Monday, September 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उंदराने कुरतडली वीजेची वायर अन् घडला मोठा अनर्थ! पुण्यात पेटीला हात लावताच 50 वर्षीय महिलेचा मृत्यू

Shreya Varkeby Shreya Varke
Sunday, 27 September 2026, 12:59

आंबेगाव : शेतातील विहिरीवरील मोटार सुरू करण्यासाठी गेलेल्या 50 वर्षीय महिलेचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आंबेगाव तालुक्यातील कळंब येथे घडली. या घटनेमुळे भालेराव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावातही हळहळ व्यक्त होत आहे. निर्मला जालिंदर भालेराव असे मृत महिलेचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निर्मला भालेराव सकाळच्या सुमारास नेहमीप्रमाणे शेतातील विहिरीजवळ कृषी पंप सुरू करण्यासाठी गेल्या होत्या. मात्र, बराच वेळ झाला तरी त्या घरी परतल्या नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांना चिंता वाटू लागली. त्यांचा मुलगा आईचा शोध घेत विहिरीजवळ पोहोचला. त्यावेळी निर्मला या विद्युत पेटीजवळ बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या दिसल्या.

कुटुंबीयांनी तातडीने त्यांना मंचर उपजिल्हा रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर महावितरणचे सहाय्यक अभियंता निखिल तिवारी यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पाहणी केली. प्राथमिक तपासात मोटारीच्या स्टार्टर बॉक्समध्ये उंदीर शिरल्याचे आढळून आले. या उंदराने बॉक्समधील विद्युत तारा कुरतडल्याने विद्युत प्रवाह लोखंडी पेटीत उतरल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. या घटनेत उंदराचाही मृत्यू झाला होता.

 

निर्मला भालेराव यांनी पेटीला हात लावताच त्यांना जोरदार विजेचा धक्का बसला आणि त्यांचा मृत्यू झाला, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.

भालेराव कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने महावितरणने कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थ आणि कुटुंबीयांनी केली आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी कृषी पंप आणि विद्युत पेटीजवळ योग्य अर्थिंग करून घ्यावे. तसेच विजेच्या गळतीपासून संरक्षणासाठी ELCB बसवावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुण्यात गांजा तस्करीचे जाळे उद्ध्वस्त; सहा जण गजाआड! ९.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त; १.०४४ किलो गांजासह कार, मोबाईल हस्तगत

Monday, 28 September 2026, 15:34

तो’ अपघात नव्हता, घातपातच! १० ऑक्टोबरला मोठा स्फोट करणार; रोहित पवारांच्या खळबळजनक दाव्याने राजकीय वर्तुळात भूकंप

Monday, 28 September 2026, 15:14

सुशांत सिंह राजपूतचा पाय मोडला होता, डोळ्यांजवळ जखमा होत्या; 6 वर्षांनी मृत्यूबाबत नवा दावा

Monday, 28 September 2026, 15:12

जामखेडच्या कलाकेंद्रात रक्तरंजित थरार! गर्भवती नर्तिकेचं अपहरण करत मारहाण; बेशुद्धावस्थेत पेट्रोल टाकून जाळलं, नेमकं काय घडलं?

Monday, 28 September 2026, 15:00

आलेगावच्या मुरूम उत्खननाचा ‘दिखाऊ’ पंचनामा; दहा हजार ब्रास मुरूम उत्खननाचा पर्यावरणप्रेमींचा दावा; पंचनाम्यात नोंद मात्र 246 ब्रास!

Monday, 28 September 2026, 14:56

पुण्यात गणपती विसर्जनाची गडबड अन् शनिवार पेठेत खळबळ! घराला कुलूप पाहून डाव टाकला अन् ३० लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला

Monday, 28 September 2026, 14:31
Next Post

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी बातमी! DA मध्ये 4% वाढ झाली तर पगारात किती रुपये वाढणार?जाणून घ्या संपूर्ण हिशोब

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp