Tuesday, November 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

येरवडा कारागृहात उभारणार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पुतळा

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 2 November 2026, 13:11

पुणे: ऐतिहासिक पुणे कराराच्या आठवणी आणि त्यामागील महत्त्व पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी पुण्यात एक विशेष स्मारक उभारण्याची तयारी सुरू झाली आहे. येरवडा मध्यवर्ती कारागृह परिसरात ‘पुणे करार स्मारक’ विकसित करण्याचा प्रस्ताव पुणे महापालिकेच्या स्थायी समितीने मंजूर केला आहे. या ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आणि ऐतिहासिक माहिती संग्रहालय उभारण्याची योजना आहे.

या प्रकल्पासाठी राज्य सरकार आणि पुणे महापालिका यांच्या माध्यमातून पुढील कार्यवाही केली जाणार आहे. मात्र, प्रत्यक्ष काम सुरू करण्यापूर्वी महापालिकेच्या मुख्य सभेची मंजुरी आणि आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

महापालिकेच्या स्थायी समितीचे सदस्य सुहास विजय टिंगरे यांनी या स्मारकाबाबत प्रस्ताव मांडला होता. पुणे कराराशी संबंधित ऐतिहासिक वारसा जतन व्हावा आणि नागरिकांना या घटनेची माहिती मिळावी, हा यामागील मुख्य उद्देश आहे. महापौर मंजूषा नागपुरे यांच्या अध्यक्षतेखाली 30 ऑक्टोबर रोजी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली. त्यानंतर स्थायी समितीच्या बैठकीत या प्रस्तावाला हिरवा कंदील देण्यात आला.

प्रस्तावित स्मारकामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याबरोबरच पुणे कराराशी संबंधित जुनी कागदपत्रे आणि ऐतिहासिक दस्तऐवज जतन केले जाणार आहेत. तसेच या कराराची पार्श्वभूमी, त्यातील महत्त्वाच्या घटना आणि सामाजिक परिणाम यांची माहिती देणारे संग्रहालय विकसित करण्याची संकल्पना आहे.

दरम्यान, 24 सप्टेंबर 1932 रोजी पुणे करार झाला होता. भारतीय सामाजिक आणि राजकीय इतिहासात या कराराला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे येरवड्यात स्मारक उभारल्यास इतिहासाचा ठेवा जतन होण्यासोबतच विद्यार्थी, अभ्यासक आणि पर्यटकांना या घटनेची माहिती एकाच ठिकाणी मिळू शकणार आहे. आता मुख्य सभेच्या मंजुरीनंतर या प्रकल्पाच्या पुढील प्रक्रियेला गती मिळणार का, याकडे लक्ष लागले आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

शरद पवार राजकारणातून निवृत्त होणार? सुप्रिया सुळेंचा संताप; म्हणाल्या, “कोणी निवृत्त व्हायचं हे…”

Tuesday, 24 November 2026, 18:33

जरांगेंविरोधात बारस्करांचा मोठा डाव! पुराव्यांचा पेनड्राईव्ह थेट पोलिसांच्या हाती; मनोज जरांगेंच्या अडचणी वाढणार?

Tuesday, 24 November 2026, 17:56

रागाच्या भरात आधी भितींवर डोकं आपटलं मग हाल-हाल करून मारलं; पुण्यातल्या इंजिनिअर तरुणीच्या खून प्रकरणात धक्कादायक खुलासा

Tuesday, 24 November 2026, 17:52

“मी घर सोडून चाललो” आईला मेसेज करून पुण्यातील १६ वर्षीय विद्यार्थी गायब! पोलिसांची शोधाशोध, पण मित्रांच्या मदतीने असं काही घडलं की…

Tuesday, 24 November 2026, 17:41

ठाकरेंच्या नगराध्यक्षांची शिंदेंच्या गोटात एन्ट्री?उदय सामंतांनी दिले पक्षांतराचे संकेत,सस्पेन्स वाढला….

Tuesday, 24 November 2026, 17:29

लोणी काळभोर येथील शेतकऱ्याचा मुलगा गौरव वलठे बनला एमबीबीएस डॉक्टर!

Tuesday, 24 November 2026, 17:04
Next Post

बाळासाहेब आणि सुजात आंबेडकरांविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह टिप्पणी; पुण्यात ॲट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp