Wednesday, September 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मनोहर मामा भोसले प्रकरणात दत्तकला इन्स्टिट्यूटमार्फत अवैध पैशांची विल्हेवाट; दोघे अटकेत

सागर जगदाळेby सागर जगदाळे
Sunday, 16 August 2026, 17:44

सागर जगदाळे

भिगवण : भोंदूबाबा मनोहर मामा भोसले याच्या अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोण्याच्या कृत्यातून मिळालेल्या अवैध पैशांची विल्हेवाट लावणाऱ्या दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष प्राध्यापक रामदास झोळ व त्यांच्या इतर साथीदारांचा गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी कारवाईचा वेग वाढवला आहे. या प्रकरणात रामदास झोळ यांना मदत करणारे त्यांचे साथीदार राजेंद्र गोकुळ हुंबे आणि लक्ष्मीकांत मन्मथ लिगाडे यांना पोलिसांनी अटक केली आहे. दोन्ही आरोपींना १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत पोलिस कोठडी रिमांड मिळाली आहे.

या प्रकरणी २३ एप्रिल २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून, मुख्य आरोपी मनोहर ऊर्फ मामा चंद्रकांत भोसले व त्याच्या इतर साथीदारांविरुद्ध सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात एकूण सहा गुन्हे दाखल आहेत. गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन सोलापूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी व अंमलदारांचे विशेष एसआयटी पथक स्थापन करण्यात आले आहे.

या विशेष पथकाने केलेल्या तपासात आतापर्यंत एकूण २३ आरोपी निष्पन्न झाले असून, त्यापैकी १० आरोपींना अटक करण्यात आली आहे. तपासादरम्यान मुख्य आरोपी मनोहर मामा भोसले याने अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोण्यासारख्या अघोरी पूजेच्या माध्यमातून अनेक पीडितांची फसवणूक करून त्यातून मिळालेल्या अवैध पैशांची विल्हेवाट दत्तकला इन्स्टिट्यूट (शिक्षण संस्था), स्वामी चिंचोली, दौंड, पुणे येथील संस्थापक अध्यक्ष रामदास झोळ यांच्या माध्यमातून लावत असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

 

या तपासाच्या आधारे रामदास झोळ यांना या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे. तसेच त्यांच्या इन्स्टिट्यूटमध्ये त्यांना मदत करणाऱ्या इतर साथीदारांचाही गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्याने राजेंद्र गोकुळ हुंबे व लक्ष्मीकांत मन्मथ लिगाडे यांना अटक करण्यात आली. दोन्ही आरोपींची पोलिस कोठडीत चौकशी सुरू असून, दत्तकला इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष रामदास झोळ यांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.

दरम्यान, या गुन्ह्याच्या तपासात दत्तकला इन्स्टिट्यूटमधील आयकरप्रकरणातील महत्त्वाच्या नोंदी ठेवण्यात आलेले रजिस्टर, कॉम्प्युटर व इतर साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. या जप्त साहित्याच्या आधारे गुन्ह्यातील इतर पाहिजे असलेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.

मनोहर मामा भोसले प्रकरणातील अवैध पैशांच्या व्यवहाराची दिशा आणि त्यामागील साखळी तपासण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणात आणखी कोणते धागेदोरे समोर येतात, तसेच आणखी कोणावर कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक राहुल गरड करीत आहेत.

 

सागर जगदाळे

सागर जगदाळे

अडीज वर्ष दैनिक पुण्यनगरी काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये भिगवण येथील प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे. शैक्षणिक क्षेत्रातील बातम्या लिहिण्याचा खूप मोठा अनुभव आहे.

ताज्या बातम्या

रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान; ‘राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव’ म्हणताच वाद पेटला..

Tuesday, 29 September 2026, 23:05

मुंबईच्या पॉश एरियात भरधाव कारचा कहर! तिघांना उडवलं; पत्नीच्या डोळ्यांसमोर पतीचा दुर्दैवी अंत

Tuesday, 29 September 2026, 22:22

पूजा खेडकर प्रकरणात मोठी कारवाई! वडील दिलीप खेडकर यांच्या घरावर ACBचा छापा,नेमकं काय सापडलं?

Tuesday, 29 September 2026, 22:04

भरदिवसा भाजप नेत्याच्या पुतण्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला! 16-17 जणांनी घेरून बेदम मारहाण

Tuesday, 29 September 2026, 21:22

कारेगावात पाण्याच्या प्लांटमध्ये झालेल्या गोळीबारात तरुणाचा खून

Tuesday, 29 September 2026, 19:50

कोट्यवधींच्या घोटाळ्याची फाईल पुन्हा उघडणार? नीरव मोदीचा साथीदार UAEतून भारतात,,CBIच्या ताब्यात

Tuesday, 29 September 2026, 19:32
Next Post

रस्त्यावरून जाणाऱ्या माय-लेकाला ८-१० कुत्र्यांच्या टोळक्यानं घेरलं! अचानक हल्ला करत संपूर्ण शरीराचे लचके तोडले अन्...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp