Saturday, October 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

संपत्तीच्या एका हिस्स्यासाठी रक्ताचं नातं विसरला? पुण्यात नातवाकडून सावत्र आजीची हत्या

Shreya Varkeby Shreya Varke
Saturday, 10 October 2026, 9:40

पुणे: पुण्यातील नवी सांगवी परिसरात कौटुंबिक वादातून एका 60 वर्षीय महिलेची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. संपत्तीतील वाट्यावरून सुरू असलेल्या वादातून नातवानेच आपल्या सावत्र आजीवर चाकूने वार केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर आरोपी स्वतः सांगवी पोलीस ठाण्यात पोहोचला आणि त्याने पोलिसांना गुन्ह्याची माहिती दिली. शुक्रवारी सकाळी सुमारे 9 वाजता क्रांती चौक परिसरात ही घटना घडली. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मृत महिलेचे नाव मंगल बाबूराव शिंगोरे (वय 60, रा. क्रांती चौक, नवी सांगवी) असे आहे. तर ओंकार किसान शिंगोरे (वय 26, रा. पिंपळे गुरव) असे आरोपीचे नाव आहे. मंगल या ओंकारच्या सावत्र आजी होत्या. ओंकार हा त्यांच्या सावत्र मुलाचा मुलगा असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संपत्तीतील हिस्स्यावरून मंगल आणि ओंकार यांच्यात वाद सुरू होता. याच वादातून ओंकारने मंगल यांच्यावर चाकूने वार केल्याचा आरोप आहे. त्यानंतर तो थेट सांगवी पोलीस ठाण्यात गेला आणि त्याने पोलिसांना घटनेबाबत सांगितले.

माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथे मंगल या स्वच्छतागृहात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आढळल्या. पोलिसांनी त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात नेले. मात्र, तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी मंगल यांच्या मुलगी संगीता चटपल्लीवार (रा. कात्रज) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. संपत्तीच्या वादातून घडलेल्या या घटनेचा पुढील तपास सांगवी पोलीस करत आहेत. या प्रकरणात पोलिसांकडून पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

अभिजित दिपके पोलिसांच्या ताब्यात! दिल्ली विमानतळावर हाय व्होल्टेज ड्रामा; विमान लँड होताच पोलिसांनी घेरलं, नेमकं काय घडलं?

Saturday, 10 October 2026, 11:16

ध्रुव राठीला पोलिसांनी ताब्यात घेतलं? अचानक पोलीस पोहोचले अन्…

Saturday, 10 October 2026, 11:02

Gold-Silver Rate: बाप रे सोनं पुन्हा महागलं! ऐन सणासुदीत दीड लाखांचा टप्पा ओलांडला; तर चांदीचे दर घसरले, जाणून घ्या सोन्याचा आजचा दर एका क्लिकवर

Saturday, 10 October 2026, 11:01

डायरेक्ट मालगाडीवर चढला अन् थेट ‘हाय व्होल्टेज’ विजेची तार पकडली; झटका बसला आणि एका क्षणात.. पुण्यात रेल्वे स्थानकावर तरुणाचा भयानक स्टंट

Saturday, 10 October 2026, 10:52

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत ‘पैशांचा पाऊस”? गाडीत वीस लाख रुपये सापडल्याचा आरोप; राजकीय वर्तुळात खळबळ

Saturday, 10 October 2026, 10:43

नवरात्रीचे 9 दिवस, 9 रंग! कोणत्या दिवशी कोणता रंग घालायचा? संपूर्ण यादी पाहा

Saturday, 10 October 2026, 10:05
Next Post

नाना पाटेकरांच्या निधनानंतर पत्नी नीलकांतींची पहिली पोस्ट! फक्त 3 शब्द, पण दुःखाचा बांध फुटला…

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp