Friday, September 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अनुदानित युरियासोबत विनाअनुदानित खताची सक्तीची विक्री? कडेठाणमध्ये कृषी विभागाची धडक कारवाई

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 14 August 2026, 11:34

यवत: अनुदानीत खताच्या विक्रीसोबत शेतकऱ्यांना विनाअनुदानीत खते व इतर कृषी निविष्ठा सक्तीने विक्री केली जात असल्याच्या संशयावरून कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय भरारी पथकाने कडेठाण (ता. दौंड) येथील आदित्य कृषी सेवा केंद्रावर १२ ऑगस्ट रोजी धडक तपासणी केली. या तपासणीत मोठ्या प्रमाणात युरिया व ऑरगॅनिक मॅन्युअरचा साठा आढळून आला. खताच्या बॅच क्रमांकांमध्येही विसंगती आढळल्याने संबंधित कंपनीविरुद्ध यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दशरथभाई दाभी सुरेशभाई असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी कैलास बाबासाहेब चव्हाण (वय ५६, कृषी अधिकारी निविष्ठा व गुण नियंत्रण, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, दौंड) यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या आदेशानुसार जिल्हास्तरीय भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या पथकात मोहीम अधिकारी, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक तसेच संबंधित तालुक्याचे कृषी अधिकारी गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक यांचा समावेश आहे. या पथकातील कैलास चव्हाण, मोहीम अधिकारी विनय दिलीपराव कदम आणि जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक धनंजय दिनकर पाटील हे १२ ऑगस्ट रोजी कडेठाण परिसरात कृषी निविष्ठांची तपासणी करीत होते. यावेळी आदित्य कृषी सेवा केंद्राची तपासणी करण्यात आली.

१०.१७ मेट्रिक टन युरिया आढळला

 

तपासणीदरम्यान Narmada Bio-Chem Limited, अहमदाबाद या कंपनीचा ४५ किलो वजनाच्या २२६ पोत्यांचा, म्हणजेच १०.१७ मेट्रिक टन निमकोटेड युरियाचा साठा आढळून आला. तसेच याच कंपनीच्या ५० किलो वजनाच्या १८४ बॅग, म्हणजेच ९.२० मेट्रिक टन ऑरगॅनिक मॅन्युअर (बायो-गोल्ड+) खताचा साठाही आढळला.

विशेष म्हणजे, या ऑरगॅनिक मॅन्युअरच्या बिलावर बॅच क्रमांक A2/BG/024/011 नमूद असल्याचे तपासणी पथकाच्या निदर्शनास आले. मात्र, प्रत्यक्ष साठवणूक गृहातील खताच्या बॅगवर A1/BG/026/017 आणि A1/BG/026/018 हे वेगळे बॅच क्रमांक आढळल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

शासनाच्या परिपत्रकाचा भंग केल्याचा आरोप

या बॅच क्रमांकांमधील विसंगतीच्या आधारे संबंधित खताचा पुरवठा शासनाच्या २० मे २०२६ रोजीच्या परिपत्रकाचा भंग करून करण्यात आल्याचे तपासणी पथकाच्या निदर्शनास आले, असा दावा फिर्यादीत करण्यात आला आहे. या प्रकरणी Narmada Bio-Chem Limited कंपनीचे संचालक मंडळ तसेच कंपनीचे केमिस्ट दशरथभाई दाभी सुरेशभाई यांच्याविरुद्ध कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

अत्यावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत गुन्हा

१२ ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे ५.४५ ते ७.५५ वाजण्याच्या दरम्यान कडेठाण येथील आदित्य कृषी सेवा केंद्रात झालेल्या तपासणीदरम्यान शासनाच्या परिपत्रकाचे तसेच अत्यावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ मधील कलम ३(२)(ड) मधील तरतुदींचे उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी कलम १० अन्वये यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, कृषी विभाग व पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, या कारवाईमुळे खत विक्रीतील अनियमितता, अनुदानीत खतासोबत विनाअनुदानीत खताची सक्तीची विक्री आणि खताच्या बॅच क्रमांकातील विसंगती याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या प्रकरणाच्या पुढील तपासात नेमकी वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

‘इकडे कशाला आलास?’ म्हणत तरुणाला बांबूने मारहाण; फुरसुंगीत तिघांविरोधात तक्रार

Friday, 11 September 2026, 16:30

‘शरीरसंबंधाच्या हेतूनेच तिनं ‘किस’ केलं’ पुण्यात 21 वर्षीय तरुणीवर ‘पोक्सो’ दाखल; लग्नाच्या आमिषाने मुलाला कॅफेत नेलं अन्…

Friday, 11 September 2026, 16:27

जरांगे–दीपके भेटीने राजकारण तापलं! लक्ष्मण हाकेंचा थेट हल्ला, ‘तो अजून बच्चा’

Friday, 11 September 2026, 16:15

पुण्यात दारूबंदीचा मुद्दा ऐरणीवर! हायकोर्ट संतापलं,‘मग कारवाई का होत नाही?’सरकारला थेट सवाल

Friday, 11 September 2026, 15:34

पुण्यात शताब्दी एक्सप्रेसखाली दिसला माणसाचा हात! भयानक आणि अंगावर काटा आणणाऱ्या दृश्याने खळबळ; नेमकं काय घडलं?

Friday, 11 September 2026, 15:29

पुण्यात राष्ट्रवादीला मोठा हादरा! सरपंचासह ६ सदस्य अपात्र; भाजे ग्रामपंचायतीत नाट्यमय राजकीय उलथापालथ

Friday, 11 September 2026, 15:05
Next Post

भावाच्या डोळ्यादेखत बहिणीला उचलून नेलं! लाल ब्रेझातून तरुणीचं अपहरण; दौंडमध्ये चौघांवर गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp