Saturday, September 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

थेऊर फाटा येथे रस्ता ओलांडताना भरधाव ट्रकची धडक; ‘झोमॅटो’ डिलिव्हरी बॉयचा उपचारादरम्यान मृत्यू, अज्ञात ट्रक चालकाविरोधात लोणी काळभोर पोलिसांत गुन्हा दाखल..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Saturday, 5 September 2026, 11:59

लोणी काळभोर, (पुणे) : रक्षाबंधनाचा कार्यक्रम आटोपून रात्रीच्या वेळी घरी परतत असताना पुणे-सोलापूर महामार्गावरील थेऊर फाटा येथे रस्ता ओलांडणाऱ्या तरुणाला भरधाव ट्रकने चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या 33 वर्षीय तरुणाचा ससून रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

पवन हनुमंत सुरवसे (वय 33, रा. 10 वा मैल, वडकी, ता. हवेली, जि. पुणे) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून, ते पुणे शहरात ‘झोमॅटो’मध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होते. अपघात घडल्यानंतर वाहनासह पसार झालेल्या अज्ञात ट्रक चालकाविरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ज्ञानेश्वर शंकर रणदिवे (वय ३४, रा. कुंजीर गॅरेज, थेऊर फाटा) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्ञानेश्वर रणदिवे आणि त्यांचे साडू पवन सुरवसे हे 31 ऑगस्ट रोजी कात्रज येथे नातेवाईकांकडे रक्षाबंधनानिमित्त गेले होते. तेथून 1 सप्टेंबर रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास रिक्षाने हडपसर येथे आले. हडपसरवरून वडकीकडे जाण्यासाठी रात्री कोणतेही वाहन न मिळाल्याने, दोघांनी थेऊर फाट्यावरील कुंजीर गॅरेजवर रात्र घालवण्याचे ठरवले.

एका पिकअप वाहनातून ते रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास थेऊर फाट्यापुढे कुंजीर गॅरेजसमोर उतरले. गॅरेजकडे जाण्यासाठी दोघे पुणे-सोलापूर महामार्ग ओलांडत असताना, सोलापूर बाजूकडून पुणे बाजूकडे अत्यंत भरधाव वेगाने आलेल्या एका अज्ञात ट्रकने रस्ता ओलांडणाऱ्या पवन सुरवसे यांना जोरदार धडक दिली आणि ट्रकचालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला.

 

ट्रकच्या धडकेत पवन यांच्या डोक्याला आणि तोंडाला गंभीर दुखापत झाल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध पडले. साडू ज्ञानेश्वर रणदिवे यांनी तत्काळ रुग्णवाहिकेतून त्यांना उरुळी कांचन येथील सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर 1 सप्टेंबर रोजी त्यांना पुढील उपचारासाठी ससून रुग्णालय, पुणे येथे हलवण्यात आले. ससून रुग्णालयात चार दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान शुक्रवारी (ता. 04) त्यांची प्राणज्योत मालवली.

दरम्यान, वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक शेळके करीत आहेत.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

विद्यानंद बापटांच्या नावाने सोशल मीडियावर बनावट अकाउंट;नेमका प्रकार काय?म्हणाले, “मी फक्त…….

Saturday, 5 September 2026, 12:53

खेळाडूंचं बोगस सर्टिफिकेट, थेट पोलीस भरतीत एन्ट्री!पुण्यात 19 उमेदवारांचा बोगस प्रमाणपत्र घोटाळा समोर

Saturday, 5 September 2026, 12:32

मनोज जरांगेंची प्रकृती चिंताजनक? उपोषणाचा 8वा दिवस, उपचार घेण्यास पुन्हा नकार

Saturday, 5 September 2026, 12:16

थेऊर फाटा येथे रस्ता ओलांडताना भरधाव ट्रकची धडक; ‘झोमॅटो’ डिलिव्हरी बॉयचा उपचारादरम्यान मृत्यू, अज्ञात ट्रक चालकाविरोधात लोणी काळभोर पोलिसांत गुन्हा दाखल..

Saturday, 5 September 2026, 11:59

हिंजवडीच्या समस्यांवर बोलणं पडलं महागात? मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याआधी खबरदारी म्हणून IT अभियंत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात

Saturday, 5 September 2026, 11:50

दहीहंडीच्या उत्सवात काळाचा घाला, पुण्यात लोखंडी स्ट्रक्चर डोक्यात पडून महिलेचा मृत्यू

Saturday, 5 September 2026, 11:28
Next Post

मनोज जरांगेंची प्रकृती चिंताजनक? उपोषणाचा 8वा दिवस, उपचार घेण्यास पुन्हा नकार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp