Tuesday, September 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘डीजेबंदी झालीच पाहिजे!’ पुणेकरांचा डीजेविरोधात एल्गार, रस्त्यावर उतरले शेकडो नागरिक; बंदीशिवाय माघार घेणार नसल्याची भूमिका

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 7 September 2026, 8:44

पुणे : डीजे आणि कर्कश ध्वनिवर्धकांच्या त्रासाविरोधात पुण्यातील नागरिकांनी रस्त्यावर उतरून विरोध केला आहे. रविवारी शेकडो पुणेकरांनी एकत्र येत डीजे बंदीची मागणी केली. सोलापूर, मुंबई आणि नागपूरसारख्या शहरांमध्ये डीजेवर निर्बंध लागू होऊ शकतात, तर पुण्यातही अशी कारवाई का केली जात नाही, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला.

जंगली महाराज रस्त्यावरील झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकापासून महानगरपालिकेपर्यंत मोर्चा काढण्यात आला. ‘लाउड स्पीकरविरोधी पुणेकर मंच’च्या आवाहनाला प्रतिसाद देत विविध भागांतील नागरिक या आंदोलनात सहभागी झाले. सर्व धर्मांच्या तसेच राजकीय आणि सार्वजनिक उत्सवांमध्ये मोठ्या आवाजातील ध्वनिवर्धकांवर नियंत्रण आणावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

मोर्चादरम्यान नागरिकांनी डीजेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ‘डीजेबंदी झालीच पाहिजे’ आणि ‘शांतता आमचा हक्क आहे’, अशा घोषणा देत नागरिकांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. ढोल-ताशा पथकांचे वादनही सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या ध्वनीमर्यादेतच व्हावे, अशी मागणी आंदोलकांनी केली.

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विद्यानंद बापट यांचे नावही चर्चेत आले आहे. सार्वजनिक उत्सवांमधील मोठ्या आवाजाविरोधात भूमिका घेतल्यानंतर बापट यांना एका तरुणाने मारहाण केली होती. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव ते रविवारीच्या मोर्चात सहभागी झाले नाहीत. मात्र, त्यांच्या डीजेबंदीच्या मागणीला नागरिकांचा वाढता पाठिंबा मिळताना दिसला.

 

दरम्यान, सण आणि उत्सवांमध्ये मोठ्या आवाजातील संगीत आणि डीजेच्या वापराबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही भाष्य केले आहे. उत्सव साजरे करण्यासाठी स्पष्ट नियमावली असण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

पुण्यातील या आंदोलनामुळे डीजे, ध्वनिवर्धक आणि सार्वजनिक उत्सवांमधील ध्वनीप्रदूषणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नागरिकांनी बंदीशिवाय माघार घेणार नसल्याची भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

कुरकुंभ एमआयडीसीत उद्योजकाला धमकी देत रसायनांची मागणी? शरद शितोळेंविरुद्ध दौंड पोलिसांत गुन्हा दाखल

Tuesday, 8 September 2026, 11:55

मनोज जरांगेंच्या लढ्याला मोठं यश! मराठा-कुणबी जात प्रमाणपत्राबाबत सरकारचा मोठा निर्णय; महत्त्वाची अपडेट समोर

Tuesday, 8 September 2026, 11:48

भिमा नदीकाठच्या शेतातून शेतीपंपासह 62 हजारांचा मुद्देमाल लंपास

Tuesday, 8 September 2026, 11:21

Pune: “माझ्या मुलाला किस केलं, तिला संबंध ठेवायचे होते”, वडिलांच्या तक्रारीनंतर 21 वर्षीय तरुणीवर POCSO अंतर्गत गुन्हा दाखल

Tuesday, 8 September 2026, 10:52

कुणालसह 14 जणांना गिळणाऱ्या खवड्या डोंगराला लगाम! प्रशासनाचा मोठा निर्णय, आराखडा तयार

Tuesday, 8 September 2026, 10:41

पुण्यात डेंग्यू-चिकनगुनियाचा धोका वाढला! ऑगस्टमध्ये 485 संशयित रुग्ण; ‘ही’ लक्षणे दिसताच सावधान

Tuesday, 8 September 2026, 10:20
Next Post

MPSC पेपरफुटी प्रकरणात नवा ट्विस्ट! 270 पानांच्या WhatsApp चॅटमधून धक्कादायक खुलासे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp