अक्षय टेमगिरे

शिरूर : कारेगाव परिसरात भंगार गोळा करून उदरनिर्वाह करणाऱ्या महिलेची चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला रांजणगाव MIDC पोलिसांनी अवघ्या २४ तासांत अटक करत गुन्ह्याचा छडा लावला आहे. या प्रकरणात आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट कार आणि चाकू जप्त करण्यात आला असून न्यायालयाने त्याला ६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

दि. २७ जून २०२६ रोजी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास कारेगाव परिसरात भंगार गोळा करून उपजीविका करणाऱ्या संगीता परमेश्वर शिंदे रा. ढवळगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर ही महिला कारेगाव मजूर अड्ड्यावरून वाहनाने शिरूरकडे येत होत्या. यावेळी वाहनातील एका अनोळखी व्यक्तीने त्यांना चाकूचा धाक दाखवत गळ्यातील व कानातील सुमारे ८० हजार रुपये किमतीचे ८ ग्रॅम सोन्याचे दागिने जबरदस्तीने काढून घेतले. त्यानंतर आरोपीने महिलेला शिरूर बायपास येथे उतरवून पसार झाला होता.
यानंतर संबंधित महिला एका ओळखीच्या व्यक्तीसोबत मोटारसायकलवरून गावी निघाल्या असता त्यांच्या दुचाकीला टेम्पोची धडक बसली आणि त्या अपघातात दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला. मात्र अपघातापूर्वी त्यांनी आपल्या मुलगा प्रभू परमेश्वर शिंदे याला फोन करून आपल्यासोबत जबरी चोरी झाल्याची माहिती दिली होती.ही माहिती मिळताच रांजणगाव MIDC पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने चौकशी सुरू केली होती.
महिलेच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाही पोलिसांनी संवेदनशील भूमिका घेत दि. २९ जून रोजी गुन्हा अनोळखी आरोपीविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला होता.तपासादरम्यान सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ आणि दीपक दळवी यांनी कारेगाव परिसर तसेच पुणे–नगर महामार्गावरील सुमारे २५ ते ३० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे विनोद अनिल जाधव वय ३६, रा. बाभुळस खुर्द, ता. शिरूर याने हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे.
पोलिसांनी आरोपीला दि. ३० जून रोजी रात्री अटक केली. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली MH 12 EG 2585 क्रमांकाची स्विफ्ट कार आणि चाकू जप्त करण्यात आला असून. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध यापूर्वी अपहरण, खून आणि जबरी चोरीचे गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी ६ जुलै पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे. या प्रकरणात मृत महिलेच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेचे आणि संवेदनशीलतेचे नातेवाईकांनी कौतुक केले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कुमार कदम, सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलीस कर्मचारी उमेश कुतवळ, योगेश गुंड, दीपक दळवी, संदीप भांड, नितीन दळवी, प्रतीक खरबज, पंडित मुंढे तसेच शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, विजय शिंदे आणि नितेश थोरात यांनी केलीअसून.
या या घटनेचा पुढील तपास रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे हे पुढील तपास करीत आहेत.






