Sunday, June 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

हवेली दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक 20 बंद असून अजूनही तीन दिवस बंद राहणार; नागरिकांचे व्यवहार ठप्प, प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 12 February 2026, 17:53

लोणी काळभोर, ता. 12: आंबेगाव (पुणे) येथील हवेली दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक 20 हे गेल्या दोन दिवसांपासून बंद असल्याने नागरिकांचे अत्यावश्यक दस्त नोंदणी व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले आहेत. प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका थेट सामान्य नागरिकांना बसत असून, घर, प्लॉट व शेतजमिनींच्या खरेदी-विक्री व्यवहारांवर मोठा परिणाम झाला आहे. आर्थिक नुकसानासह नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. (Haveli Secondary Registrar Office)

या कार्यालयातील सहाय्यक दुय्यम निबंधक काही दिवसांपूर्वी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या कार्यकाळात उलटसुलट कारभार झाल्याची जोरदार चर्चा असून, त्या पार्श्वभूमीवर पुढील अधिकारी अडचणीत येतील, अशी भीती कर्मचाऱ्यांत पसरली आहे. “येथे पदभार स्वीकारल्यास नोकरी धोक्यात येईल आणि आपणच अडचणीत सापडू,” या मानसिकतेमुळे गेल्या दोन दिवसांपासून एकाही अधिकाऱ्याने चार्ज स्वीकारलेला नाही, ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात पुणे शहरासह आजूबाजूच्या अनेक गावांचा समावेश होतो. दररोज शेकडो नागरिक नोंदणीसाठी येत असतात. मात्र कार्यालय बंद असल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. अनेकांनी कर्ज प्रक्रिया पूर्ण केली असूनही दस्त नोंदणी रखडली आहे. लग्न, गृहप्रवेश, व्यावसायिक करार अशा महत्त्वाच्या तारखा अडकल्याने संतापाचा उद्रेक होत आहे.

 

विशेष म्हणजे, वरिष्ठ स्तरावरून अद्याप कायमस्वरूपी पर्यायी नियुक्ती करण्यात आलेली नाही. ‘डिजिटल इंडिया’ व ‘सुलभ सेवा’चा गजर करणाऱ्या शासनाच्या कारभारावर यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एका अधिकाऱ्याच्या सेवानिवृत्तीनंतर संपूर्ण कार्यालय बंद पडणे हे प्रशासनाचे गंभीर अपयश असल्याची तीव्र प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.

दरम्यान, तातडीने नवीन सहाय्यक दुय्यम निबंधकाची नियुक्ती करून कार्यालय सुरू करावे, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिक व व्यावसायिकांनी दिला आहे. महसूल व नोंदणी विभागाने त्वरित हस्तक्षेप करून नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.

कोट :

“हवेली दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक 20 साठी तात्पुरत्या स्वरूपात एका सहाय्यक दुय्यम निबंधकाची नेमणूक करण्यात आली होती. मात्र त्यांची तब्येत बिघडल्याने ते आजारी आहेत. सध्या तेथे कोणीही काम करत नाही. आमच्याकडे सध्या सहाय्यक दुय्यम निबंधक उपलब्ध नाही. सोमवारपासून नेमणूक करून काम सुरू करू.”

– संतोष हिंगाणे (सहाय्यक जिल्हा निबंधक, पुणे)

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

आरटीई प्रवेश प्रक्रियेला दिलासा; प्रतीक्षा यादीच्या दुसऱ्या टप्प्यास १९ जूनपर्यंत मुदतवाढ

Sunday, 14 June 2026, 13:35

पौड घाटात विवस्त्र तरुणाचा धिंगाणा; कारवर उड्या मारत सनरूफ फोडले

Sunday, 14 June 2026, 13:23

पुण्यात मध्यरात्री घडलं भयंकर! अंधाराचा फायदा घेत तरुणाचा निर्घृण खून; डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घातला अन्…

Sunday, 14 June 2026, 13:18

पुण्यातील फिनिक्स मॉलमध्ये बॉलीवूड स्टार्सना धक्काबुक्की; ‘कॉकटेल २’च्या म्युझिक लॉन्चच्या कार्यक्रमात गोंधळ

Sunday, 14 June 2026, 12:43

रिंग रोड लगतच्या ११७ गावांचे नियोजन आता पुन्हा ‘पीएमआरडीए’कडे; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या बैठकीत निर्णय

Sunday, 14 June 2026, 12:16

Fursungi Ganja Trafficker Arrested : फुरसुंगीत ६०९ ग्रॅम गांजासह युवक जेरबंद

Sunday, 14 June 2026, 11:18
Next Post
Sunetra Pawar

Sunetra Pawar : राष्ट्रवादीची धुरा आता सुनेत्रा पवारांकडे! दिल्लीत मोदी-शाहांसोबत ४० मिनिटे खलबतं; पार्थ यांच्या उमेदवारीला भाजपचा हिरवा कंदील?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.