विशाल भालेराव

खडकवासला: पुणे आंबेगाव खुर्द या ठिकाणी नागरिक ड्रेनेजच्या पाण्याच्या समस्येने नागरिक भयंकर ग्रासले असून नागरिकांच्या प्रश्नाकडे प्रशासन वारंवार कानाडोळा करते आहे. अनेक वेळा तक्रारी करून देखील याकडे प्रशासकीय अधिकारी खासदार, आमदार, माजी नगरसेवक यांचे दुर्लक्ष होताना दिसते.
नागरिकांच्या समस्या वारंवार सांगून देखील या ठिकाणी कुठलीही उपाययोजना होताना दिसत नाही. ड्रेनेज विभागामार्फत 250 कोटी रुपयांचे टेंडर दिले असून देखील नेमके हे पैसे कोणाच्या खिशात गेले ते माहित नाही. 2017 पासून हे गाव पुणे महानगरपालिकेत समाविष्ट आहे. आतापर्यंत हजारो कोटी रुपये या भागामध्ये खर्च केले असून देखील नेमका विकास गेला कुणीकडे असंच म्हणावं लागेल स्मार्ट सिटीच्या नावाखाली या भागातून मोठा टॅक्स गोळा केला जातो. परंतु नागरिकांना सुविधा या मिळताना दिसत नाही.
सच्चाई माता परिसर अटल 1 ते 12 या भागामध्ये ड्रेनेज लाईन पावसाळी लाईन या अस्तित्वातच नाही. त्या नसल्यामुळे ड्रेनेच पाणी नागरिकांच्या घराच्या समोर घरामध्ये साठत आहे. त्यामुळे त्या ठिकाणी पांढऱ्या मोठ्या आळ्या, मच्छरचे मोठं साम्राज्य पसरले असून या ठिकाणी पालिकेचे काम करण्यास कर्मचारी कानाडोळा करतात. स्थानिक नागरिकांना लहान मुले, वयोवृद्ध यांना ड्रेनेजच्या पाण्यामुळे ताप, मलेरिया, अंगदुखी, डेंगू, अशा विविध आजाराने ग्रासले आहेत. या ठिकाणी कष्टकरी वर्ग मोठ्या प्रमाणात राहत असून अनेकांना दुसरीकडे राहण्यास भाडे परवडत नसल्यामुळे अशा घाणेरड्या परिस्थितीमध्ये नागरिक राहत आहे.
अनेक स्थानिक लोक घरे सोडून गेले असून त्या ठिकाणी मोठी गुन्हेगारी वाढत आहे. आम आदमी पार्टी पुणे शहराध्यक्ष प्रशांत कांबळे सामाजिक न्याय हे प्रशासनासोबत वारंवार पत्रव्यवहार करत आहे. “आठ दिवसांत काम सुरू न झाल्यास अमरण उपोषण सुरू करणार असल्याचा इशारा, मलनिस्सारण विभागाला भेट देऊन मुख्य कार्यकारी अभियंता जगदीश खानोरे यांच्यामार्फत देण्यात आला आहे,” असे वक्तव्य प्रशांत कांबळे यांनी केले.







