Thursday, May 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

इंदापूरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात; भीम गौरव रॅलीने शहर दुमदुमले

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 14 April 2026, 19:39

आदित्य बोराटे

इंदापूर: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५वी जयंती इंदापूर शहर व तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथे सकाळी ११ वाजता तहसीलदार जीवन बनसोडे व सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत वाघमारे यांच्या हस्ते ध्वजवंदन कार्यक्रम पार पडला. यावेळी त्रिसरण पंचशील बुद्ध वंदना घेऊन गौतम बुद्ध यांच्या मूर्तीस तसेच डॉ. आंबेडकर व माता रमाई यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले.

 

या कार्यक्रमास पोलीस निरीक्षक विलास नाळे, मुख्याधिकारी रमेश ढगे, गटविकास अधिकारी सचिन खुडे, जिल्हा परिषदेचे गटनेते श्रीमंत ढोले, विरोधी पक्ष नेते अनिल पवार, नगरसेवक उमेश मखरे, नगरसेविका अनिता ढावरे, गटनेते शकीलभाई सय्यद, गजानन गवळी, पोपट शिंदे, शुभम पवार, प्रशांत उंबरे, सुधाकर ढगे, संजय शिंदे, अनिकेत वाघ, सागर अरगडे, अक्षय सूर्यवंशी, रिपाइंचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब सरवदे, संदिपान कडवळे, हनुमंत कांबळे, अशोक मखरे, सुहास मखरे, किरण गानबोटे, ॲड. अविनाश गवळी, तानाजी धोत्रे, पी.पी. पवार, अफसर मोमीन यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शहरातील साठे नगर, आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक,सरस्वती नगर, शिवाजीनगर, डॉ. आंबेडकर सोसायटी, महात्मा फुले नगर, इंदापूर बस स्थानक, अंबिका नगर, टेंभुर्णी नाका, सावता माळी नगर तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वाचनालय येथे विविध सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते, संघटना यांच्या वतीने जयंती उत्सव साजरा करण्यात आला. इंदापूर बस स्थानक येथे भीम गीतांचा जलसा रंगला, तर विविध ठिकाणी लाडू, पाणी व शीतपेयांचे वाटप करण्यात आले. आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे भोजनाचीही व्यवस्था करण्यात आली.

राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जयंतीनिमित्त शुभेच्छा देताना बाबासाहेबांच्या विचारांप्रमाणे एकत्र राहण्याचे आवाहन केले. त्यांनी भीम गौरव रॅलीत सहभाग घेतला. नगराध्यक्ष भरत शहा यांनी “वाचनातूनच विचार रुजतात” असे सांगत ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ या संदेशाचे पालन करण्याचे आवाहन केले. भाजपा नेते प्रदीप गारटकर व प्रवीण माने यांनीही बाबासाहेबांच्या शिकवणीवर चालण्याचा संकल्प व्यक्त केला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष अजय मखरे, उपाध्यक्ष संघर्ष मखरे, रोहन मखरे, खजिनदार अजय कांबळे, सहखजिनदार अनिकेत खरात, सचिव सिद्धार्थ गाडे, सहसचिव सुनील शेळके व कार्याध्यक्ष विशाल मखरे यांनी कार्यक्रम व भीम गौरव रॅलीसाठी विशेष परिश्रम घेतले.

दरम्यान, आंबेडकर नगर येथून निघालेल्या भीम गौरव रॅलीने शहरातील प्रमुख मार्ग व्यापले. विविध महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करत युवक-युवतींसह भीमसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. ‘जय भीम’च्या घोषणांनी संपूर्ण इंदापूर शहर दुमदुमून गेले.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

कांदा उत्पादकांचे अच्छे दिन! साखर आणि फळ उत्पादकांसाठीही दिल्लीत झालेल्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय

Wednesday, 27 May 2026, 20:52

जामिनावर सुटका होताच अग्रवाल कुटुंबाचा जल्लोष; मृत अश्विनीच्या वडिलांचा संताप, जामीन रद्द करण्याची मागणी

Wednesday, 27 May 2026, 20:26

80 वर्षीय वृद्धेच्या गळ्यातील ‘बकुळा माळ’ हिसकावून चोरटे फरार; भोरमध्ये भरदिवसा चोरी

Wednesday, 27 May 2026, 20:12

देवाच्या दारात गुंडागर्दी! मंदिरातील पैसे घेण्यास विरोध केल्याने पुजाऱ्याचा तोडला दात; मांजरी बुद्रुक येथील घटना

Wednesday, 27 May 2026, 20:04

अंगणात खेळत असताना 16 वर्षाच्या मुलावर चौघांकडून लोखंडी हत्याराने वार; हडपसर येथील घटना

Wednesday, 27 May 2026, 19:55

भारताविरोधात मोठा कट उधळला! कराचीमार्गे गुजरातमध्ये पोहोचले जहाज; मध्यरात्रीच्या गुपित मिशनमध्ये मोठी कारवाई

Wednesday, 27 May 2026, 19:06
Next Post

'पहिले मी झोपणार' पुण्यात रात्रपाळीवरून दोन सुरक्षारक्षकांमध्ये राडा; सहकाऱ्याचा गळा आवळला अन्...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.