पुणे : तुम्ही आतापर्यंत फिरता दवाखाना पहिला असेल, पण पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील भाटघर धरणात तरंगता दवाखाना सुरु करण्यात आला आहे. या तरंगत्या दवाखान्यातून रुग्णांना वैद्यकीय सेवा दिली जात आहे. भोरचे बिडीओ आणि तालुका आधिकिरी यांच्या हस्ते या तरंगत्या दवाखान्याचे पूजन करुन ते नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. विशेष बाब म्हणजे पावसाळा सुरु झाला कि, या तरंगत्या दवाखान्याची सेवा बंद करण्यात येते.

भोर पंचायत समीतीतर्फे -दरवर्षी आक्टोंबर महिन्यात ही आरोग्य सेवा सुरु करण्यात येते. भाटघर धरण क्षेत्रातील १६ गावांना या तरंगत्या दवाखान्याचा फायदा होणार आहे. आठवड्यातील बुधवार आणि शुक्रवार या दोन दिवशी तरंगता दवाखाना कार्यरत राहणार आहे. या तरंगत्या दवाखान्यामुळे भाटघर धरणाच्या आसपासच्या गावामध्ये राहणाऱ्या नागरिकांना याचा फायदा होणार आहे. या लाँचद्वारे धरणाच्या पलीकडच्या गावातील रुग्णांची सोय होणार असून आठवड्यातील बुधवार आणि शुक्रवार या दोन दिवशी ही लाँच उपलब्ध राहणार आहे.

भोर तालुक्यातील भाटघर धरण क्षेत्रामध्ये अतिदुर्गम भाग आहे. राज्य सरकारच्या वतीने येथील नागरिकांना उपचारासाठी बाहेरगावी किंवा मोठ्या शहरांमध्ये जाणे शक्य होत नाही. त्यामुळे येथे दरवर्षी ही लाँचद्वारे आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात येते. पावसाळ्याच्या काळात मात्र ही सेवा बंद करण्यात येते. दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात सेवा सुरू होते. या सेवेत वैद्यकीय पथकामध्ये लाँच ऑपरेटर यांच्यासह डॉक्टर आणि नर्स, शिपाई असतात.
असा असणार तरंगत्या दवाखान्याचा प्रवास
बुधवारी :
बोपे, कुंबळे, वाघमाची घुमट, सांगवी, डेरे, भुतोंडे
शुक्रवारी :
गुहिणी, खुलशी, चांदवणे, डेरे, भांड्रवली, मळे, सुतारवाडी, नानवळे





