Friday, July 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘मी तुझ्याशी लग्न करणार’… गोड बोलून विश्वास जिंकला अन् काही दिवसांतच पुण्यातील आयटी इंजिनिअर तरुणीला घातला 4.35 लाखांचा गंडा

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 23 July 2026, 8:38

पुणे: पुण्यातील चंदननगर परिसरातून सायबर फसवणुकीची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उच्चशिक्षित आणि चांगल्या पगारावर काम करणाऱ्या एका २५ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून सायबर भामट्याने तब्बल 435000 रुपयांचा चुना लावला आहे. या प्रकरणी पीडित तरुणीने पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही तरुणी वडगाव शेरी परिसरातील सोमनाथनगर येथील एका खाजगी हॉस्टेलमध्ये राहून मोठ्या आयटी कंपनीत नोकरी करते. योग्य जोडीदार शोधण्यासाठी तिने एका मॅट्रिमोनिअल वेबसाईटवर आपले प्रोफाईल तयार केले होते. फेब्रुवारी 2026 मध्ये एका सायबर चोराने तिच्याशी संपर्क साधला. आपण रशियातील मॉस्को शहरात मोठ्या हुद्द्यावर नोकरी करत असल्याची खोटी माहिती त्याने दिली आणि तरुणीचा विश्वास जिंकला.

काही दिवस गोड बोलून आणि लग्नाचे स्वप्न दाखवून त्या भामट्याने तरुणीला आपल्या जाळ्यात ओढले. त्यानंतर एक दिवस अचानक फोन करून त्याने आपली प्रकृती बिघडल्याचे नाटक केले. छातीत तीव्र वेदना होत असून उपचारासाठी तातडीने पैशांची गरज असल्याचे सांगत त्याने तरुणीकडे भावनिक साद घातली. आपला भावी जोडीदार परदेशात संकटात सापडला आहे, या विचाराने घाबरलेल्या त्या तरुणीने कोणतीही शहानिशा न करता तात्काळ ऑनलाइन माध्यमातून 435000 रुपये आरोपीने सांगितलेल्या खात्यात पाठवून दिले.

 

पैसे मिळाल्यानंतर त्या भामट्याने तिचा फोन नंबर बंद केला आणि सर्व संपर्क तोडला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणीच्या पायाखालची जमीन सरकली. तिने तात्काळ चंदननगर पोलीस ठाण्यात जाऊन सर्व प्रकार सांगितला. सध्या पोलीस या प्रकरणी तांत्रिक पुराव्यांच्या आधारे त्या भामट्याचा कसून शोध घेत आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

मुसळधार पावसात एकटी तरुणी पोलिसांच्या व्हॅनसमोर उभी ठाकली; पाहा थरारक व्हायरल Video

Thursday, 23 July 2026, 22:58

“जनता मालक अन् शिक्षणमंत्री सेवक… राजीनामा द्यायलाच हवा!” अण्णा हजारेंच्या भूमिकेने वाढवली सरकारची धडधड

Thursday, 23 July 2026, 22:06

पुण्यात मुसळधार पावसामुळे मोठे रस्ते खचले! राजगड तालुक्यातील वाहतूक तडकाफडकी बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश

Thursday, 23 July 2026, 21:11

विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज महागात पडणार! एक जिल्हा, एक दिवस, एक मागणी; CJP ची उद्या संपूर्ण देशात ‘देशव्यापी आंदोलना’ची हाक

Thursday, 23 July 2026, 20:28

हवामान खात्याची मोठी चेतावणी! पुण्यात पावसाचा हाहाकार माजणार? जाणून घ्या हवामान तज्ज्ञांचा मोठा गौप्यस्फोट

Thursday, 23 July 2026, 19:27

सणसवाडीतील कंपनीतून ८०० लिटर डिझेल चोरीचा पर्दाफाश; दोन सराईत चोरटे जेरबंद

Thursday, 23 July 2026, 19:21
Next Post

इराण हादरले! अमेरिकेचे सलग 12व्या रात्रीही हल्ले सुरूच; जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.