Thursday, October 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पोलीस उपनिरीक्षक विद्याधर निचित यांच्या ३५ वर्षांच्या निष्कलंक सेवेला सलाम! न्यायालयीन कामकाजातील उल्लेखनीय योगदानाबद्दल शासनाकडून ‘अति-उत्कृष्ट सेवा पदक’जाहीर

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 14 August 2026, 18:47

पुणे, ता. १४ : महाराष्ट्र पोलीस दलातील दीर्घकालीन आणि निष्कलंक सेवेसाठी पोलीस उपनिरीक्षक विद्याधर ज्ञानदेव निचित यांना यंदाचे ‘अति-उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर करण्यात आले आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी जाहीर केलेल्या पदकांमध्ये निचित यांच्या नावाचा समावेश आहे.

पोलीस उपनिरीक्षक विद्याधर निचित यांनी पुणे ग्रामीण पोलीस दलात तब्बल ३५ वर्षे सहा महिने सेवा बजावली आहे. त्यांच्या प्रदीर्घ सेवाकाळात उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना आतापर्यंत ३४७ बक्षिसे मिळाली असून, त्यांच्या सेवेत एकही शिक्षा नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांच्या उत्कृष्ट सेवेची दखल घेत १ मे २०१७ रोजी पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह पदकाने त्यांना गौरविण्यात आले होते. त्यानंतर आता त्यांच्या दीर्घकालीन आणि निष्कलंक सेवेचा आणखी एक मोठा सन्मान झाला आहे.

न्यायालयीन कामकाजातही उल्लेखनीय योगदान

सध्या निचित हे शिवाजीनगर न्यायालयात कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. न्यायालयीन कामकाजात सरकारी वकिलांशी सातत्याने समन्वय साधून संबंधित गुन्ह्यांच्या सुनावणीसाठी आवश्यक माहिती व कागदपत्रे उपलब्ध करून देत ते प्रभावीपणे मदत करतात.

विद्याधर निचित यांच्या कार्यकाळात यवत पोलीस ठाण्यातील मोक्का प्रकरण तसेच दौंड पोलीस ठाण्यातील विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपींना जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. तसेच वेल्हा, कामशेत आणि दौंड पोलीस ठाण्यांतील इतर गंभीर गुन्ह्यांमध्येही आरोपींना शिक्षा होण्यासाठी त्यांनी केलेल्या न्यायालयीन कामगिरीचा महत्त्वपूर्ण वाटा असल्याचे सांगण्यात आले.

 

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर सन्मान

भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांच्या दीर्घकालीन आणि निष्कलंक सेवेची दखल घेण्यासाठी ‘उत्कृष्ट सेवा पदक’ आणि ‘अति-उत्कृष्ट सेवा पदक’ प्रदान केले जाते. महाराष्ट्र पोलीस दलातील उल्लेखनीय व गुणवत्तापूर्ण सेवेची दखल घेत १५ ऑगस्ट २०२६ रोजीच्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर हे पदक जाहीर करण्यात आले आहे.

पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी पदक प्राप्त अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी सेवेस शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान ३५ वर्षांहून अधिक काळाची निष्कलंक सेवा, ३४७ बक्षिसे आणि एकही शिक्षा नसलेली कारकीर्द यामुळे पोलीस उपनिरीक्षक विद्याधर निचित यांचा ‘अति-उत्कृष्ट सेवा पदका’ने झालेला गौरव पुणे पोलीस दलासाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

डोळ्यात अन् तोंडात चटणी टाकली, नाक दाबून मारलं! जन्मदात्यानेच लेकीला संपवलं; पुण्यात खून करून मृतदेह साताऱ्यात फेकला, वडील अन् चुलत्याला अटक

Wednesday, 30 September 2026, 23:23

लोणी काळभोर येथील माळीमळा परिसरातील रेल्वे अंडरपासच्या कामाला अखेर सुरुवात; सनी काळभोरसह मान्यवरांचे ग्रामस्थांनी मानले आभार..

Wednesday, 30 September 2026, 23:11

महाराष्ट्राला बनवणार जगाचे ‘इनोव्हेशन हब’! नवी मुंबईत ३०० एकरवर भव्य ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिटी’ उभारली जाणार

Wednesday, 30 September 2026, 22:58

Ind Vs WI 2nd ODI : गुवाहाटीत डोळ्यांचे पारणे फेडणारा थरार! वन-डे सामन्यात भारताचा ऐतिहासिक विजय; एकाच सामन्यात मोडले तब्बल १० पेक्षा जास्त ऐतिहासिक विक्रम

Wednesday, 30 September 2026, 22:41

पुणेकरांसाठी मोठी बातमी! रखडलेला कात्रज-कोंढवा रस्ता मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे महापालिकेचे टार्गेट

Wednesday, 30 September 2026, 22:10

मुंबईसह राज्यभरात गरबा-दांडिया रद्द होणार? दुष्काळाच्या सावटाखाली गरबा-दांडियाचा मुद्दा तापला; मराठी एकीकरण समितीचा थेट विरोध

Wednesday, 30 September 2026, 21:05
Next Post

विलास घुलेच्या पत्नीचा आत्महत्येचा प्रयत्न! प्रशासनावर वैतागून विष प्राशन केलं अन्... कलेक्टर ऑफिससमोरच मोठा राडा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp