Saturday, June 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘केतनशी लग्न नको’ असं कधीच सांगितलं नव्हतं; सियाला भावानेच तोंडावर पाडलं; पोलिसांसमोर मोठा खुलासा

Shreya Varkeby Shreya Varke
Saturday, 27 June 2026, 12:55

पुणे: पुणे येथील केतन अग्रवाल हत्याकांडाचा तपास आता एका महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचला आहे. या प्रकरणातील आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांना पोलिसांनी लोहगड किल्ल्यावरील घटनास्थळी नेऊन सखोल चौकशी केली. काल रात्री ११ वाजता दोन्ही आरोपींना गडाच्या पायथ्याशी आणून, त्यांनी हत्येच्या दिवशी नक्की कोणता मार्ग वापरला होता, याची पोलिसांनी उलटतपासणी केली. आता पोलीस या कटाचा छडा लावण्यासाठी सियाच्या कुटुंबीयांचे जबाब नोंदवण्यास प्राधान्य देत आहेत.

या तपासादरम्यान सियाचा भाऊ साहिल गोयल याने पोलिसांना धक्कादायक माहिती दिली आहे. सियाने आपल्या कुटुंबीयांना केतन अग्रवालशी लग्न करण्याची इच्छा नाही, असे कधीही सांगितले नव्हते. उलट, ती लग्नासाठी आनंदाने तयार असल्याचे भासवून सर्वांच्या डोळ्यात धूळ फेकत होती. जर तिने सुरुवातीलाच लग्नाला विरोध दर्शवला असता, तर तिच्या कुटुंबीयांनी तिच्यावर लग्नाची सक्ती केली नसती, असे साहिलने स्पष्ट केले आहे. यामुळे सियाचा ‘कुटुंबाच्या दबावामुळे हे केले’ हा दावा आता पूर्णपणे खोटा ठरला आहे.

सिया आणि चेतन यांची ओळख सियाचा भाऊ साहिल आणि चेतन यांच्यातील क्रिकेट मैत्रीमुळे झाली होती. साहिलसोबत क्रिकेट खेळायला जाताना सियाची चेतनशी ओळख झाली आणि पुढे त्याचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले. पोलिसांच्या तांत्रिक तपासात असे आढळले आहे की, गेल्या काही महिन्यांत सिया आणि चेतन यांच्यात तब्बल 2,040 फोन कॉल्स झाले असून, त्यांचा संवाद सुमारे 238 तासांचा होता.

 

केतन अग्रवालचे टक्कल असणे आणि तो बोलताना अडखळणे या गोष्टी सियाला आवडत नव्हत्या. हे माहीत असूनही ती केतनशी लग्नाचे नाटक करत होती, कारण तिचे प्रेम चेतनवर होते. अखेर, 18 जून रोजी वाढदिवसाच्या बहाण्याने तिने केतनला लोहगड किल्ल्यावर नेले आणि तिथे आधीच दबा धरून बसलेल्या चेतनच्या मदतीने त्याला खोल दरीत ढकलून निर्घृण हत्या केली. आता पोलीस या संपूर्ण कटातील प्रत्येक दुवा तपासत असून, लवकरच यातील सर्व सत्य समोर येईल.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

‘आई गं माझं पोट दुखतंय” म्हणून दवाखान्यात नेलं अन् बाळ घेऊनंच घरी आले; १५ वर्षीय शाळकरी मुलीसोबत घडलं भयंकर…

Saturday, 27 June 2026, 15:52

काय रे, तुला मराठी वाचता येत नाही? 11 वर्षीय मुलाला गजाला बांधून बेदम मारहाण, सावत्र आईसह तिघांवर गुन्हा दाखल

Saturday, 27 June 2026, 15:48

दौंड पोलिसांची मोठी कारवाई; विनापरवाना ५६ गॅस सिलेंडरसह सुपर कॅरी नाकाबंदीत जप्त

Saturday, 27 June 2026, 15:41

आठवडे बाजारात पोलिसांची कडक नजर; चोरीला आळा, वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर धडक कारवाई

Saturday, 27 June 2026, 15:34

कुर्डुवाडीहून परतताना तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू; अज्ञात वाहनचालकाविरुद्ध यवत पोलिसांत गुन्हा

Saturday, 27 June 2026, 15:33

कानगाव येथे दहा हजारांच्या वादातून लोखंडी काठीने डोक्यात वार; उरुळी कांचन येथील एकासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 27 June 2026, 15:21
Next Post

पुणे रेल्वेचा 9 तासांचा मेगाब्लॉक; मुंबई-पुणे मार्गावरील अनेक गाड्या रद्द, जाणून घ्या सविस्तर माहिती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.