पुणे : महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या 5 मतदारसंघांमधील (3 पदवीधर आणि 2 शिक्षक) जागांसाठी निवडणूक आयोगाने बिगुल वाजवले आहे. या निवडणुकीत मतदान आणि मतमोजणीची प्रक्रिया ऑक्टोबर 2026 मध्ये पूर्ण केली जाणार आहे.

या निवडणुकीसाठीचं वेळापत्रक –

अर्ज भरण्याची मुदत: 6 ऑक्टोबर 2026

अर्जांची तपासणी (छाननी): 7 ऑक्टोबर 2026
अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत: 9 ऑक्टोबर 2026
मतदानाचा दिवस: 23 ऑक्टोबर 2026 (सकाळी 8:00 ते दुपारी 4:00)
निकाल आणि मतमोजणी: 27 ऑक्टोबर 2026
यात औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाचे सतीश चव्हाण (राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार), पुणे पदवीधरचे अरुण लाड (राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार), नागपूर पदवीधर: अभिजीत वंजारी (काँग्रेस),पुणे शिक्षक: जयंत आसगावकर (काँग्रेस)अमरावती शिक्षक: किरण सरनाईक (शिवसेना – शिंदे गट) यांचा समावेश आहे. या पाचही जगासाठी आता नव्याने निवडणूक प्रक्रिया पार पडणारं असून विविध पक्षाकडून उमेदवांराची चाचपणी सुरु होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रासोबत बिहार, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशातील विधानपरिषदेच्या जागासाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे.निवडणुकीची घोषणा झाल्याने संबधित मतदारसंघामध्ये राजकीय हालचालीना वेग आला आहे.







