Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोर येथील श्रीमंत अंबरनाथ कालाष्टमी जन्मोत्सव व दीपमहोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 6 December 2023, 20:48

विशाल कदम

 

लोणी काळभोर : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील ग्रामदैवत श्रीमंत अंबरनाथ काळभैरवनाथाचा कालाष्टमी जन्मोत्सव सोहळा अंबरनाथ मंदिरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने महामस्तकाभिषेक, भजन, जन्मोत्सवाचे सुश्राव्य कीर्तन, तुलसीदास रामायणाचे पठण आदी धार्मिक व पारंपरिक कार्यक्रम भक्तीभावात पार पडले.

जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त अंबरनाथाचे मंदिर सजविण्यात आले होते. मंगळवारी (ता. ५) पहाटे ५ वाजता श्रीमंत अंबरनाथ व माता जोगेश्वरीला भाविकांच्या उपस्थितीत महामस्तकाभिषेक करण्यात आला. सकाळी ७ ते ९ या दरम्यान १०१ दांपत्यांच्या हस्ते लघुरुद्र अभिषेक व होमहवन पार पडले. सकाळी ९ ते दुपारी ४ या दरम्यान सिताराम भजनी मंडळाच्या वतीने श्री तुलसीदास रामायणाचे पठण झाले. तर राजस्थानी सत्संग भजनी मंडळाच्या वतीने भजनाचा कार्यक्रम झाला. श्रीमंत अंबरनाथ भजनी मंडळाचे भजन झाले.

सत्यनारायणाची महापूजा मंगळवारी दुपारी १२ वाजता आयोजित केली होती. सायंकाळी ६ वाजता मंदिरात हजारो दिवे लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला. ह.भ.प. दत्ता महाराज काळभोर यांचे जन्मोत्सवाचे सुश्राव्य कीर्तन रात्री दहा वाजता झाले. मध्यरात्री बारा वाजता श्रीमंत अंबरनाथाचा जन्मोत्सव सोहळा पार पडला. या वेळी परिसरात फटाक्यांची नयनरम्य आतषबाजी करण्यात आली होती. उत्सवानिमित्त संपूर्ण मंदिरावर विद्युत रोषणाई केली होती.

श्रींची पारंपरिक शाही मिरवणूक ढोल, ताशे व बॅन्डच्या सुमधूर सुरांत बुधवारी (ता. ६) सकाळी ९ ते १२ या दरम्यान काढण्यात आली. यामध्ये मोठ्या संख्येने महिला व तरुणी सहभागी झाल्या होत्या. या मिरवणुकीत पृथ्वीराज कपूर हायस्कूल तसेच कन्या प्रशालेच्या विद्यार्थिनी, महिला व तरुणी डोक्यावर मंगलकलश घेऊन मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. विद्यार्थिनींनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून फुगड्या खेळण्याचा मनसोक्त आनंद लुटला. तर काही विद्यार्थिनींनी लेझीमवर ठेका धरला.

या मिरवणुकीदरम्यान घोड्याचे नृत्य हा आकर्षणाचा विषय ठरला. भजनी मंडळींनी हरीनामाच्या जयघोषात लोणी काळभोरकरांना मंत्रमुग्ध केले. अशा भक्तिमय वातावरणात श्रीमंत अंबरनाथ काळभैरवनाथाची कालाष्टमीची मिरवणूक पार पडली. त्यानंतर दुपारी १२ ते ४ या वेळेत रामेश्वर सारडा व राजू चौधरी यांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

या सर्व कार्यक्रमांचे आयोजन लोणी काळभोर व कदमवाकवस्ती ग्रामस्थ, देवस्थान ट्रस्ट व श्रीमंत अंबरनाथ मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले होते, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष योगेश काळभोर यांनी दिली.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Pune rain

Pune rain : केबल दुरुस्त करताना विजेचा भीषण धक्का; माळेगावच्या 45 वर्षीय राहुल जगताप यांचा जागीच मृत्यू

Thursday, 2 April 2026, 22:15

भोंदूबाबाची पत्नी कल्पना खरातवर मोठी कारवाई! परदेशात पळण्याचा मार्ग बंद; शिर्डी पोलिसांकडून “लुकआऊट नोटीस” जारी

Thursday, 2 April 2026, 22:05
Tukaram Munde

Tukaram Munde : तुकाराम मुंढे यांच्यावर दुःखाचा डोंगर; आदर्श मातोश्री आसराबाई मुंढे यांचे निधन. उद्या होणार अंत्यसंस्कार.

Thursday, 2 April 2026, 21:49
Yawat

Yawat : भांडगाव येथील यशोदा हॉटेल समोरून भर दुपारी दुचाकी चोरीची घटना

Thursday, 2 April 2026, 21:30

कल्याणीनगरमध्ये मसाजच्या नावाखाली देहविक्री! स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; दोन तरुणींची सुटका, मॅनेजर गजाआड

Thursday, 2 April 2026, 21:20
Yawat

Yawat : काळजाचा ठोका चुकवणारा अपघात! पुणे-सोलापूर हायवेवर स्पोर्ट्स बाईकचा चुराडा; भीषण अपघातात एकाचा मृत्यू.

Thursday, 2 April 2026, 21:18
Next Post

फुरसुंगीतील मोरांची संख्या अचानक झाली कमी; शिवशंभु सोशल फाऊंडेशनच्या सर्वेक्षणात उघड

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.