मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आता प्रवाशांना विविध शहरांत जाण्यासाठी अत्याधुनिक वाहतूक सुविधा उपलब्ध होणार आहेत. एसटी महामंडळाची पर्यावरणपूरक ‘ई-शिवाई’ इलेक्ट्रिक बस सेवा 7 ऑक्टोबर 2026 पासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होत आहे. प्रवासाचे मार्ग आणि तिकीट दरया नव्या बस सेवेमुळे पुणे, मुंबई आणि उपनगरांकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

प्रवासाचे तिकीट दर खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहेत: दादर (पश्चिम/पूर्व): 170 रुपये (सुरुवातीचा मार्ग सायन आणि अटल सेतूवरून असेल). बोरिवली: 210 रुपये (अटल सेतू मार्गे प्रवास). पुणे: 450 रुपये.तसेच प्रवासात 12 वर्षांखालील मुलांसाठी आणि नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड वापरणाऱ्या महिलांसाठी तिकिटावर 50 टक्के सवलत देण्यात आली आहे. या व्यतिरिक्त, नोव्हेंबर 2026 च्या मध्यापर्यंत ठाणे आणि नाशिकसाठी देखील बस गाड्या सुरू करण्याचे नियोजन आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यान प्रवाशांसाठी दर तासाला मोफत शटल बस सेवा उपलब्ध राहणार आहे . सोबतच ‘बेस्ट’ च्या माध्यमातून मरोळ (अंधेरी पूर्व), वांद्रे, दादर आणि कुलाब्यातील वर्ल्ड ट्रेड सेंटरसाठी दररोज बस गाड्या चालवल्या जाणार आहेत.

दरम्यान आता याशिवाय खारकोपर, तारघर, बेलापूर, नेरूळ, पनवेल आणि खांदेश्वर या स्थानिक ठिकाणांसाठी प्रवाशांना खाजगी व सार्वजनिक वाहतुकीचे पर्याय सहज मिळतील.त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.






