Sunday, September 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bhigwan News: खडकवासला कालव्याच्या पाण्यासाठी बंदी झुगारून पुणे -सोलापूर महामार्गावर ‘रास्ता रोको’, 11 नेत्यांसह 250 जणांवर भिगवण पोलिसांत गुन्हा दाखल..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Tuesday, 19 May 2026, 14:14

भिगवण, (पुणे) : खडकवासला कालव्याचे (Bhigwan News) आवर्तन तातडीने सुरू करावे या मागणीसाठी शासनाची बंदी झुगारून पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर तीव्र रास्ता रोको आंदोलन करणाऱ्या 11 प्रमुख नेत्यांसह सुमारे 200 ते 250 अनोळखी आंदोलनकर्त्यांवर भिगवण पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. परवानगी नाकारलेली असतानाही डाळज नंबर 2 च्या हद्दीत महामार्गाच्या दोन्ही लेन आणि सर्व्हिस रोडवर ठिय्या मांडल्याने पोलिसांनी ही मोठी कायदेशीर कारवाई केली आहे.

विजय बबन गावडे, दादासाहेब संभाजी खारतोडे, बाबा महाराज खारतोडे, रमेश खारतोडे, निवृत्ती भाऊसाो गायकवाड, 6) अरविंद गायकवाड, भाऊ बाळासो खारतोडे, स्वप्नील पाटील (सर्व रा. कळस, ता. इंदापूर), तानाजी मारकड, अनिकेत लावंड, (दोघे रा. रुई), जनार्दन पांढरमिसे रा. थोरातवाडी तसेच इतर 200 ते 250 अनोळखी इसमांवर भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी भिगवण पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक नाना वामण वीर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (ता. 17) विजय बबन गावडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रशासनाला खडकवासला कालव्याचे पाणी सोडण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्याचे निवेदन दिले होते. मात्र, महामार्गावरील कायदा व सुव्यवस्था आणि वाहतूक कोंडी लक्षात घेऊन पोलिसांनी या आंदोलनाला अधिकृत परवानगी नाकारली होती.

परवानगी नसतानाही सोमवारी (ता. 18) सकाळी साडेआठ वाजल्यापासूनच डाळज नंबर 2 हद्दीत सर्व्हिस रोडवर शेतकऱ्यांचे जथ्ते जमू लागले होते. तेथे सकाळी साडेदहा वाजेपर्यंत आंदोलक नेत्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यादरम्यान जलसंपदा विभागाचे (पाटबंधारे) अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांच्यात चर्चा झाली, मात्र अधिकाऱ्यांच्या आश्वासनाने शेतकऱ्यांचे समाधान झाले नाही. त्यामुळे आक्रमक झालेल्या नेत्यांनी उपस्थित जनसमुदायाला महामार्ग रोखण्याचे आवाहन केले.

 

सकाळी साडेदहा ते साडेअकरा वाजण्याच्या या एक तासाच्या कालावधीत सुमारे 200 ते 250 आंदोलक शेतकरी आणि प्रमुख नेते पुणे-सोलापूर महामार्गाच्या दोन्ही लेन आणि सर्व्हिस रोडवर ठिय्या देऊन बसले. यामुळे महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. वाहने अडवून प्रवाशांना इच्छित स्थळी जाण्यास प्रतिबंध केल्याने आणि नागरिकांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी अखेर गुन्ह्याची नोंद केली.

दरम्यान, भिगवण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नाना वीर यांनी सरकारतर्फे याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपींवर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 126(2), 223, 189(2), 189(3) आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

ASI पी.एन. पाटलांनी उचललं टोकाचं पाऊल; वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावं सांगून घेतला मोठा निर्णय!

Saturday, 5 September 2026, 23:13

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठा बदल!चेन्नीथला यांची उचलबांगडी? आता ‘या’ नेत्याकडे प्रभारीपदाची मोठी जबाबदारी

Saturday, 5 September 2026, 22:45

DJवरून वाद पेटलेला असतानाच बापटांचा नवा इशारा; आता नेत्यांच्या सभा-मिरवणुकांवरही कारवाईची मागणी?

Saturday, 5 September 2026, 22:26

मनोज जरांगेंच्या आंदोलनाला अखेर यश!सरकारने घेतला SEBC प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय, घडामोडीना वेग

Saturday, 5 September 2026, 21:25

पिंपरी-चिंचवडमध्ये विजेचा धक्का लागून कामगाराचा दुर्दैवी मृत्यू; कुटुंबावर दु:खाचा डोंगर

Saturday, 5 September 2026, 20:55

केतन अग्रवाल हत्येप्रकरणी मोठी कारवाई ! 79 दिवसांनी चेतनच्या मित्राला अटक, धक्कादायक कारण समोर

Saturday, 5 September 2026, 19:45
Next Post
'I can't bear it anymore': Horrific act of a young woman in Pune; Tired of the constant harassment, she killed her biological father...

'आता मला सहन होत नाही' पुण्यात तरुणीचं भयंकर कृत्य; सततच्या त्रासाला कंटाळून जन्मदात्या बापालाच संपवलं...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp