Monday, September 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

MPSC पेपरफुटी प्रकरणात नवा ट्विस्ट! 270 पानांच्या WhatsApp चॅटमधून धक्कादायक खुलासे

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 7 September 2026, 9:04

मुंबई: राज्यभर चर्चेत असलेल्या MPSC औषध निरीक्षक परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणात गुन्हे शाखेचा तपास वेगाने सुरू आहे. या प्रकरणात आतापर्यंत अनेक आरोपींवर कारवाई झाली असून, तपासादरम्यान मिळालेल्या डिजिटल पुराव्यांमुळे प्रकरणाला नवी दिशा मिळाली आहे.

नंदुरबार येथून ऋतुजा पाटीलला अटक करण्यात आली असून, 2 सप्टेंबर रोजी तिला न्यायालयात हजर केले असता 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. इतर आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपींची चौकशी करून पेपरफुटीचा नेमका मार्ग आणि त्यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध सुरू केला आहे.

या तपासात सहआरोपी लोकेश उर्फ गौरव पाटीलच्या मोबाईलमधून मिळालेल्या तब्बल 270 पानांच्या WhatsApp चॅट्स महत्त्वाचा पुरावा ठरत आहेत. ऋतुजाचा मोबाईल उल्हास नदीत फेकण्यात आल्याचा दावा आहे. त्यामुळे तिच्या मोबाईलऐवजी गौरवच्या फोनमधील संभाषण तपासासाठी महत्त्वाचे ठरले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, 20 मार्चच्या चॅटमध्ये परीक्षेतील काही प्रश्नांबाबत चर्चा झाल्याचा दावा आहे. तसेच 22 मार्च रोजीच्या परीक्षेत दिलेल्या प्रश्नांपैकी 78 प्रश्न आले असल्याचे ऋतुजाने सांगितल्याचा तपास यंत्रणेचा दावा आहे. आणखी 13 प्रश्न सोडवल्याने एकूण 91 प्रश्न सोडवल्याचा उल्लेख चॅटमध्ये असल्याचेही समोर आले आहे. पेपरसाठी 5 लाख रुपयांची मागणी झाल्याचाही उल्लेख संभाषणात असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

 

दरम्यान, MPSC अधिकारी विश्वेश्वर नकाते याने गुन्ह्यात वापरलेला लॅपटॉप खाडीत फेकल्याचे तपासात समोर आले आहे. या लॅपटॉपमध्ये 294 प्रश्न आणि त्यांचे पर्याय असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. पोलिसांनी लॅपटॉप शोधून काढला असून त्यातील माहिती मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

नंदुरबारमधील कौटिल्या क्लासेसचे संचालक आणि आरोपी प्रवीण पाटीलच्या घरातून आर्थिक व्यवहारांशी संबंधित कागदपत्रेही मिळाल्याचे सांगण्यात आले. आरोपी तपासात सहकार्य करत नसून उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले.

या प्रकरणात मयूर ठाकरे याचाही उल्लेख चॅटमध्ये असल्याचे समोर आले आहे. त्याची भूमिका तसेच पेपरफुटीमध्ये आणखी कोण सहभागी आहे का, याचा तपास गुन्हे शाखेकडून सुरू आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

दहीहंडी फोडण्यासाठी बारामतीहून पुण्यात आला अन् दिवे घाटात काळाचा घाला! 22 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

Monday, 7 September 2026, 9:58

सलमान खानच्या Bigg Boss 20 मध्ये कोण-कोण? मेरी कोमपासून सोशल मीडिया स्टार्सपर्यंत यावेळी असणार ‘हे’ भन्नाट स्पर्धक

Monday, 7 September 2026, 9:22

MPSC पेपरफुटी प्रकरणात नवा ट्विस्ट! 270 पानांच्या WhatsApp चॅटमधून धक्कादायक खुलासे

Monday, 7 September 2026, 9:04

‘डीजेबंदी झालीच पाहिजे!’ पुणेकरांचा डीजेविरोधात एल्गार, रस्त्यावर उतरले शेकडो नागरिक; बंदीशिवाय माघार घेणार नसल्याची भूमिका

Monday, 7 September 2026, 8:44

क्षणात जमीनदोस्त झाली पाच मजली इमारत! 6 जणांचा मृत्यू, बचावकार्य अजूनही सुरू

Monday, 7 September 2026, 8:18

Pune: वेल्डिंग करताना दोघांचा तोल गेला अन् क्षणात अनर्थ! 23 वर्षीय कामगाराचा मृत्यू, एकजण जखमी

Monday, 7 September 2026, 8:11
Next Post

सलमान खानच्या Bigg Boss 20 मध्ये कोण-कोण? मेरी कोमपासून सोशल मीडिया स्टार्सपर्यंत यावेळी असणार 'हे' भन्नाट स्पर्धक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp