आणि कोणतीही विलंब न लावता तात्काळ कारवाई केली. EVM ची पूजा करणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया त्वरित सुरू करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यामुळे, आयोगाने या मतदान केंद्रावरील केंद्रप्रमुख यांना पदावरून हटवून आयोगाने त्यांच्या जागी नवीन केंद्रप्रमुखची नियुक्ती केली. दरम्यान, मतदान प्रक्रिया पुन्हा सुरु करण्यात आली.
दरम्यान, EVM मशीनला हळद-कुंक लावून पूजा करून आरती करण्यामागे नेमका काय उद्देश होता ते अद्याप समोर आले असून पुढील तपास सुरु आहे.






