दौंड, ता. 22 : दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीत (Daund News) नाकाबंदी दरम्यान गावठी हातभट्टीची दारू वाहतूक करणारा टेम्पो दौंड पोलिसांनी पकडला. यावेळी पथकाने 1 लाख 625 रुपयांचा गावठी दारूसाठा व 2 लाख 50 हजार रुपयांचा दारू वाहतूक करणारा टेम्पो असा 3 लाख 50 हजार 625 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी लोणी काळभोर (ता. हवेली) येथील टेम्पो चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हि कारवाई रविवारी (ता. 22) रात्री दोन वाजण्याच्या सुमारास दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नगरमोरी परिसरात करण्यात आली. यलगुंड महादेव दोडमणी (वय-20, व्यवसाय चालक, रा. लोणी काळभोर ता. हवेली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक रमेश चंदर साळुंके यांनी सरकारतर्फे दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उपनिरीक्षक रमेश साळुंके यांची नगरमोरी येथे नाकाबंदी करिता नेमणुक करण्यात आली होती. सदर ठिकाणी होमगार्ड अतुल वामनराव कुतवळ याचेसह नाकाबंदी दरम्यान वाहने चेक करित असताना मारुती सुझुकी कंपनीची सुपर कॅरी टेम्पो क्र MH 12 SX 7439 ही संशयीत गाडी काष्टी, नगर कडुन पाटस बाजुकडे चालली होती.
सदर गाडीस संशयीत वाटल्याने त्या गाडीला चेक करण्याकरीता थांबवले. यावेळी सदर चालकास त्यास नाव विचारले असता त्याने त्याचे नाव यलगुंड दौडमणी असे सांगीतले. त्याला टेम्पोत काय आहे असे विचारले असता त्याने उडवा उडवीचे उत्तरे दिली. त्यानंतर स्वता जावुन गाडीची पाहणी केली.
यावेळी गाडीत हातभटटीची तयार दारुचे 35 लीटर मापाचे 23 कॅड मिळुन आले. याबाबत हातभटटीची दारु कोठुन आणली व ती कोठे व कोणाकडे घेवुन चालला आहे, याबाबत विचारले असता नमुद चालकाने समाधानकारक माहीती न देता उडवाउडवीचे उत्तरे दिली. त्यावेळी पोलिसांनी लागलीच दोन पंचाना नगर मोरी येथील सदर बातमीचा आशय कळवला. तसेच दारुची अवैर्धरीत्या वाहतुक करताना टेम्पो मिळुन आल्याचे सांगितले. दोन पंचासमक्ष नमुद वाहनातीलनिळ्या व पिवळ्या रंगाचे प्लास्टीकचे कॅन्डची पाहणी करण्यात आली आली.
दरम्यान, यावेळी टेम्पोत 21 पिवळ्या रंगाची व 2 निळ्या रंगाच्या प्लास्टीकचे कॅन्डमध्ये 805 लिटर तयार दारू मिळून आली. तसेच 2 लाख 50 हजार रुपयांचा दारू वाहतूक करणारा टेम्पो असा 3 लाख 50 हजार 625 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तपास पोलीस हवालदार अमीर शेख करीत आहेत.






