Tuesday, April 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bhor Crime: भोरमध्ये जिल्हा परिषद शाळेसमोरच पालकावर हल्ला! जाब विचारणं पडलं महागात; काठीने मारहाण करत शिवीगाळ अन् चक्क खांद्याचा चावा घेत…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 11 March 2026, 17:21
Bhor Crime: A parent was attacked in front of the Zilla Parishad school in Bhor! Asking for an answer was costly; Beating him with a stick, abusing him and even biting his shoulder...

विशाल शिंदे

 

भोर : भोर तालुक्यातील नसरापूर गावात जिल्हा (Bhor Crime) परिषद शाळेच्या परिसरात घडलेल्या मारहाणीच्या घटनेमुळे गावात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेनंतर (Bhor News) स्थानिक नागरिकांनी संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई करून कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी पोलीस प्रशासनाकडे केली आहे. (Pune Crime)

मिळालेल्या माहितीनुसार, नसरापूर येथील रहिवासी किशोर चंद्रकांत पवार (वय ३२) हे आपल्या भाचा रुद्र याला शाळेत सोडण्यासाठी सकाळच्या सुमारास जिल्हा परिषद शाळेत गेले होते. त्यावेळी शाळेच्या कार्यालयीन कक्षाजवळ मंगेश हणुमंत शिंदे (रा. नायगाव, ता. भोर) याच्याशी त्यांची बोलाचाली झाली. आपल्या भाच्याला शिवीगाळ का केली, अशी विचारणा केल्यावर आरोपी संतापून गेला.

यावेळी आरोपीने काठीने मारहाण करत फिर्यादीच्या डाव्या खांद्यावर चावा घेतला तसेच शिवीगाळ व दमदाटी केल्याची माहिती समोर आली आहे. शाळेसारख्या संवेदनशील ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे पालक व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित व्यक्ती यापूर्वीही अनेक वेळा गावातील नागरिकांना त्रास देत असल्याच्या तक्रारी आहेत. तसेच तो यापूर्वी येरवडा कारागृहातही जाऊन आल्याची चर्चा गावात होत असून त्याच्या वागणुकीमुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.

नसरापूरसह परिसरातील गावांतील नागरिक आता या प्रकाराला कंटाळले असून, अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी पोलीस प्रशासनाने संबंधित व्यक्तीवर कठोर आणि कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. गावात शांतता व सुरक्षितता राखण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षाही नागरिकांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, या घटनेमुळे नसरापूर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पुढील घडामोडीकडे स्थानिकांचे लक्ष लागले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Banner theft : बाणेरमध्ये धक्कादायक चोरी; मोलकरणीचा WhatsApp स्टेटसच ठरला पुरावा

Tuesday, 28 April 2026, 13:25

Pimpari News : पिंपरीत हायटेन्शन टॉवरवर चढलेल्या व्यक्तीमुळे तणाव; अनेक तासांपासून सुरू नाट्यमय घडामोडी

Tuesday, 28 April 2026, 12:59

Hadapsar News : क्रेडिट कार्ड वसुलीच्या नावाखाली रस्त्यावर गुंडगिरी! भरदिवसा मारहाण; फक्त अदखलपात्र गुन्हा दाखल केल्याने हडपसर पोलिसांवर संताप

Tuesday, 28 April 2026, 12:07
Pune News: District and Sessions Court grants bail to accused of possessing pistol and cartridges

Pune News : वाकड येथे स्वतःच्या मुलीवर अत्याचाराचा आरोप असलेल्या वडिलांची निर्दोष मुक्तता..

Tuesday, 28 April 2026, 11:09

Good News : क्षणाचीही विलंब न करता… चंदननगर पोलिसांची आत्महत्येच्या प्रयत्नात असलेल्या ज्येष्ठ नागरिकाचा वाचवला जीव

Tuesday, 28 April 2026, 10:49

Mumbai News : मुंबईत बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्यानंतर 12 तासांत एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू ; अन्न विषबाधेचा संशय..

Tuesday, 28 April 2026, 10:21
Next Post
Pune Crime: 24-year-old girl commits suicide after being cheated on the promise of marriage; Case registered against young man

Suicide News: "माझी मुलगी अशी जाऊच शकत नाही!" 23 वर्षांच्या विवाहितेने लग्नानंतर अवघ्या 4 महिन्यांतच संपवलं आयुष्य; पित्याचा जावयावर आरोप

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.