Sunday, July 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कदमवाकवस्ती येथे सेंटरिंग कामगाराची घरात गळफास घेऊन आत्महत्या; कारण अस्पष्ट

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 15 March 2026, 18:13

लोणी काळभोर, ता. 15 : कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील पठारे वस्ती परिसरात सेंटरिंगचे काम करणाऱ्या एका मजुराने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शनिवारी (ता. 14) सकाळी सुमारे नऊच्या सुमारास ही घटना समोर आली. या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसल्याने परिसरात विविध चर्चांना उधाण आले आहे.

जितेंद्र गोविंद मात्रे (वय 41) असे आत्महत्या केलेल्या मजुराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जितेंद्र मात्रे हे विवाहित असून त्यांना दोन मुले आहेत. ते बांधकाम क्षेत्रात सेंटरिंगचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. मात्र त्यांना दारूचे व्यसन होते. यामुळे त्यांच्या कुटुंबात वारंवार वाद होत होते. या सततच्या वादामुळे कंटाळून त्यांची पत्नी वर्षभरापूर्वी दोन मुलांना घेऊन माहेरी निघून गेली होती. त्यानंतर जितेंद्र मात्रे हे घरात एकटेच राहत होते.

शनिवारी सकाळी त्यांच्या घराचा दरवाजा आतून बंद असल्याचे शेजाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी आवाज देऊन तसेच दरवाजा ठोठावून पाहिले, मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. संशय आल्याने स्थानिक नागरिकांनी याबाबत लोणी काळभोर पोलिसांना माहिती दिली.

 

या घटनेची माहिती मिळताच, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश बोराटे, पोलीस हवालदार महेश करे व सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता जितेंद्र मात्रे हे साडीच्या साहाय्याने अँगलला गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकलेले आढळून आले. पोलिसांनी त्यांना तत्काळ लोणी काळभोर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणी करून उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

दरम्यान, लोणी काळभोर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पुण्यातील रुग्णालयात पाठविला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार महेश करे करत आहेत.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर मोठा निर्णय; प्रल्हाद जोशींकडे शिक्षण खात्याची अतिरिक्त जबाबदारी!

Saturday, 25 July 2026, 23:00

आरोग्यवारी मॅरेथॉनमुळे पुणे, जेजुरी आणि बारामती मार्गांवर २६ जुलैला वाहतुकीत बदल

Saturday, 25 July 2026, 22:36

देशाचे नवे शिक्षण मंत्री कोण? धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीत हालचाली, ‘ही ‘नावं चर्चेत

Saturday, 25 July 2026, 22:03

राजगडावर शुल्कवसुली सुरू; मात्र स्वच्छतेचा बोजवारा! वन विभाग व पुरातत्त्व विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह

Saturday, 25 July 2026, 21:37

महात्मा गांधी विद्यालयात स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

Saturday, 25 July 2026, 20:59

तांभाड येथे महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या तारा चोरी; ट्रान्सफॉर्मरचेही नुकसान

Saturday, 25 July 2026, 20:53
Next Post
Karanataka Chitradurga Accident: Time flies in Karnataka! A car collides with a parked truck in Chitradurga; 3 police sub-inspectors die on the spot

Karanataka Chitradurga Accident: कर्नाटकात काळाचा घाला! चित्रदुर्गमध्ये उभ्या ट्रकला कारची भीषण धडक; 3 पोलीस उपनिरीक्षकांचा जागीच मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.