Monday, August 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पूर्व हवेलीतील सोनारांकडून ‘सुवर्ण भिशी’च्या नावाखाली ग्राहकांकडून प्रतिमाह लाखोंची बेकायदा वसुली? ईडी-सीबीआय चौकशीची नागरिकांची मागणी!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 3 August 2026, 16:43

लोणी काळभोर, ता. ३ : पूर्व हवेली परिसरातील काही सराफा व्यावसायिकांकडून ‘सुवर्ण भिशी’ (बीसी) योजनांच्या नावाखाली दरमहा लाखो रुपयांची रक्कम ग्राहकांकडून गोळा केली जात असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून करण्यात आला आहे. अशा योजनांसाठी आवश्यक कायदेशीर परवानग्या आहेत का, या प्रश्नावरही नागरिकांनी शंका उपस्थित करत संबंधित प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

या योजनांमध्ये ग्राहकांकडून सलग ११ महिने ठरावीक रक्कम जमा करून घेतली जाते. बाराव्या महिन्याचा हप्ता व्यावसायिक भरत असल्याचे आमिष दाखवले जाते; मात्र मुदत पूर्ण झाल्यानंतर ग्राहकांना रोख रक्कम परत न देता त्याच रकमेतून सोने खरेदी करण्यास भाग पाडले जाते. त्यामुळे या योजनेत ग्राहकांच्या पैशाचा फायदा व्यावसायिकांनाच होत असल्याचा आरोप होत आहे.

लोणी स्टेशन, लोणी काळभोर, कुंजीरवाडी आणि उरुळी कांचन परिसरातील अनेक सराफा दुकानदार अशा प्रकारच्या योजना राबवत आहेत. या योजनांची कायदेशीरता, निधी संकलनाचे अधिकार आणि आर्थिक व्यवहारांची पारदर्शकता याची संबंधित यंत्रणांनी तपासणी करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.जर एखादा व्यावसायिक अचानक दुकान बंद करून फरार झाला, तर ग्राहकांच्या आयुष्यभराच्या बचतीवर पाणी फिरू शकते. त्यामुळे अशा योजनांमध्ये पैसे गुंतविण्यापूर्वी नागरिकांनी सावध राहणे गरजेचे आहे.

 

महाराष्ट्रात यापूर्वीही सुवर्ण भिशी किंवा सोन्याच्या गुंतवणुकीच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक झाल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. अशा घटनांमध्ये ग्राहकांकडून दीर्घकाळ पैसे जमा करून घेतल्यानंतर काही सराफा व्यावसायिकांनी कोट्यवधी रुपयांसह पसार झाल्याची प्रकरणे उघडकीस आली होती. सहा वर्षांपूर्वी पूर्व हवेली परिसरातील शेकडो नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात रक्कम गोळा करून एका सराफा व्यावसायिकाने कुटुंबासह फरार झाल्याची घटना घडली होती. त्या पार्श्वभूमीवर पुन्हा अशा प्रकारच्या योजनांची चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.

ईडी, आर्थिक गुन्हे शाखा, आयकर विभाग आणि संबंधित आर्थिक नियामक संस्थांनी पूर्व हवेलीतील सुवर्ण भिशी योजनांची सखोल चौकशी करून त्या कायदेशीर आहेत का, याची पडताळणी करावी. नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करून ग्राहकांचे हित सुरक्षित करावे, अशी मागणी नागरिकांकडून आता जोर धरू लागली आहे.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

अन् चालत्या बसमध्येच दोनदा विनयभंग! एकट्या महिलेचा रात्री ट्रॅव्हल्समधून प्रवास, बस कर्मचाऱ्याची नियत फिरली आणि नको तिथे हात लावत…

Monday, 3 August 2026, 20:08

खासगी गाड्यांवर ‘पोलीस’ लिहिलंय का? तर मग बसणार मोठा दणका; वाहतूक विभागाचे कठोर कारवाईचे आदेश

Monday, 3 August 2026, 19:28

कोरेगाव मूळ येथे येथील मुळा-मुठा बंधाऱ्यावरून बिवरीतील एकजण गेला वाहून; 15 दिवसांपूर्वी ‘पुणे प्राईम न्यूज’कडून धोक्याचा व्हिडिओ प्रसारित, तर आज दुर्घटना, प्रशासनाचा अद्याप पत्ता नाही..

Monday, 3 August 2026, 19:25

कोरेगाव मूळमध्ये 14 वर्षीय अल्पवयीन मुलाची गळफास घेऊन आत्महत्या..

Monday, 3 August 2026, 18:42

महिला PMPMLमध्ये चढली, प्रवाशांची कोंबाकोंब अन् गर्दीचा फायदा घेत घडलं भयंकर; सरळ पोलीस स्टेशन गाठलं अन्…

Monday, 3 August 2026, 18:06

कदमवाकवस्तीत घरफोडी! उघड्या दरवाजाचा फायदा घेत चोरट्यांचा डल्ला; तब्बल ८ लाखांच्या दागिन्यांसह रोकड लंपास

Monday, 3 August 2026, 17:30
Next Post

'आमच्या लेकीला त्रास का देतो?' सासरच्यांनी जावयाला भररस्त्यात धु-धु धुतलं; बायकोशी वाद घालणं नवऱ्याला जीवावर बेतलं....

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.