Wednesday, July 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यातील फिनिक्स मॉलमध्ये बॉलीवूड स्टार्सना धक्काबुक्की; ‘कॉकटेल २’च्या म्युझिक लॉन्चच्या कार्यक्रमात गोंधळ

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 14 June 2026, 12:43

पुणे : विमाननगर येथील फिनिक्स मॉलमध्ये शुक्रवारी सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या एका चित्रपटाच्या संगीत अनावरण कार्यक्रमादरम्यान मोठी गर्दी उसळल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. कार्यक्रमासाठी बॉलिवूड कलाकार शाहिद कपूर, कृती सॅनन आणि रश्मिका मंदाना उपस्थित होते. मात्र, चाहत्यांची अनियंत्रित गर्दी वाढल्याने कार्यक्रम काही काळ विस्कळीत झाला.

मॉलमधील ‘अव्हेन्यू ऑफ स्टार्स’ परिसरात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असल्याने मोठ्या संख्येने चाहते मॉलमध्ये दाखल झाले होते. आपल्या आवडत्या कलाकारांना जवळून पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. कलाकार मंचावर आल्यानंतर चाहत्यांचा उत्साह वाढला आणि काही ठिकाणी सुरक्षेच्या बॅरिकेड्सवरही दबाव निर्माण झाला.

गर्दी वाढत गेल्याने सुरक्षा यंत्रणेला परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. काही जणांनी बॅरिकेड्स ओलांडून मंचाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केल्याने गोंधळ निर्माण झाला. या धावपळीत काही छायाचित्रकार आणि व्हिडिओ पत्रकारांना किरकोळ दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे.

 

परिस्थिती बिघडण्याची शक्यता लक्षात घेऊन आयोजकांनी कार्यक्रम लवकर आटोपता घेतला. कलाकारांना सुरक्षा रक्षकांच्या मदतीने सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. कोणतीही गंभीर दुर्घटना घडली नसली तरी गर्दी व्यवस्थापनाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

प्रत्यक्षदर्शींच्या मते, कार्यक्रमासाठी अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी झाल्याने सुरक्षेवर ताण आला. कलाकारांच्या येण्या-जाण्यासाठी स्वतंत्र मार्ग आणि अधिक प्रभावी गर्दी नियंत्रण व्यवस्था असती, तर गोंधळ टाळता आला असता, अशी प्रतिक्रिया काही उपस्थितांनी व्यक्त केली.

दरम्यान, कार्यक्रमादरम्यान झालेल्या गर्दीचे आणि गोंधळाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्याची शहरात चर्चा सुरू आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

नवी मुंबईत प्रसूतीदरम्यान आई-बाळाचा मृत्यू; चुकीच्या इंजेक्शनचा आरोप

Wednesday, 1 July 2026, 22:01

इंधन दरात मोठी घट! पेट्रोल-डिझेल स्वस्त, इंधन विक्रीवरील निर्बंधही हटवले; व्यावसायिक सिलेंडर ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त

Wednesday, 1 July 2026, 21:10

पालकांनो, लक्ष द्या! उद्यापासून पुण्यातील शाळांच्या वेळा बदलल्या; पुणे शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

Wednesday, 1 July 2026, 20:30

कारेगाव जबरी चोरी प्रकरणाचा २४ तासांत छडा! सराईत आरोपी रांजणगाव MIDC पोलिसांच्या जाळ्यात

Wednesday, 1 July 2026, 19:52

महात्मा फुले वाडा वादाच्या भोवऱ्यात! मेधा कुलकर्णींच्या वटपौर्णिमेच्या पूजेवरून सुषमा अंधारे आक्रमक

Wednesday, 1 July 2026, 19:32

रक्षक की भक्षक? टॅक्सी चालकाला भर चौकात धक्काबुक्की; पोलिसांच्या ‘सिंघमगिरी’वर प्रश्नचिन्ह

Wednesday, 1 July 2026, 18:44
Next Post

पुण्यात मध्यरात्री घडलं भयंकर! अंधाराचा फायदा घेत तरुणाचा निर्घृण खून; डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घातला अन्...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.