Wednesday, July 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

इंधन दरात मोठी घट! पेट्रोल-डिझेल स्वस्त, इंधन विक्रीवरील निर्बंधही हटवले; व्यावसायिक सिलेंडर ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 1 July 2026, 21:10

पुणे: देशभरातील वाहनचालकांसाठी दिलासादायक बातमी आहे. नायरा एनर्जीने आपल्या देशभरातील पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्याची घोषणा केली आहे. नव्या दरानुसार पेट्रोल प्रतिलिटर 5 रुपये, तर डिझेल प्रतिलिटर 3 रुपये स्वस्त मिळणार आहे. कंपनीचे देशभरात सुमारे 7,000 पेट्रोल पंप असून, या सर्व ठिकाणी सुधारित दर लागू करण्यात आले आहेत.

गेल्या काही आठवड्यांत अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या होत्या. त्याचा परिणाम भारतातील इंधनाच्या दरांवरही झाला होता. या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात आली होती. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह वाहतूक आणि उद्योग क्षेत्रावर आर्थिक ताण वाढला होता.

दरम्यान, केंद्र सरकारने 1 जुलैपासून पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीवरील काही तात्पुरते निर्बंध हटवले आहेत. यापूर्वी व्यावसायिक वापरासाठी रिटेल पंपांवरून इंधन खरेदी करण्यावर मर्यादा घालण्यात आली होती. ब्लॅक मार्केटिंग रोखण्यासाठी आणि इंधनाचा गैरवापर टाळण्यासाठी हे निर्बंध लागू करण्यात आले होते. आता परिस्थिती पूर्ववत होत असल्याने हे निर्बंध मागे घेण्यात आले आहेत.

 

इंधनाबरोबरच व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरातही कपात करण्यात आली आहे. 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत 183.50 रुपये, तर 5 किलोच्या छोट्या सिलेंडरच्या दरात 13 रुपयांची घट करण्यात आली आहे. नव्या दरानुसार दिल्लीमध्ये 19 किलोचा सिलेंडर 2,930 रुपये, तर 5 किलोचा सिलेंडर 808.50 रुपयांना उपलब्ध होणार आहे.

इंधन आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरातील या कपातीमुळे व्यापारी, हॉटेल व्यवसाय, वाहतूक क्षेत्र तसेच सर्वसामान्य नागरिकांना काही प्रमाणात आर्थिक दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

नवी मुंबईत प्रसूतीदरम्यान आई-बाळाचा मृत्यू; चुकीच्या इंजेक्शनचा आरोप

Wednesday, 1 July 2026, 22:01

इंधन दरात मोठी घट! पेट्रोल-डिझेल स्वस्त, इंधन विक्रीवरील निर्बंधही हटवले; व्यावसायिक सिलेंडर ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त

Wednesday, 1 July 2026, 21:10

पालकांनो, लक्ष द्या! उद्यापासून पुण्यातील शाळांच्या वेळा बदलल्या; पुणे शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

Wednesday, 1 July 2026, 20:30

कारेगाव जबरी चोरी प्रकरणाचा २४ तासांत छडा! सराईत आरोपी रांजणगाव MIDC पोलिसांच्या जाळ्यात

Wednesday, 1 July 2026, 19:52

महात्मा फुले वाडा वादाच्या भोवऱ्यात! मेधा कुलकर्णींच्या वटपौर्णिमेच्या पूजेवरून सुषमा अंधारे आक्रमक

Wednesday, 1 July 2026, 19:32

रक्षक की भक्षक? टॅक्सी चालकाला भर चौकात धक्काबुक्की; पोलिसांच्या ‘सिंघमगिरी’वर प्रश्नचिन्ह

Wednesday, 1 July 2026, 18:44
Next Post

नवी मुंबईत प्रसूतीदरम्यान आई-बाळाचा मृत्यू; चुकीच्या इंजेक्शनचा आरोप

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.