Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भिगवण ग्रामीण रुग्णालयाला उपसंचालक डॉ. भगवान पवार यांची अचानक भेट; डॉक्टर व कर्मचारी गोंधळले

सागर जगदाळेby सागर जगदाळे
Saturday, 29 November 2025, 17:50
Deputy Director Dr. Bhagwan Pawar's surprise visit to Bhigwan Rural Hospital; Doctors and staff confused

भिगवण: भिगवण ग्रामीण रुग्णालयात (Bhigwan Rural Hospital) उपसंचालक आरोग्य सेवा, पुणे मंडळाचे डॉ. भगवान पवार यांनी अचानक धावती भेट दिल्यानंतर रुग्णालयात वातावरण गोंधळले. अनेक डॉक्टर आणि कर्मचारी आपापल्या विभागात अनुपस्थित होते. अधिकारी पोहोचताच कर्मचारी विभागांमध्ये हजर राहण्यासाठी धावाधाव होताना दिसली, ज्यातून कामातील शिथिलता स्पष्ट झाली. उपस्थित पत्रकारांनी या हालचालींवर लक्ष ठेवल्यानंतर रुग्णालयातील व्यवस्थापनातील गंभीर कमतरता उघड झाली.

 

धावपळीत रुग्णालयातील स्वच्छता, औषधसाठा, प्रयोगशाळेतील कार्यप्रणाली, प्रसूती सेवा, तसेच नागरिकांना मिळणाऱ्या मूलभूत आरोग्य सेवांतील त्रुटी यांचा सखोल आढावा घेतला गेला. रुग्णालयात अपेक्षेप्रमाणे प्रसूती सेवा सुरु नसल्याचे निदर्शनास आले. पुरुष कक्ष व महिला कक्षांमध्ये मार्गदर्शक सुचनांनुसार खाटांचे बेडशिट्स बदलण्यात येत नसल्याचे निदर्शनास आले.

मार्गदर्शक सूचनांनुसार ओपीडीची वेळ, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपलब्धता, तसेच विविध आरोग्य कार्यक्रमांचे जनजागृती साहित्य दर्शनीय भागात लावलेले नाही, जे नागरिकांना सेवा समजावून सांगण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. औषधांचा अपुरा साठा आणि प्रयोगशाळेत यंत्रसामग्रीच्या त्रुटीमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेस धोका निर्माण होत असल्याचेही दिसून आले.

मागील काही दिवसांपूर्वी एका वृत्तपत्रात ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळपणा बाबतची बातमी प्रसिद्ध झाल्यामुळे ही अचानक भेट देण्यात आली असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर येत्या काही दिवसांमध्ये उपसंचालक यांच्या भेटीनंतर तालुक्यातील कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या जवळचे
आरोग्य मंत्री भिगवण ग्रामीण रुग्णालयाला भेट देणार काय? अशी कुजबुज नागरिकांमध्ये जोर धरत आहे.

उपस्थित कर्मचाऱ्यांना ठाम इशारा देत, डॉ. भगवान पवार यांनी सर्व विभागांनी एकजूट होऊन काम करण्याचे निर्देश दिले. प्रशासनाकडून ही आवश्यक सुधारणा आणि बदलांसाठी संपूर्ण सहकार्य मिळेल, याची हमी दिली.

या अचानक भेटीत रुग्णालयातील व्यवस्थापनातील गंभीर त्रुटी समोर आल्या. स्वच्छतेत कमतरता, अपुरा औषधसाठा, तपासण्यात विलंब, रुग्णखाट उपलब्ध नसणे, आहार वितरणात उणीवा आणि काही महत्त्वाच्या सुविधा बंद असणे यामुळे नागरिकांना वेळेवर सेवा मिळत नाही. त्यामुळे पुढील काही दिवसांत प्रत्यक्ष सुधारणा कितपत होतील, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

अखेर, डॉ. भगवान पवार यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना ठाम इशारा दिला आणि नाराजी व्यक्त केली.
“नागरिकांना वेळेवर व उत्तम आरोग्य सेवा मिळणे ही तुमची प्राथमिक जबाबदारी आहे. हा हलगर्जीपणा स्वीकाहार्य नाही. तातडीने सुधारणा करून आवश्यक बदल करा, अन्यथा पुढील कारवाई अपरिहार्य  असल्याचे पवार म्हणाले.”

या भेटीवेळी डॉ. भगवान पवार (उपसंचालक आरोग्य सेवा, पुणे मंडळ), डॉ. अभिराज सूर्यवंशी (वैद्यकीय अधिकारी, आ.कु.क.प्रःकेंद्र, पुणे), डॉ. आनंद साबणे (स्त्रीरोग तज्ञ, उजिरु भोर), गणेश औटी (कार्यालयीन अधक्षक, उसंआसे, पुणे), गणेश जगताप (परिमंडळ कार्यक्रम व्यवस्थापक, उसंआसं, पुणे), धनाजी कौलगे (मुल्य व सनियंत्रण अधिकारी, उसंआसे, पुणे), सागर शेळके (फॅसिलिटी मॅनेजर, उसंआसे, पुणे) तसेच ग्रामीण रुग्णालय भिगवणचे विविध जबाबदार अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

सागर जगदाळे

सागर जगदाळे

अडीज वर्ष दैनिक पुण्यनगरी काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये भिगवण येथील प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे. शैक्षणिक क्षेत्रातील बातम्या लिहिण्याचा खूप मोठा अनुभव आहे.

ताज्या बातम्या

तटकरे-पटेल बॅकफूटवर! सुनेत्रा पवारांच्या आक्रमक पवित्र्यामुळे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अडचणीत

Wednesday, 1 April 2026, 23:01

पुण्यात खळबळ! रक्ताळलेला कोयता घेऊन पोलीस ठाण्यात गेला, तरीही आरोपीची निर्दोष मुक्तता

Wednesday, 1 April 2026, 22:34

अहिल्यानगरमध्ये तमाशा कलाकारांवर हल्ला! महिला कलाकारांना शिवीगाळ अन् धक्काबुक्की; किरकोळ वादातून गुंडांची मुजोरी

Wednesday, 1 April 2026, 22:07

वरदाडे येथे नदीपात्रात पडून ऑपरेटरचा मृत्यू! सेफ्टी साधनांचा अभाव ठरला जीवघेणा; शिडीवरून घसरून ४० फूट खोल पाण्यात पडल्याने दुर्दैवी अंत

Wednesday, 1 April 2026, 21:33

शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक कृषी मोटर चोरी प्रकरणी आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; २० गुन्हे उघड, मोठा मुद्देमाल जप्त…..

Wednesday, 1 April 2026, 21:23

डॉन आहे मी, बाप आहे मी!” पुण्यात मोक्का लागलेल्या गुन्हेगाराचं शक्तीप्रदर्शन; पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाजवली गाणी अन् डायलॉगबाजी

Wednesday, 1 April 2026, 21:15
Next Post
Uruli Kanchan Suicide: 19-year-old girl commits suicide by hanging herself at her residence in Uruli Kanchan

Sangli Suicide News: वारंवार छळ...शेवटी उचललं टोकाचं पाऊल, राहत्या घरात पुरुषाची आत्महत्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.