Friday, August 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘मोफत’ बायोगॅस की १,६७२ कोटींचा भार? बीपीसीएलचा स्वखर्चाचा प्रस्ताव; महापालिकेची मोठ्या खर्चाची निविदा, निर्णयाकडे पुणेकरांचे लक्ष

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 14 August 2026, 11:13

डॉ. अशोक बालगुडे

पुणे: एका बाजूला कोणतीही टिपिंग फी किंवा वाहतूक खर्च न घेता बायोगॅस प्रकल्प उभारण्याची सरकारी कंपनी बीपीसीएलची तयारी, तर दुसऱ्या बाजूला त्याच क्षमतेच्या प्रकल्पासाठी तब्बल १ हजार ६७२ कोटी रुपयांचा संभाव्य खर्च! पुणे महापालिकेसमोर उभ्या असलेल्या या दोन पर्यायांपैकी प्रशासन कोणता स्वीकारणार, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

देवाची उरुळी येथील कचरा डेपोच्या जागेत दररोज ३०० टन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून बायोगॅस निर्मितीचा प्रकल्प उभारण्याची तयारी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने (बीपीसीएल) दर्शविली आहे. हा प्रकल्प कंपनी स्वखर्चाने उभारणार असून, महापालिकेने केवळ जागा उपलब्ध करून द्यावी, अशी भूमिका आहे. त्यानुसार संबंधित जागेच्या माती परीक्षणास पालिकेने परवानगी दिली आहे.

दुसरीकडे, महापालिकेने याच क्षमतेच्या प्रकल्पासाठी काढलेल्या निविदेत ६०० रुपये प्रतिटन टिपिंग फी आणि वाहतुकीसाठी प्रतिटन प्रतिकिलोमीटर सात रुपये असा खर्च प्रस्तावित आहे. कचरा ७५ किलोमीटरपर्यंत नेण्याची शक्यता धरल्यास वाहतुकीसह एका टन कचऱ्यावर सुमारे १,६५० रुपये खर्च येणार आहे. २० वर्षांच्या कालावधीत सात टक्के वार्षिक दरवाढ गृहीत धरल्यास हा खर्च सुमारे १,६७२ कोटी रुपयांवर जाणार आहे. याशिवाय प्रकल्पासाठी ५० कोटी रुपयांचे अर्थसहाय्यही प्रस्तावित आहे.

 

विशेष म्हणजे, नुकत्याच ५०० टन ओल्या-सुक्या कचरा प्रक्रियेच्या निविदेत पात्र ठरलेल्या कंपनीने दर कमी करून ७७२ रुपये प्रतिटन केला आहे. त्यामुळे एकीकडे कमी खर्चाचे पर्याय उपलब्ध होत असताना दुसरीकडे कोट्यवधींचा आर्थिक भार स्वीकारण्याची गरज आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.

महापालिकेच्या तिजोरीवर भार टाकण्यापूर्वी स्वखर्चाने प्रकल्प उभारण्याच्या बीपीसीएलच्या प्रस्तावाची तांत्रिक, आर्थिक आणि पारदर्शक पद्धतीने तपासणी करून निर्णय घ्यावा, अशी पुणेकरांची अपेक्षा आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर बादलवर हल्ला, खंजरने केला वार; पोलीस निरीक्षक संतोष केंद्रेंच्या धाडसाने टळला मोठा अनर्थ

Friday, 14 August 2026, 13:41

‘पुणे प्राईम न्यूज’च्या बातमीचा दणका! मृत्यूचा सापळा ठरलेले शिरुर बायपासचे अनधिकृत दुभाजक अखेर बंद

Friday, 14 August 2026, 13:26

बुलेट चोरायचा, सरकारी लोगो लावायचा अन् बिनधास्त फिरायचा! बारामतीत 23 वर्षीय तरुणाच्या कारनाम्याने पोलीसही चक्रावले; 30 लाखांच्या 19 दुचाकी जप्त

Friday, 14 August 2026, 13:20

‘पेपरफुटी’ नव्हे, विश्वासाची फुटलेली भिंत! शिक्षणाच्या बाजारात गुणवत्तेची बोली लागली तर समान संधीचा अर्थ काय?

Friday, 14 August 2026, 13:10

मांडीवर बसवलं, कानात मंत्र सांगितला अन्… पुण्यातील गुरुवर्यने अल्पवयीन मुलीवर लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप

Friday, 14 August 2026, 12:46

लोणी काळभोर येथील एमआयटी गेटसमोर भरधाव होंडा सिटी अंडरपासच्या कठड्यावर धडकली! कारचा चक्काचूर, चालकाने कार तिथेच सोडून ठोकली धूम

Friday, 14 August 2026, 11:49
Next Post

वाहनधारकांनो, आधी आधार-आरसी तपासा! नाव-पत्त्यात तफावत असेल तर ऑनलाइन कामं थेट अडकणार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.