Monday, August 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोर येथे हातात कोयता घेऊन दहशत माजविणारा तडीपार गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 10 August 2026, 16:44

लोणी काळभोर, ता. १०: दोन वर्षांसाठी तडीपार केलेले असतानाही लोणी काळभोरमध्ये परतलेल्या पियुष ऊर्फ युवराज भिसे (वय २२) याला हातात लोखंडी कोयता घेऊन दहशत माजवत असताना लोणी काळभोर पोलिसांनी ताब्यात घेतले. महादेव मंदिर परिसरात जखमी अवस्थेत आरडाओरड व शिवीगाळ करीत असलेल्या भिसेकडून पोलिसांनी लोखंडी कोयताही जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली.

पोलिस हवालदार आण्णा दिलीप माने यांनी सरकारतर्फे लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांना बातमीदारामार्फत तडीपार आरोपी पियुष ऊर्फ युवराज भिसे हा लोणी गावातील महादेव मंदिराजवळ हातात कोयता घेऊन दहशत करीत असल्याची माहिती ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास मिळाली.

या घटनेची माहिती मिळताच तपास पथकाचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार जगदाळे व पथकाने पंचांसह महादेव मंदिर परिसरात धाव घेतली. मंदिरासमोरील पडक्या घराजवळ भिसे हा जखमी अवस्थेत मोठमोठ्याने आरडाओरड आणि शिवीगाळ करीत हातात लोखंडी कोयता घेऊन असल्याचे पोलिसांना दिसले. पोलिसांनी त्याला सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास ताब्यात घेतले.

अंगझडतीत १९ इंची लोखंडी कोयता जप्त

पंचांसमक्ष घेतलेल्या अंगझडतीत भिसेकडून लोखंडी कोयता जप्त करण्यात आला. सुमारे १९ इंच लांबीचा, निळ्या प्लास्टिकच्या मुठीचा आणि एका बाजूने धार असलेला हा कोयता असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. त्याची अंदाजे किंमत २०० रुपये आहे. भिसे जखमी असल्याने त्याला प्राथमिक प्रक्रियेनंतर उपचारासाठी पोलिस बंदोबस्तात ससून रुग्णालयात पाठविण्यात आले.

 

दोन वर्षांसाठी तडीपार; तरीही लोणीत प्रवेश

पोलिसांच्या फिर्यादीनुसार, पोलीस उपायुक्त, परिमंडळ ६, पुणे शहर यांनी १ जून २०२६ रोजीच्या तडीपार आदेशानुसार भिसेला दोन वर्षांसाठी पुणे पोलीस आयुक्तालय, पिंपरी-चिंचवड आयुक्तालय आणि पुणे जिल्ह्याच्या हद्दीतून हद्दपार केले होते. तसेच पुणे शहरात शस्त्रे बाळगण्यास मनाई असतानाही भिसे कोणतीही सक्षम अधिकाऱ्याची किंवा न्यायालयाची पूर्वपरवानगी न घेता लोणीत आल्याचे पोलिसांच्या फिर्यादीत नमूद आहे.

‘मला चौघांनी मारहाण केली’-भिसेचा पोलिसांकडे दावा

दरम्यान, ताब्यात घेतल्यानंतर भिसेने पोलिसांना आपण जखमी कसे झालो याबाबत माहिती देताना नरेश ससाणे, कार्तिक जाधव, प्रज्वल शिंदे आणि दादा पाखरे यांनी मारहाण केल्याचे सांगितल्याचे फिर्यादीत नमूद आहे. त्यामुळे भिसे जखमी होण्यामागील नेमके कारण काय, याचाही तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, या प्रकरणी आरोपी पियुष ऊर्फ युवराज भिसे याच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ४(२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३) सह १३५, १४२ तसेच क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट कलम ३ व ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Loni Kalbhor News: ‘आखाड पार्टी’त तडीपार गुंडाला बेदम मारहाण, चौघांवर गुन्हा दाखल

Monday, 10 August 2026, 16:54

लोणी काळभोर येथे हातात कोयता घेऊन दहशत माजविणारा तडीपार गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात!

Monday, 10 August 2026, 16:44

जिल्हा कामगार उपायुक्ताला १ कोटी ७९ लाखांच्या साहित्य घोटाळ्यात अटक; कामगारांच्या हक्काचे साहित्य थेट खासगी लोकांना विकले..

Monday, 10 August 2026, 16:35

नवऱ्याला सोडून ती बॉयफ्रेंडसोबत राहायला गेली; संतापलेल्या नवऱ्याने रागाच्या भरात केलं भयानक कृत्य, पुण्यातील भयंकर प्रकार….

Monday, 10 August 2026, 15:59

तो एक साधा डिलिव्हरी बॉय पण पुण्यात घेतलं आलिशान घर; पैसे कमवण्यासाठी करायचा ‘तसला’ प्रकार; कारनामा ऐकून पोलिसही हैराण…

Monday, 10 August 2026, 15:31

भाजप आमदाराच्या ड्रायव्हरलाच दिली सुपारी! ‘आम्ही पैसे देतो, तू गोळ्या झाड’ म्हणत ऑफर दिली; राजकीय वर्तुळात खळबळ…..

Monday, 10 August 2026, 14:57
Next Post

Loni Kalbhor News: ‘आखाड पार्टी’त तडीपार गुंडाला बेदम मारहाण, चौघांवर गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.