Thursday, September 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कदमवाकवस्ती येथील ‘श्री राधे व्हरायटी’ आणि ‘आदित्य कलेक्शन’ या दुकानातील कामगारांची पोलिस पडताळणी न केल्याप्रकरणी दुकानदारांवर गुन्हा दाखल

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 11 August 2026, 14:27

लोणी काळभोर, ता. ११ : कदमवाकवस्ती (ता. हवेली) परिसरातील दुकानदारांनी परराज्यातील कामगारांची पोलिस पडताळणी करणे बंधनकारक असतानाही त्याची पूर्तता न केल्याचा प्रकार पोलिसांच्या तपासणीत सोमवारी (ता. १० ऑगस्ट) दुपारी दीड सुमारास समोर आला आहे. लोणी स्टेशन परिसरातील ‘श्री राधे व्हरायटी’ आणि ‘आदित्य कलेक्शन’ या दोन दुकानांच्या मालकांनी कामगारांची पोलिस व्हेरिफिकेशन न करता त्यांना कामावर ठेवल्याचे आढळून आल्याने लोणी काळभोर पोलिसांनी दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २२३ अंतर्गत कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.

श्रवण पटेल व हडमत सिंह अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दुकानदारांची नावे आहेत. याप्रकरणी सहाय्यक फौजदार भारती होले यांनी सरकारतर्फे लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दरम्यान, पुणे शहर पोलिस आयुक्तांनी ४ जुलै ते १ सप्टेंबर २०२६ या कालावधीसाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ मधील कलम १६३(३) अन्वये विविध आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार परराज्यातील कामगारांची आवश्यक माहिती पोलिसांना देणे आणि त्यांची पडताळणी करून घेणे अपेक्षित आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशेष शाखेच्या महिला सहायक पोलिस फौजदार भारती होले तसेच लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे कर्मचारी परिसरात आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी गस्त घालत होते. त्यावेळी लोणी स्टेशन, कदमवाकवस्ती येथील श्री राधे व्हरायटीची तपासणी करण्यात आली.दुकानमालक श्रवण पटेल यांच्याकडे काम करणारा हर्षण देवासी (वय २०, मूळ राजस्थान) याची पोलिस पडताळणी झालेली नसल्याचे तपासणीत समोर आले. तसेच त्याबाबतची माहिती पोलिस ठाण्यात दिली नसल्याचेही मालकाने सांगितल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

दरम्यान, दुपारी साडेतीनच्या सुमारास पोलिस पथकाने आदित्य कलेक्शनची तपासणी केली. दुकानमालक हडमत सिंह यांच्याकडे काम करणारा कुलदीप सिंह (वय २१, मूळ राजस्थान) याचीही पोलिस पडताळणी करण्यात आली नसल्याचे आढळले. कामगाराबाबतची आवश्यक माहिती लोणी काळभोर पोलिस ठाण्यात देण्यात आली नसल्याचेही पोलिसांच्या निदर्शनास आले.

 

आदेश असूनही नियमांकडे दुर्लक्ष?

पुणे शहर पोलिस आयुक्तालयाने सुरक्षेच्या दृष्टीने परराज्यातून येणाऱ्या कामगारांची माहिती व पोलिस पडताळणी करण्याचे आदेश दिलेले असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे या कारवाईतून समोर आले आहे. त्यामुळे ‘कामगारांची पोलिस व्हेरिफिकेशन करणे एवढेही कठीण आहे का?’ असा सवाल उपस्थित होत असून, अशा प्रकारे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अन्य आस्थापनांवरही पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

दरम्यान, या दोन्ही प्रकरणांमध्ये आदेशाची जाणीवपूर्वक अवज्ञा केल्याचा ठपका ठेवत संबंधित दुकानमालकांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २२३ अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

डीजे, लेझर अन् वर्गणीवर राजगड पोलिसांचा कडक इशारा! नियमभंग केल्यास गुन्हा दाखल

Thursday, 10 September 2026, 9:47

पुणेकरांसाठी मोठी अपडेट! मेट्रोच्या फेऱ्या वाढणार, प्रतीक्षेचा वेळ होणार कमी

Thursday, 10 September 2026, 9:40

कांदा-लसूण-बटाटा डब्यात देऊ नका! शाळेचा एक मेसेज अन् वादाला तोंड फुटलं; नेमकं प्रकरण काय? वाचा

Thursday, 10 September 2026, 9:36

तिच्यासोबत अफेअर होतं तर माझ्याशी लग्न का केलं? पुण्यात पतीच्या कथित प्रेमसंबंधामुळे नवविवाहितेने उचललं टोकाचं पाऊल

Thursday, 10 September 2026, 9:21

माण-हिंजवडी मेट्रोचा पहिला टप्पा पूर्ण! आता फक्त उद्घाटनाची तारीख बाकी, महत्त्वाची अपडेट आली समोर

Thursday, 10 September 2026, 9:04

सत्ता आपली, पण अधिकारी ऐकत नाहीत, कसा करणार विकास! मोहळांसमोर पुण्यातील नगरसेवकांनी व्यक्त केला संताप

Thursday, 10 September 2026, 8:51
Next Post

बिष्णोई टोळीच्या 50 कोटींच्या खंडणी प्रकरणात परराज्यात धाडसी शोधमोहीम; पोलीस हवालदार नितीन मुंढे यांना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन कौतुक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp