Tuesday, October 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बारामतीत व्यावसायिकाला तिघांकडून बेदम मारहाण

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 6 October 2026, 12:05

 बारामती, ता. 6 : हॉटेलमध्ये जेवणासाठी गेलेल्या व्यावसायिकावर तीन जणांनी कोयता आणि लाकडी दांडक्यांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना बारामतीतील इंदापूर रोडवरील मोतीबाग परिसरात घडली. या हल्ल्यात व्यावसायिकाच्या पोटावर, डोक्यावर, हातावर, पाठीवर आणि डोळ्यावर दुखापत झाली असून, याप्रकरणी बारामती शहर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, याबाबत मज्जीत दामोदर राज्य (वय 31 , रा. तांबेनगर, बारामती) यांनी बारामती शहर पोलिस फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य हे ॲश विटा तसेच कृष्णा डेअरी फार्मचा व्यवसाय करतात. ते मित्रांसोबत हॉटेल सृजन येथे जेवण्यासाठी 4 ऑक्टोबर रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास गेले होते. जेवण झाल्यानंतर बिल देण्यासाठी काऊंटरजवळ गेले असता तोंडाला रुमाल बांधलेले तीन जण हॉटेलमध्ये शिरले. त्यातील एकाच्या हातात कोयता, तर दोघांकडे लाकडी दांडकी होती.

आरोपींनी राज्य यांना शिवीगाळ करत अचानक मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांचे मित्र तेथून पळून गेल्यानंतर तिघांनी राज्य यांना कोयता, दांडके तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. कोयत्याने पोटावर वार केल्याचा, तर दांडक्याने डोके, हात, पाठ, पोट आणि डोळ्यावर मारहाण केल्याचा आरोप आहे.

हल्ल्यानंतर राज्य यांनी 112 क्रमांकावर संपर्क साधला. पोलिसांनी त्यांना उपचारासाठी सिल्व्हर ज्युबिली हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचारानंतर त्यांनी पोलिसांत फिर्याद दिली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांची नावे आदेश रमेश देशमुख (पत्ता माहित नाही) गोफणे (पुर्ण नांव पत्ता माहित नाही), एम.आय.डी.सी. वंजारवाडी येथील शेतकरी राजा हा टेलचे मालक व एक अनोळखी इसम अशी समोर आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पूढील तपास पोलीस उपनिरीक्षक टेळकीकर करीत आहेत.

 
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

अटक न करण्यासाठी मागितली लाच, 1.30 लाख घेताना PSI ला पकडले रंगेहाथ! ACB ची कारवाई

Tuesday, 6 October 2026, 13:00

पुणे शिक्षक मतदारसंघात महायुतीत ठिणगी! भाजपविरोधात शिवसेनेचा उमेदवार मैदानात; मंगेश चिवटेंचा अर्ज दाखल

Tuesday, 6 October 2026, 12:38

लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! नवरात्री-दसऱ्याला खात्यात येणार 1500 रुपये ? आजच्या बैठकीत निर्णय..

Tuesday, 6 October 2026, 12:11

बारामतीत व्यावसायिकाला तिघांकडून बेदम मारहाण

Tuesday, 6 October 2026, 12:05

नवी मुंबई विमानतळ ते पुणे प्रवास होणार झटपट! ई-बस सेवेला हिरवा कंदील; तिकीट किती?

Tuesday, 6 October 2026, 11:50

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीची चाहूल; सरकारी कंपन्यांवरही दबाव

Tuesday, 6 October 2026, 11:49
Next Post

लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! नवरात्री-दसऱ्याला खात्यात येणार 1500 रुपये ? आजच्या बैठकीत निर्णय..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp