Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bhigvan News : पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रम पुर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रथम वर्ष पदवी अभियांत्रिकीला देखील प्रवेशाची संधी प्रा. रामदास झोळ..

सागर जगदाळेby सागर जगदाळे
Sunday, 2 July 2023, 11:09

सागर जगदाळे 

Bhigvan News : भिगवण, (पुणे ) : ज्या पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रम पुर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट द्वितीय वर्ष पदवी अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला काही कारणास्तव जर प्रवेश मिळाला नाही तर अशा विद्यार्थ्यांना प्रथम वर्ष पदवी अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला देखील प्रवेशाची संधी असते. अशी माहिती स्वामी चिंचोली (भिगवण) येथील दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांनी दिली. (Bhigvan News)

मागील काही वर्षातील अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेच्या स्थितीचा आढावा घेतला असता असे निदर्शनास येते की, पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रम पुर्ण केलेल्या विद्यार्थ्याची संख्या जास्त असते. परंतु थेट द्वितीय वर्ष पदवी अभियांत्रिकी प्रवेशासाठी मोजक्याच जागा असल्याने विद्यार्थ्यांची इच्छा असुन देखील पदवी अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येत नाही. (Bhigvan News)

 

त्यामुळे विद्यार्थी इतर अभ्यासक्रमाचा पर्याय निवडतो किंवा नोकरी करण्याचा पर्याय निवडतो. परंतु थेट द्वितीय वर्ष पदवी अभियांत्रिकीच्या जागा पुर्णपणे भरलेल्या असल्यामुळे जर एखाद्या विद्यार्थ्यांला पदवी अभियांत्रिकीचे शिक्षण घ्यावयाचे असेल तर सदर विद्यार्थ्यांला सीईटी प्रवेश परिक्षा न देता देखील पदविका अभ्यासक्रमाच्या मार्कावर (कमीत कमी ४५ टक्के व ४० टक्के मार्क मागासवर्गीय उमेदवारासाठी) प्रथम वर्ष पदवी अभियांत्रिकीला देखील प्रवेश घेता येतो. यासंबंधीची माहिती अनेक पदवी अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांना नसल्यामुळे बहुतांश विद्यार्थी पदवी अभियांत्रिकी प्रवेशापासून वंचित राहत आहेत.

सध्या अशी परिस्थिती कॉम्प्युटर व आयटी या शाखांसाठी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाबाबत निर्माण झालेली आहे. मागील दोन वर्षात म्हणजेच कोरोनाचा काळ संपल्यानंतर कॉम्प्युटर व आयटी या शाखांना प्रवेश घेण्याऱ्या विद्यार्थ्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे त्यामुळे प्रथम वर्षाची प्रवेश क्षमता पुर्णपणे भरलेली जात असुन कॉम्प्युटर व आयटीच्या थेट द्वितीय वर्ष पदवी अभियांत्रिकी प्रवेशासाठी अत्यंत कमी जागाच प्रवेशासाठी शिल्लक राहत आहेत असेही रामदास झोळ म्हणाले.

दरम्यान, ज्या पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट द्वितीय वर्ष पदवी अभियांत्रिकीला प्रवेश मिळालेला नाही अशा सर्व विद्यार्थ्यांनी प्रथम वर्ष पदवी अभियांत्रिकी प्रवेशासाठीच्या पर्यायाबाबत देखील जरूर विचार करावा व सध्या प्रथम वर्ष पदवी अभियांत्रिकीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी महाराष्ट्र शासनाच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कडून प्रवेशासाठी नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू झालेली असुन दि. ३ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास नोंदणी प्रक्रिया सुरू राहणार आहे. तरी अशा सर्व इच्छुक विद्यार्थ्यांनी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षेच्या संकेतस्थळावर जावून नोंदणी करून घेण्याचे आवाहन प्रा. रामदास झोळ यांनी केले आहे.

सागर जगदाळे

सागर जगदाळे

अडीज वर्ष दैनिक पुण्यनगरी काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये भिगवण येथील प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे. शैक्षणिक क्षेत्रातील बातम्या लिहिण्याचा खूप मोठा अनुभव आहे.

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

ACP Padmakar Ghanvat : सहायक पोलीस आयुक्त पद्माकर घनवट यांचा जामीन सत्र न्यायालयाने फेटाळला ; अटकेची शक्यता बळावली..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.