Monday, September 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पीएमआरडीएकडे तक्रार करा अन् ‘सेटलमेंट’मधून बक्कळ पैसा कमवा? अनधिकृत बांधकामांवरील कारवाईवर गंभीर प्रश्नचिन्ह!

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 18 August 2026, 18:57

पुणे, ता. 18 : “पीएमआरडीएकडे तक्रार करा, कारवाईची भीती दाखवा आणि नंतर सेटलमेंट करून बक्कळ पैसा कमवा…” अशा चर्चांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (PMRDA) कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाई करण्यासाठी तारीख निश्चित झाल्यानंतरही प्रत्यक्ष कारवाईच्या वेळी अधिकारी-कर्मचारी गैरहजर राहणे, तक्रारदारांवर तक्रार मागे घेण्यासाठी दबाव आणला जाणे आणि अनधिकृत बांधकामे नियमित करण्याच्या नावाखाली वेगवेगळ्या प्रक्रियांकडे वळविले जाणे, या प्रकारांमुळे पीएमआरडीएच्या कारवाईची पारदर्शकता संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

नांदूर (ता. दौंड) येथील मे. विशाखा इंडस्ट्रीज लिमिटेडच्या कथित अनधिकृत बांधकामावरील कारवाईवर प्रश्न उपस्थित झाले असतानाच, लोणी काळभोर (ता. हवेली) येथील गट क्रमांक 1631 मधील कथित अतिक्रमण हटवून संबंधित क्षेत्राचा ताबा देण्यासाठी प्रशासनाने तारीख निश्चित केली होती. मात्र, प्रत्यक्ष कारवाईच्या वेळी पीएमआरडीएच्या अतिक्रमण विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित नसल्याचा प्रकार समोर आला आहे.

यामुळे कारवाईची तारीख ठरविण्यापासून प्रत्यक्ष कारवाईपर्यंत नेमके काय घडते? असा सवाल उपस्थित होत आहे. कारवाईच्या नावाखाली नोटिसा बजावल्या जातात; मात्र त्यानंतर प्रकरणे अचानक थंडावतात, अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे. काही प्रकरणांमध्ये तक्रारदारांनी तक्रार मागे घ्यावी यासाठी कथितरीत्या ‘तडजोडी’चे प्रयत्न केले जात असल्याचेही बोलले जात आहे.

विशेष म्हणजे, अनधिकृत बांधकामाविरोधात तक्रार केल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्याऐवजी “अनधिकृत काम अधिकृत करण्यासाठी अर्ज करा” असा सल्ला दिला जात असल्याच्या तक्रारीही पुढे येत आहेत. त्यामुळे तक्रारदार, बांधकाम व्यावसायिक आणि प्रशासनातील काही घटक यांच्यातील कथित साटेलोट्याची चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.

 

674 गावांतील कारभारावर लक्ष कोण ठेवणार?

पीएमआरडीएच्या नियोजन क्षेत्रात पुणे जिल्ह्यातील मावळ, मुळशी, हवेली, भोर, दौंड, शिरूर, खेड, पुरंदर आणि वेल्हे या तालुक्यांतील संपूर्ण किंवा काही भागांचा समावेश होतो. अधिकृत माहितीनुसार या क्षेत्रात 674 गावांचा समावेश आहे. तसेच पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि तीन कॅन्टोन्मेंट बोर्डांचाही नियोजित क्षेत्रात समावेश होतो.
एवढ्या मोठ्या कार्यक्षेत्रात अनधिकृत बांधकामांवर कारवाईची जबाबदारी असताना नियम सर्वांसाठी समान आहेत का, की तक्रारीनुसार कारवाईची तीव्रता बदलते? हा प्रश्न आता नागरिक विचारू लागले आहेत.

दरम्यान, पीएमआरडीएने अशा सर्व प्रकरणांची स्वतंत्र चौकशी करून कारवाई निश्चित झाल्यानंतर अधिकारी प्रत्यक्ष घटनास्थळी का उपस्थित राहिले नाहीत, तक्रारी मागे घेण्यासाठी कोणी दबाव आणला का आणि अनधिकृत बांधकामे नियमित करण्याच्या नावाखाली कोणत्या प्रक्रिया राबविल्या गेल्या, याची माहिती सार्वजनिक करावी, अशी मागणी होत आहे. अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी असलेले प्राधिकरणच जर ‘सेटलमेंट’च्या चर्चेत सापडत असेल, तर मग कायद्याचा धाक राहणार तरी कुणाचा? हा सवाल आता पुणे जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे.

आर्थिक तडजोडीची जिल्ह्यात चर्चा

पीएमआरडीएकडे तक्रार करण्यालाच काही नागरिकांनी पैसे कमावण्याचे कथित साधन बनविल्याची चर्चा असून, तक्रार दाखल करायची, कारवाईची टांगती तलवार निर्माण करायची आणि त्यानंतर ‘सेटलमेंट’च्या माध्यमातून आर्थिक तडजोड करण्याचे प्रकार सुरू असल्याची जिल्ह्यातील नागरिकांमध्ये जोरदार चर्चा आहे.

“पीएमआरडीएकडून गेल्या चार महिन्यांत अनधिकृत बांधकामांविरोधात सुमारे १ हजार कारवाया, तसेच १५० हून अधिक अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई करण्यात आली आहे. नागरिकांनी घर अथवा जागा खरेदी करताना संबंधित बांधकाम अधिकृत आहे की नाही, याची खात्री करूनच व्यवहार करावा. तसेच नवीन बांधकाम करताना संबंधित प्राधिकरणाची अधिकृत परवानगी घेणे आवश्यक आहे. परवानगी न घेता करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांवर पीएमआरडीएकडून १०० टक्के कारवाई केली जाणार आहे.”

— हिम्मत खराडे  (उपायुक्त, अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभाग, पीएमआरडीए)

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

आकाशात आज घडला एक अनोखा चमत्कार! नाजूक चंद्रकोरीच्या अगदी जवळ चमकताना दिसला तेजस्वी शुक्रतारा

Monday, 14 September 2026, 21:35

विवाहितेसोबत प्रेमसंबंध अन् नंतर थरारक शेवट! बारामतीत स्वतःच्या डोक्यात गोळी झाडणाऱ्या १९ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

Monday, 14 September 2026, 20:56

१० वर्षांची चिमुकली अन् ४ नराधम! चॉकलेटचं आमिष दाखवत केलं नको ते कृत्य नंतर चिमुकलीला धमकी देत….

Monday, 14 September 2026, 20:08

पुणेकरांनो लक्ष द्या! १५ सप्टेंबर रोजी मध्यवर्ती भागातील वाहतूक वळवली; पर्यायी मार्गांची यादी जाहीर

Monday, 14 September 2026, 19:24

ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र बापू काळभोर यांची परिमंडळ ६ च्या समन्वयक पदी निवड

Monday, 14 September 2026, 18:46

पुणे-पिंपरीच्या बाह्यवळण रिंग रोडभोवतीच्या ११७ गावांचा पालटणार चेहरा; मेगा डेव्हलपमेंट प्लानचा मार्ग मोकळा

Monday, 14 September 2026, 18:24
Next Post

पुणे ग्रामीण दलातील बदलीचे आदेश कागदावरच? ‘जुने ठिकाण’सोडण्यास टाळाटाळ; 80 टक्के कर्मचारी अद्यापही जैसे थे!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp