Sunday, May 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daund ZP Election Result: दौंड तालुक्यात जिल्हा परिषद च्या 6 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी तर भाजपाला केवळ एका जागेवर विजय

राहुलकुमार अवचटby राहुलकुमार अवचट
Monday, 9 February 2026, 22:08
Daund ZP Election Result: NCP candidate wins 6 Zilla Parishad seats in Daund taluka, BJP wins only one seat

राहुलकुमार अवचट

यवत: जिल्ह्याचे मंत्रालय म्हणून (Daund ZP Election Result) ओळखले जाणाऱ्या पुणे जिल्हा परिषदेच्या दौंड तालुक्यातील ७ जागांसाठी दि. ७ रोजी मोठ्या उत्साहात मतदान पार पडले होते यावेळी अनेकांनी विजय आमचाच होणार असे सांगितले होते परंतु लोकशाहीत मतदारांनी आपली ताकद दाखवत दौंड तालुक्यातील समिश्र प्रतिसाद देत दौंड तालुक्यातील असलेल्या पुणे जिल्हा परिषदेच्या ७ जागांपैकी पैकी माजी आमदार रमेश थोरात (Daund News) यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या ६ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना विजयी केले तर आमदार राहुल कुल यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या भाजपाला केवळ एका जागेवर विजयी करत जिल्हा परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसला पसंती दिली.

 

दौंड तालुक्यातील राहू – खामगाव , वरवंड – पारगाव, कानगाव – गोपाळवाडी, देऊळगाव राजे – खडकी, कुरकुंभ – पाटस, बोरीपार्धी – केडगाव या ६ गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले असून केवळ यवत – बोरीभडक या एकमेव गटात भाजपाचे उमेदवार विजयी झाले आहेत.

यापूर्वी झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा ५ जागेवर विजय झाला होता तर भाजपाला केवळ राहू गटातील जागा आपल्याकडे ठेवण्यात यश मिळाले होते यावेळी मात्र आमदार राहुल कुल यांना आपल्या गटातील जिल्हा परिषदेची जागा आपल्याकडे ठेवण्यात अपयश आले याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सागर शेलार विजयी झाले तर गेल्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेली यवत गटातील एकमेव जागा भाजपाला आपल्याकडे खेचून आणली असून याठिकाणी भाजपाचे अविनाश कुदळे विजयी झाले आहेत.

माजी आमदार रमेश थोरात यांच्यासाठी केडगाव गटातील चिरंजीव तुषार थोरात यांना निवडून आणण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली होती सुरुवातील पिछाडीवर असलेले तुषार थोरात अंतिम फेरीत मोठ्या फरकाने विजयी झाले तर खडकी गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे विरधवल जगदाळे यांनी सुरवातीला घेतलेली आघाडी कायम ठेवत ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेस मधून भाजपामध्ये आलेल्या आप्पासाहेब पवार यांच्या दणदणीत पराभव केला.

पारगाव – वरवंड गटात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गायत्री विशाल खळदकर या विजयी झाल्या असून गोपाळवाडी गटातून साहेबराव पोळ विजयी झाले आहेत तर पाटस गटातून अनुराधा शितोळे या विजयी झाले आहेत यवत गटात भाजपाचे उमेदवार विजयी झाल्याने मतमोजणी केंद्रावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने याबाबत आक्षेप घेतल्याने निर्णय येण्यास उशीर झाला.

गटनिहाय उमेदवार व मिळालेली मते

राहू – खामगाव

सागर रघुनाथ शेलार – 13272
अनिल (बापू) माधवराव सोनवणे – 12504
मिलिंद रमेश म्हेत्रे – 361
अशोक बापू फडतरे – 301
अतुल पोपटराव टेळे – 88
वरील पैकी एकही नाही – 126

पारगाव – वरवंड

गायत्री विशाल खळदकर – 15176
सारिका संजय दिवेकर – 11471
मानसी नामदेव ताकवणे – 1816
योगिनी विजयकुमार दिवेकर – 580
वरील पैकी एकही नाही – 192

कानगाव – गोपाळवाडी

साहेबराव राजाराम पोळ- 10681
तेजस राजेंद्र कांबळे – 10325
अभिषेक रमेश खंडाळे – 600
अक्षय बालीसाब शिखरे – 216
विकास साहेबराव कदम – 464
भारत विठ्ठल सरोदे – 76
वरील पैकी एकही नाही – 203

देऊळगाव राजे – खडकी

विरधवल कृष्णराव जगदाळे- 15087
आप्पासाहेब नानासाहेब पवार – 10931
अमरसिंग तुफानसिंग परदेशी – 1989
वरील पैकी एकही नाही – 176

कुरकुंभ – पाटस

अनुराधा सत्वशील शितोळे- 13430
वैशाली साहेबराव वाबळे- 11496
प्रियांका सचिन आटोळे – 577
सारीका अविनाश मोहिते – 169
वरील पैकी एकही नाही – 247

बोरीपार्धी – केडगाव

तुषार उर्फ गणेश रमेश थोरात – 14777
अभिषेक आनंद थोरात- 11494
अभिषेक थोरात- 243
समीर पोपटराव भोईटे- 515
किसन बबन हंडाळ – 62
अजित दिलीप शितोळे – 274
वरील पैकी एकही नाही – 112

यवत – बोरीभडक
अविनाश रमेश कुदळे – 12705
अमित विष्णु कुदळे – 12440
सारिका भरत भुजबळ- 246
शुभम नागेश माळवे – 199
गणेश शंकर आखाडे – 1599
रामदास अशोक दोरगे- 204
वरील पैकी एकही नाही – 193

 

राहुलकुमार अवचट

राहुलकुमार अवचट

गेल्या २ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. २ वर्ष आधार न्यूज केबल चॅनल ला काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या १ वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये यवत प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

MSIDC News : हडपसर ते यवत महामार्गावर ‘एमएनजीएल’चे नियमबाह्य खोदकाम ; ‘MSIDC’ चा दणका, तात्काळ काम बंद करण्याची नोटीस, सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याने अपघाताची टांगती तलवार..

Saturday, 16 May 2026, 18:30

Pune News : कोथरूडमध्ये पैशांच्या वादातून वडिलांचाच मुलावर ॲसिड हल्ला ; चेहरा-डोळे भाजले, गुन्हा दाखल..

Saturday, 16 May 2026, 17:58

Uruli Kanchan Breaking : शिंदवणे येथे वीज खांबावर काम करताना वायरमनला शॉक?; १५ ते २० फुटांवरून खाली कोसळले

Saturday, 16 May 2026, 16:50

Bhigvan News : “विकासाच्या नावाखाली भिगवणकरांची धुळधाण”, खड्डे, धूळ,अन् रखडलेल्या रस्त्यांनी नागरिक हैराण”; गावपुढारी-अधिकारी-ठेकेदारांच्या अभद्र युतीचा ग्रामस्थांना फटका..

Saturday, 16 May 2026, 16:09
Two more arrested in NEET Paper Leak Case

NEET Exam 2026 : NEET पेपरफुटीचे ‘पुणे कनेक्शन’ उघड ! मॉडर्न कॉलेजच्या प्राध्यापिकेने सांगितलेले प्रश्न पत्रिकेत तंतोतंत आल्याचा दावा, CBIकडून अटक, बीडपर्यंत पोहोचले रॅकेटचे धागेदोरे..

Saturday, 16 May 2026, 15:58
Theft of farmers' electric cars and cables in Valti; Farmers suffer huge losses, Uruli Kanchan police demand action against thieves

Uruli Kanchan : सोरतापवाडीत हॉटेल भाड्याच्या वादातून मालकालाच लाकडी दांडक्याने मारहाण ; उरुळी कांचन पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल

Saturday, 16 May 2026, 15:36
Next Post
Pune Crime: 'Laxmi Nagar Police's 'surgical strike' against gutkha smugglers in Pune; Goods worth Rs 20 lakhs seized'

Pune Crime: 'पुण्यात गुटखा तस्करांविरुद्ध लक्ष्मीनगर पोलिसांचा 'सर्जिकल स्ट्राईक'; 20 लाखांचा माल जप्त'

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.